DBP Times

DBP Times

Share

Official Account OF DBP Times News Gondia Bhandara Nagpur All Maharashtra's Credible Sources OF News.

22/06/2026
27/03/2026

रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा सनसनाटी दावा..

मुंबई-डी.बी.पी टाइम्स.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सुत्रधार आहेत, असा सनसनाटी दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यांनी याविषयी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांना सहआरोपी मागणी केली आहे. रुपाली ठोंबरे यांच्या या पत्रामुळे चाकणकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
रूपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि भोंदूबाबा अशोक खरात हे काही केले आहे ते फक्त चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे केले आहे. त्यामुळे चाकणकर यांना आरोपी करण्यात यावे. खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करु शकला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते. रुपाली चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, असा गंभीर आरोप पत्रात केला आहे.
त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करेल, असे पत्रात लिहिले आहे.
मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरूद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.
दि.29/12/2025 रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.
शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी नम्र विनंती कि रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्यपरिस्थिती बाहेर आणून पीडित महिलांना न्याय द्यावा.
विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी लागेबांधे असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागले. आता आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आता चाकणकरांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकीत अशोक खरात प्रकरणामुळे पक्षाची होणारी बदनामी कशी रोखता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. यामुळे रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Gondia?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Gondia