Surendra Pathare Foundation

Surendra Pathare Foundation

Share

Public Health | Youth | Environment | Civil Issues | Women Empowerment | Sports & Arts...

Photos from Surendra Pathare Foundation's post 26/01/2026

ज्यासाठी मनापासून प्रयत्न केले, तो संकल्प दरवर्षीप्रमाणे सुफळ संपन्न झाला!

प्रजासत्ताक दिनानिमित सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेले यंदाचे ६ वे रक्तदान महाशिबीर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. यंदा ३२८७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून हे शक्य झाले ते रक्तदाते नागरिक बांधवांच्या उदात्त भावनेमुळे व सहभागामुळेच...

प्रत्येक रक्तदात्याने दिलेले योगदान म्हणजे कोणासाठी तरी नवे जीवन आहे, ही जाणीव मनाला समाधान देणारी आहे. यंदाच्या असेल किंवा या मागच्या महाशिबीराच्या यशामागे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, स्वयंसेवक व फाऊंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मोलाचे सहकार्य लाभले. दिवसभर न थकता त्यांनी केलेली सेवा निश्चितच प्रेरणादायी व ऊर्जादायी आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

गेल्या काही वर्षांपासून रक्तदान महाशिबीर हा समाजाप्रति असलेली आमची जबाबदारी बनली आहे. प्रत्येक वर्षी मिळणारा रक्तदात्या नागरिकांचा प्रतिसाद, विश्वास तसेच पाठिंबा पुढील वर्षासाठी अधिक जोमाने आयोजन करण्यासाठी ऊर्जा देतो. रक्ताची गरज व त्याचे महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार कायम आहे.

पुन्हा एकदा सर्व रक्तदाते, सहकारी, हितचिंतकांचे व शुभेच्छुकांचे मनापासून आभार...

रक्तदान महाशिबीर २०२७ मध्ये पुन्हा भेटूयात!

24/01/2026

रक्तदान करूया
मानवतेचा धर्म जपूया

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान महाशिबीराचे आयोजन केले आहे. यंदाचे हे ६ वे वर्ष असून आजवर १५ हजारहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे व त्यातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे.

या माध्यमातून सर्व नागरिक बांधवांना विनंती आहे, की या महान कार्यात सहभागी होऊन माणुसकीचे नाते जपूया.

दिनांक: २६ जानेवारी २०२६ (सोमवार)
वेळ: स. ७:०० ते सायं. ७:०० वा.
स्थळ: पठारे इनडोअर स्टेडियम, खराडी गाव

चला रक्तदान करूया, जीवनदाते होऊया!

22/01/2026

रक्तदान करूया, देशभक्ती जपूया!

येत्या २६ जानेवारी रोजी खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम येथे होणाऱ्या रक्तदान महाशिबीरात सहभागी व्हा.

01/01/2026

Today, with the beginning of the New Year, we complete 5 years. Five years of serving the community. Five years of standing with people in need, Five years of meaningful action built on trust. As we step into a new year, we renew our commitment to serve with greater purpose, responsibility, and care.

Thank you for your constant support and trust. Let’s continue creating positive change together.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Kharadi?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Office No. 3, Opp. Reliance Mart, Velstand, Kharadi, Next To Vodafone Store
Kharadi
411014

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 10am - 6am