Knowledge Bridge Foundation
KNOWLEDGE BRIDGE FOUNDATION TRAIN THE TRAINER PROGRAM
19/10/2024
*जेथे मुल शिक्षकांनी दिलेले व्हिडिओच पाहत नाहीत तेथे NEP मध्ये डिजिटल- ब्लेन्डेड आणि व्हिडीओ वर दिलेला भर - NEP कस साध्य होणार?*
लेख मोठा आहे. कृपया संपूर्ण वाचा आणि अभिप्राय नक्की द्या
२०१५ च्या सुरवातीस आम्ही शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती च्या कार्यशाळा जिल्हा परिषद शिक्षकांसाठी सुरू केल्या. त्याकाळात शिक्षकांद्वारे व्हिडिओ निर्मिती ही कल्पनाच न पटणारी होती. आवाजाच्या रेकॉर्डिंग साठी माइक, क्रोमा चा पडदा अशा लो बजेट पण काम भारी करणाऱ्या वस्तु कार्यशाळेच्या जागी विकायला असायच्या. अगदी २ - ५ हजारात शिक्षकाची व्हिडिओ निर्मिती सुरू व्हायची
ज्यांनी त्याकाळात कार्यशाळा केल्यानंतर व्हिडिओ निर्मिती सुरू केली त्यांनी ते तयार केलेले व्हिडिओ व्हाटस अप्प वर सेंड करायला सुरवात केले. Camtasia वापरुन अगदी एखाद्या पिपीटी ला आवाज लावून कधी कधी शिक्षकाचा व्हिडिओ कोपऱ्यात ठेवून तयार केलेला साधा व्हिडिओ सुद्धा त्याकाळात जादू सारखा वाटायचा.
इतर शिक्षक तो व्हिडिओ डाउनलोड करून त्यांच्या मुलांना दाखवायचे. नुकतेच त्या दरम्यान शाळां मधून प्रॉजेक्टर / टीव्ही यायला लागले होते त्या वर दाखवायला हे व्हिडिओ फार कामाला आले. मुलांसाठी हा कधीही न पाहिलेला अधभूत प्रकार होता ते तल्लीन होवून पहात बसायचे. आणि खरोखरच त्याच्या माध्यमातून मुलांची खूप चांगली प्रगती साध्य करता आली. अप्रगत मुलांसाठी हे व्हिडिओ खूप फायदेशीर ठरले
*याकाळात इंटरनेट महाग होत म्हणून व्हिडिओ शक्यतो व्हाटस अप्प वरूनच जास्त शेअर व्हायचे.*
नंतर १७ मध्ये काळ आला जिओ चा. इंटरनेट खूप स्वस्त झाल. शिक्षक युट्यूब वर शिफ्ट झाले. युट्यूब चे व्हिडिओ पहाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. युट्यूब वरील व्हिडिओंना लाखोंनी views मिळायला लागले.मुल टाइमपास साठी टिक टॉक वापरायचे आणि अभ्यासासाठी युट्यूब. चॅनल मॉनिटाईज होवून चांगले इन्कम सुरू झाले. सर्वच स्तरातील विद्यार्थी युट्यूब व्हिडिओ मोठ्या संखेने पाहत होते. आमच्या कार्यशाळेची डिमांड सुद्धा प्रचंड वाढली होती याच दरम्यान आमच्या जिल्हा परिषद पासून ते विद्यापीठा पर्यन्त राज्यात जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा झाल्या.
*आता पुढे २० मध्ये एक ट्विस्ट आला. करोना*
शिक्षकांनी क्वालिटी चा कोणताही विचार न करता जस जमेल तस फळ्यावरच शूटिंग, लाईव्ह झुम च रेकॉर्डिंग युट्यूब वर टाकायला सुरवात केली. विद्यार्थ्यांच्या मोबाईल च्या संखेत प्रचंड वाढ झाली. त्यात टिकटॉक वर सरकारने बंदी आणली युट्यूब ची viewership प्रचंड प्रचंड वाढली. याच दरम्यान युट्यूबर ची कमाई सुद्धा खूप छान झाली. पुढे युट्यूब वर लाखोंच्या संखेने युट्यूब चॅनेल सुरू झाली कोट्यवधी व्हिडिओ आले. पण दर्जा घसरला मुलांनाच काय आपल्याला सुद्धा हे व्हिडिओ पाहायला कंटाळवाणे वाटायला लागले.
आणि त्यातच समोर आले *कमी वेळेचे लक्ष वेधून घेणारे इन्स्टाग्राम.* ज्या वेगाने युट्यूब ची viewership वाढली त्याच वेगाने ती खाली आपटली. एक अंदाजा नुसार त्या काळात चॅनेल्स ची संख्या २० ते ३० पटीने वाढली पण overall viewership पाच ते दहा पट खाली उतरली. रीलस् ला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता शेवती युट्यूब ला सुद्धा रीलस् हे फीचर अॅड करावे पण तो पर्यन्त फार उशीर झाला होता.
लॉकडाऊन मध्ये प्रचंड प्रतिसाद आणि लॉकडाउन नंतर view च नाहीत याचा अर्थ असा घेतला गेला की आता व्हिडिओची गरज उरलीच नाही. जुन तेच सोन, आपला खडू फळाच बरा. पण जेव्हा NEP च्या नव्या सुचनेमध्ये डिजिटल - ब्लेन्डेड आणि व्हिडीओ वर पूर्ण भर दिलेला दिसला तेव्हा सर्वांचीच द्विधा मनस्थिति झाली, की मुल तर व्हिडिओ पाहत नाहीत (अभ्यासाचे) मग हे कस यशस्वी होणार?
*प्रश्न हा पडतो शैक्षणिक व्हिडिओ युट्यूब वर खरंच अजून सुद्धा पहिले जातात का?*
तर उत्तर आहे हो. काळानुसार आपल्याला आपल्या व्हिडिओ निर्मिती मध्ये बदल करावेच लागतात. ज्यांनी व्हिडिओ निर्मितीची पद्धत पूर्वी प्रमाणेच ठेवली त्याचे views कालांतराने कमी होत गेले. पण ज्यांनी व्हिडिओ निर्मितीच्या पद्धती बदलल्या चित्र आवाज (कॅमेरा माईक) यावर काम करून व्हिडिओ मधील सादरीकरण सतत रंजक करण्याचा प्रयत्न केला. युट्यूब ला रीलस् आणि इन्स्टाग्राम ची जोड दिली त्यांचे views हे वाढतच गेलेले आहेत.
*नव नवीन पद्धतीने दर्जेदार शैक्षणीक व्हिडिओ कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात कसे तयार करता येतील यावरच तर मी आणि कोरे सर सुरवाती पासून काम करीत आलो आहोत, आणि तेच आमचे मुख्य काम आहे.
*सर आहे त्यातच नाही जमणार का?*
*कॅमेरा ची क्वालिटी वाढवायला काही सॉफ्टवेअर आहे का?*
*आवाजाला भारी करायला काही टुल आहेत अस ऐकल आहे.*
*सर .......... काम आता ऑटोमॅटिक होते अस ऐकल आहे त्याच काय*
*सर आयफोन घेतला आहे तरी माईक लॅपटॉप घ्यावेच लागेल का?*
*गिंबल ची काय गरज आहे? मोबाईल हातात धरून सुद्धा व्हिडिओ शूट होतेच की?
*एका बाजूला आपला उद्देश असतो, आहे त्यातच साध्य करायच आणि दुसऱ्या बाजूला टॉप चे influencer असतात ज्यांचे म्हणणे असत कोठेच compromise नाही करायच (का compromise नाही करत म्हणून ते टॉप ला असतात)*
*लक्षात घ्या influencer ही लॉकडाऊन नंतर अवघ्या २-३ वर्षात बक्कळ पैसा कमावणारी उदयास आलेली नवीन पिढी*
पुढे दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेन्ट मध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा
https://www.youtube.com/watch?v=7W0ZZeUcing
भूषण कुलकर्णी
KBF Train the trainer program
7020183658
Abhi and Niyu's 1 CRORE studio tour #abhiandniyu Exclusive Mumbai studio tour of Abhi and Niyu! The story of how we built a media company out of nothing. video by Abhiraj Rajad...
कॅमेरा समोरील प्रभावी सादरीकरण हे शिक्षकासाठी वर्तमान व भविष्यातील सर्वात महत्वाचे स्किल. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर इतर ग्रुप मध्ये नक्की शेअर करा.
KBF (नॉलेज ब्रिज फाऊंडेशन) ट्रेन द ट्रेनर कार्यक्रमाच्या महत्वाच्या सोशल मीडिया लिंक्स. कृपया आत्ताच लाईक, सबस्क्राईब, फॉलो, शेयर करून ठेवा.
Whats App group Link:- https://dub.sh/kbftttp
YouTube - https://www.youtube.com/
Facebook - https://www.facebook.com/kbftttp/
Instagram - https://www.instagram.com/kbftttp/
Threads - https://www.threads.net/
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VaCAmGtI1rcrLI6Txl3Z
धन्यवाद!
एकनाथ कोरे - 9373412443
भूषण कुलकर्णी - 7020183658
नॉलेज ब्रिज फाऊंडेशन
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Flat No. 10, Second Floor, Atharv Towers, Delhi Gate Near Choupati Karanja
Ahmednagar
414001