Mass Communication
Padmashree Late Dr. G.G.Jadhav Journalism Chair is established in Department of Journalism and Mass
18/05/2026
https://youtube.com/shorts/MUIbHy4kYik?si=TQ4bvJh0ol9M_VcB
कला नगरीत चित्रपट कलेचं शास्त्रीय शिक्षण! | B.A. Film Making, Shivaji University, Kolhapur #film दिग्दर्शन, छायांकन आणि अभिनयाची नवी प्रयोगशाळा! कलेच्या या ऐतिहासिक भूमीत, शिवाजी विद्यापीठ घेऊन आले आहे चित्रपट...
अतुल देऊळगावकर यांचे विद्यापीठात सोमवारी व्याख्यान
कोल्हापूर ः प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. ‘साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमे आणि शाश्वत विकास’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आहेत.
विद्यापीठाचा हिंदी विभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. यावेळी हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर आणि विनायक देसाई उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Kolhapur