Dhawale Bal Rugnalay

Dhawale Bal Rugnalay

Share

Dhawale Bal rugnalay is children hospital located in Mohada town of Yavatamal District (Maharashtra) run by Dr.Tushar Dhawale (M.D.) Child Specialist.

12/03/2025

"रंग खेळताना मुलांची घ्यावी ही काळजी "

मुलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. अशा वेळी होळीला रंग खेळताना थोडासा निष्काळजीपणाही त्यांच्यासाठी प्रश्न निर्माण करू शकतो. रंग आणि आनंदाचा होळीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण या सणाची उत्सुकता अनेक दिवस आधीच मुलांच्या डोळ्यांत दिसू लागते.
रंग खेळताना मुलांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
रंग खेळताना पालकांनी लक्षात ठेवाव्या या गोष्टी-

१)तेल:

होळी खेळण्यापूर्वी मुलाच्या अंगावर नारळ तेल चांगले लावा. असे केल्याने तुमच्या मुलांना कोणत्याही रंगाची एलर्जी होणार नाही आणि रंगांमुळे त्वचेचा रंग खराब होणार नाही.

२)पूर्ण कपडे:

मुलांना होळी खेळायला पाठवण्यापूर्वी त्यांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालून पाठवा. जर तुम्ही मुलाला हाफ पँट किंवा शॉर्ट्स घातली असेल तर त्यांच्या हात आणि पायांच्या उघड्या भागावर पेट्रोलियम जेली किंवा तेल लावा. असे केल्याने होळीचा रंग मुलांच्या त्वचेवर चिकटणार नाही.

३)पेट्रोलियम जेली:

नखांच्या आत पेट्रोलियम जेली लावा, जेणेकरून होळी खेळताना रंग मुलांच्या नखांच्या आत जाणार नाही.

४)केसांची काळजी:

केसांच्या मुळांमध्ये सिंथेटिक रंग लावल्यामुळे मुले अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी या होळीमध्ये रंग खेळण्यासाठी पाठवण्यापूर्वी त्याचे केस पूर्णपणे बांधून पाठवा. जेणेकरून रंग केसांच्या मुळांपर्यंत पोहोचणार नाही.

५)ऑर्गेनिक रंग:

सिंथेटिक रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. अशा स्थितीत मुलांना रंगांशी खेळण्यासाठी फक्त ऑर्गेनिक रंग द्या.

६)ओले कपडे जास्त वेळ घालू नका:

अनेक वेळा मुले रंग आणि पाण्याने बराच वेळ होळी खेळत राहतात. संध्याकाळपर्यंत ओल्या कपड्यात होळी खेळल्याने त्यांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत मुलांना जास्त वेळ ओल्या कपड्यात होळी खेळू देऊ नका.

७)पाण्याचे फुगे टाळा:

पाण्याच्या फुग्यांमुळे डोळे, नाक, कान किंवा शरीराला इजा होऊ शकते. अशा परिस्थितीत मुलांना एकमेकांवर फुगे फेकून होळी खेळण्यास मनाई करा.

29/12/2023

"मुलांची झोप"

कोणत्या वयाच्या मुलांनी किती तास झोपावं याची माहिती पालकांना असायला हवी, दररोज पुरेशी शांत झोप मिळाल्यास मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.वाढत्या वयानुसार बाळाची पुरेशी झोप होणे आवश्यक आहे. पालकांनी बाळाच्या झोपेचे योग्य ते वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते कित्येक तास झोपतं. या झोपेतच त्याची वाढ होत असते असं म्हणतात. जसं मूल मोठे होतं तसं ते झोपतं तेव्हाच काय ते घर शांत असतं. नाहीतर दिवसभर दंगा आणि मस्ती. हे सगळं ठिक आहे पण मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांची पुरेशी झोप होणे गरजेचे असते. मोठ्या माणसांसाठी झोप जशी आवश्यक असते, त्याचप्रमाणे लहानग्यांसाठी झोप ही टॉनिक असते. झोपेत त्यांचा मेंदू शार्प होतो, जास्त वेळ शांत झोपल्याने त्यांची शारीरिक, मानसिक वाढ चांगली होते असे म्हटले जाते. मूल व्यवस्थित झोपले तर त्याचा चिडचिडेपणा कमी होतो. झोप पूर्ण झाल्यास मूल एनर्जेटीक होते आणि अतिशय उत्साहाने खेळायला लागते. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यामुळे दिवसभर खेळून मूल थकते. अशावेळी त्याने झोपणे आवश्यक असते, त्यामुळे त्याचा थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच मूलांचे पोट व्यवस्थित भरलेले असेल तरीही मूल झोपण्यासाठी त्रास न देता लगेच झोपते. पण किती वयाच्या मुलाने किती झोपावे हे समजून घेणे आवश्यक आहे. पाहूयाच शास्त्रीयदृष्ट्या मुलांनी किती तास झोपायला हवे याविषयी...

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाळाच्या झोपेचे तास,

बाळाचे वय झोपेचे तास

० ते ३ महिने - १४ ते १७ तास
४ ते ११ महिने - १२ ते १५ तास
१ ते २ वर्षे - ११ ते १४ तास
३ ते ५ वर्षे - १० ते १३ तास

आता ही झोप नेमकी कधीची असा प्रश्न पालकांना पडतो. तर ही सगळी झोप फक्त रात्रीची नसून रात्रीची आणि दिवसाचे मिळून हे तास आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये मूलांच्या झोपेच्या सवयीनुसार किंवा आजुबाजूच्या वातावरणानुसार काही प्रमाणात कमी-जास्त होऊ शकते. पण शक्यतो या प्रमाणात झोप झाल्यास मूल चिडचिडे होत नाही किंवा त्याला आळस, डोकेदुखी अशा समस्या उद्भवत नाहीत. ते नव्या दमाने खेळण्यासाठी तयार होते.

० ते ३ महिने - ही झोप लहान लहान तुकड्यात होणारी असते. नव्यानेच जगात आल्याने आजुबाजूच्या गोष्टींशी, हवामानाशी जुळवून घेणारे नवजात बालक दर थोडा वेळानी उठते आणि दूध प्यायले की पुन्हा झोपते. या काळात बाळाच्या झोपेच्या वेळा, सवयी सतत बदलत असतात. मात्र अशावेळी पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही.

४ ते ११ महिने - नॅशनल स्लिप फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार या वयातील बाळांनी पूर्ण दिवसात १२ ते १५ तास झोपण आवश्यक आहे. यामध्ये साधारण बाळाची आंघोळीनंतरची २ तासाची झोप, दुपारची २ तासाची झोप आणि रात्रीची ९ ते १० तासाची झोप यांचा समावेश असतो. या वेळा प्रत्येकानुसार काही प्रमाणात बदलू शकतात. पण साधारणपणे या वयात बाळ आंघोळीने आणि दूध पिऊन तसेच हातपाय मारुन आणि इतर हालचालींमुळे थकते. पुरेशी झोप झाल्यास ते फ्रेश होते.

१ ते २ वर्षे - जसजसे मूल मोठे होत जाते त्याची झोप कमी होत जाते. एकदा ते चालायला लागले की त्याचे खेळणे वाढते. तसेच दंगा कऱण्याचे प्रमाणही वाढते. अशावेळी झोपेचा वेळ आधीपेक्षा निश्चितच कमी होतो. या वयातील मुले दमून झोपतात. या वयात त्यांचा मेंदू वेगाने काम करत असतो. झोपेमध्ये बाळाची उंची वाढते असेही म्हटले जाते. दिर्घकाळ व्यवस्थित झोप झाल्यास बाळाचा मेंदू उत्तम मोटर कौशल्ये संपादित करतो.

३ ते ५ वर्षे - या वयातील मुले शाळेत जातात, शाळेतील अॅक्टीव्हीटी, इतर मित्रमंडळींबरोबरचे खेळणे आणि घरातील दंगा यामध्ये मूल पूर्णपणे बुडून गेलेले असते. अशावेळी मुले दिवसा झोपण्यासाठी किरकिर करतात, रात्रीही जागवतात. परंतु ही मुले एकदा झोपली की गाढ झोपतात. अशावेळी ते सकाळी त्यांची झोप पूर्ण झाल्यावर उशीरा उठतात.
लहानपणापासून म्हणजेच साधारण वयाच्या ६ महिन्यानंतर बाळाचे झोपेचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. बाळाला साधारण कोणत्या वेळेला, कोणत्या गोष्टी केल्यावर झोप येते हे समजून घेत आईने आणि घरातील इतरांनी त्याचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. त्याचा बाळाच्या शांत आणि नियमित झोपेसाठी चांगला फायदा होतो. तसेच बाळाचे झोपण्याचे तास लक्षात ठेवा. बाळ किती वेळा भुकेनी उठते याचीही नोंद ठेवणे गरजेचे आहे. बाळ झोपत असलेली खोली शांत, हवेशीर आणि प्रसन्न असेल याची काळजी घ्या, जेणेकरुन बाळ वेळच्या वेळी झोपण्यास त्याची निश्चितच मदत होईल. बाळ हळूहळू जसे मोठे होते तशी दिवसाची झोप कमी होऊन रात्रीची झोप वाढते. तेव्हा रात्री ते लवकर झोपेल आणि सकाळी लवकर उठेल याची काळजी घ्या.

Want your business to be the top-listed Beauty Salon in main road?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Main Road , Near Ram Mandir
Main Road
445323

Opening Hours

Monday 9:45am - 7pm
Tuesday 9:45am - 7pm
Wednesday 9:45am - 7pm
Thursday 9:45am - 7pm
Saturday 9:45am - 7pm
Sunday 9:45am - 7pm