Shahu Chhatrapati Foundation

Shahu Chhatrapati Foundation

Share

DM for paid promotion

22/06/2026

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे 🙏

02/04/2026

*छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिन*

२ एप्रिल १८९४ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ते एक द्रष्टे राज्यकर्ते होते. शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. ‘अज्ञानाचे व गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही’ हा विचार मांडून त्यादृष्टीने भरीव योगदान त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात दिले. केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील शिक्षणक्षेत्राला सकारात्मक दिशा देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आणि अमूल्य म्हणता येईल असेच आहे. राजा हा राज्याचा व जनतेचा मालक नसतो, तर तो जनतेचा सेवक असतो, हे राजकीय तत्त्वज्ञान त्यांनी स्वतःच्या कृतीने जगाला दिले. छत्रपती शाहू महाराजांना ‘राज्याभिषेक दिना’ निमित्त त्रिवार मानाचा मुजरा

30/12/2025

आमच्या शाहू छत्रपती फौंडेशनचे प्रमुख आधारस्थंभ, ज्यांच्या मार्गदर्शना खाली संस्था मार्गक्रम करीत आहे, ते आमच्या संस्थेचे मार्गदर्शक मा.डॉ. जयसिंगराव पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले याचा आम्हाला आनंद वाटतो. आज त्यांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा. सरांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभावे, हीच सदिच्छा!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Rajarampuri
Kolhapur