Netri
Life assist platform for women leading enterprises across India.
13/10/2023
नमस्कार आपण आजच्या या पोस्ट मधून नेत्रीतील अजून एका नवीन महिलेची ओळख करून घेणार आहोत त्यांच्या व्यवसाय विषयी जाणून घेणार आहोत .
तर आजच्या ओळख मूर्तींचे नाव आहे :
महानंदा शिंदे
जिल्हा सोलपुर
महानंदा शिंदे ह्या आधीपासूनच एक लहान व्यवसायिका आहेत परंतु त्यांना त्यांच्या व्यवसायात इतर महिला प्रमाणे व्यवसाय फक्त वाडी व गावापुरता मर्यादित होता. तसेच मोठा व्यवसाय करण्यसाठी त्यांना नेहमी आत्मविश्वासाची कमी जाणवत असे ग्राहकासोबत कसे संबंध ठेवावे तसेच अनेकदा व्यवसायात आर्थिक तोटा होत असे शेतकरी घरातून असूनही शेती हि फक्त अन्न धान्य उत्पादाना साठी पाहत असे शेती कडे कधीही व्यवसायिक दृष्टीकोनातून पहिले जात नव्हते , तसेच मार्केटिंग च्या समस्या तर होत्याच परंतु त्याच बरोबर व्यवसायाचे आर्थिक ताळेबंध व्यवस्थित नसल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत होता . त्याच बरोबर वैयक्तिक आयुष्यात व सामाजिक आयुष्यात हि अनेक समस्या ना सामोरे जावे लागत होते .
परंतु नेत्री प्रशिक्षण च्या माध्यमातून महिलांना व्यवसाय म्हणजे नेमके काय तो कसे करावे.व्यवसायात आर्थिक ताळेबंध बंध कसा ठेवावा, आपल्या व्यवसायात आर्थिक नफा मिळविण्यासाठी आपण व्यवसायाची रचना कशा प्रकारे असावे ग्राहकासोबत कसे संबंध ठेवावे आर्थिक व्यवहार कसे असावे ,व्यवसाय अहवाल का तयार करावा ,म्हणजेच व्यवसाय विकास कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे , त्याच बरोबर महिलांना वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण.ताणतणाव, व्यवसायातील कौटुंबिक महत्व, मार्केट भेट व पाहणी व सामाजिक वागणूक यावर हि सर्व महिलासोबत सत्र घेऊन त्याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले .
नेत्री प्रशिक्षण मधून झालेले बदल खालील प्रमाणे :
१) व्यवसाय बाबत योग्य मार्गदर्शन
२) वैयक्तिक गुणाचा विकास
३) आत्मविश्वास तसेच विपणन कौशल्यात वाढ
४) विपणन बाबत अनेक मार्ग मिळाले
५) नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आत्मविश्वास निर्मिती
६)स्वतः मधील गुणावर विश्वास
७)आर्थिक उत्पन्नात वाढ
९ ) बोलण्याचे कौशल्य विकास
१०) कौटुंबिक व सामाजिक आदर
वरील फोटो मधून नेत्री प्रशिक्षण च्या माध्यमातून त्यांच्या व्यवसाय मध्ये झालेले बदल आपण पाहू शकतो
07/10/2023
स्वयम शिक्षण प्रयोग संस्था व Impactree कंपनी तसेच aspire for her च्या सहकार्याने नेत्री प्रकल्पाच्या माध्यमातून सोलापुर जिल्ह्यातील १३० महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण च्या माध्यमातून महिलांना बचत बचतीचे प्रकार बचत कशाप्रकारे करू शकतो तसेच बचतीचे भविष्यातील महत्व तसेच ग्रामीण भागातील महिलांना भारतीय पोस्ट ऑफिस बँक च्या माध्यमातून व्विविध योजनाची माहिती देण्यात आले तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र त्याची प्रक्रिया त्यांना कसा लाभ भेटू शकतो या बाबत मार्ग दर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन करण्यसाठी सोलापूर ब्रांच चे वरिष्ठ अधिकारी विनायक पासंगराव उपस्थित होते
प्रशिक्षण च्या दुसऱ्या सत्रात mutual Fund बाबत महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी JM Foundation चे पुणे ब्रांच चे वरिष्ठ अधिकारी सचिन गायकवाड यांची उपस्थिती होती .
mutual Fund मार्गदर्शन मध्ये ग्रामीण भागातील महिलांना mutual Fund चे फायदे तसेच भविष्यात mutual Fund ची गरज व वाढती मागणी या बाबत पुरेपूर माहिती देण्यात आले तसेच mutual Fund मधील इतर फंड बाबत सविस्तर माहिती देण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी स्वयम शिक्षण संस्थे कडून काकासाहेब अडसुळे तसेच सोलापूर फिल्ड लीडर वैशाली वाले व अश्विनी कोरके Impactree कंपनी कडून नेत्री प्रकल्प व्यवस्थापक तेजश्री रेखा धर्मेंद्र तसेच कंपनीचे ब्रांड व्यवस्थापक ललित अय्यर यांची उपस्थिती होती.
दोन्ही सत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १३० महिलांची उपस्थिती होते.
litracy.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Dombivli
421204