Real Info World
रिअल इन्फो वर्ल्ड
01/11/2025
अशा माणसाला कधीही हलके समजू नका!
१. जो शांत राहतो त्याची बुद्धी सर्वात तीक्ष्ण असते.
२. जो कमी दाखवतो, त्याची ताकद त्याच्या कृतीत असते, त्याच्या शब्दात नाही.
३. जो माणूस संकटातही हसतो तो आतून सर्वात बलवान असतो.
४. पराभव स्वीकारूनही जो शिकतो तोच खरा विजेता बनतो.
५. जो सर्वांचा आदर करतो त्याला आतून स्वतःचे मूल्य कळते.
६. जो कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो तो त्याची वेळ आल्यावर सर्वांना आश्चर्यचकित करतो.
७. जो आपले दुःख लपवतो त्याच्यातच इतरांना हाताळण्याची ताकद असते.
22/10/2025
आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं...❤❤
'माझं चुकलं' , बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो...
कुणाशी वाद घालण्यात बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं, भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटतं नाही...
आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटतं नाही...
'चूक - बरोबर' च्या पलीकडे पण एक जग असतं, जिथं फक्त शांतता असते...
आधी दुनिया खूप पुढे चालली आहे, लोकं फार वेगाने धावत आहेत, आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं...
पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्याप्रकारे बघता येऊ शकते...
आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपल्या कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालतं रहायचं. वाटेत सुखं दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं...🙂🚶♀️
#आनुभवाच्या___पुस्तकातुन...☺🙌
Click here to claim your Sponsored Listing.