Prose Publications
Publication house from Pune, working with and for, new authors!
24/02/2023
नमस्कार मंडळी!
प्रोज पब्लिकेशन्स , साहित्यकट्टा अंतर्गत उपक्रम:
१२ फेब्रुवारीला झालेल्या 'एक गोष्ट सांगू?' या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमातील ही काही क्षणचित्रे!
दमदार कथा, तितकंच उत्तम सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम ही श्रोते- प्रेक्षक यांच्यासाठी पर्वणीच ठरला.
या कार्यक्रमात निवडल्या गेलेल्या कथा, त्यांचे लेखक, आणि अभिवाचक याप्रमाणे-
१. आचमन- लेखिका- विद्या बालवडकर (पुणे)
अभिवाचक- डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
२. अखेरचा शब्द- लेखक-संतोष जाधव (मुंबई)
अभिवाचक - गणेश ईनामदार
३.डोहाचा तळ- लेखिका- प्राची देशपांडे(पुणे)
अभिवाचक- सायली मराठे
४.येणार आहे तुम्हाला भेटायला- लेखक- चंदर भागवत(मुंबई)
अभिवाचक- चिंतामणी केळकर
५. वीज- लेखक- चारुदत्त गोरे(पुणे)
अभिवाचक- गणेश ईनामदार
या सगळ्याच कथा storytel या app वर तुम्हाला audiobook स्वरूपात लवकरच ऐकता येणार आहेत. त्याचबरोबर यांचं प्रत्यक्ष सादरीकरण देखील व्हिडीओ स्वरूपात तुम्हाला youtube चॅनल वर पाहता येईल.
वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर
असे.
मा. किरण केंद्रे - संपादक किशोर, बालभारती
मा. वैशाली पतंगे - additional commissioner GST , Pune , अपर आयुक्त GST पुणे
मा. आनंद अवधानी- व्यवस्थापकीय संचालक युनिक फीचर्स
मा. अभिराम अंतरकर- हंस
या सर्व मान्यवरांचे सुबोध मार्गदर्शन, त्यांनी केलेली चर्चा देखील youtube वर पाहता येईल.
त्याचबरोर अक्षरधारा बुक गॅलरी च्या मा. रसिका राठीवडेकर यांनीही यात निवडल्या गेलेल्या लेखकांसाठी कुपन स्वरूपात सदिच्छा भेट दिली, त्यासाठी त्यांचेही खूप आभार!
मराठी टी-शर्ट , यांच्यातर्फे देखील सर्व लेखक व अभिवाचक यांच्यासाठी कुपन्स देण्यात आली, त्याबद्दल त्यांचेही आभार!
भांडारकर इन्स्टिट्यूट च्या , 'नवलमल फिरोदिया' या अद्ययावत प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. ते उपलब्ध करून देणे, तसेच कार्यक्रमासाठी लागणारी सर्व तांत्रिक मदत करणे यासाठी
भांडारकर इन्स्टिट्यूट आणि तेथील मा.भूपाल पटवर्धन, मा.श्रीनिवास कुलकर्णी यांचेही खूप आभार!
यातील प्रत्येक सदारीकरणाला साजेसं उत्तम संगीत देणारे अमित पाटील, सुरज सोळसे, आणि सुरज कदम यांनाही धन्यवाद!
महत्वाचं म्हणजे 'एक गोष्ट सांगू?' या कथा अभिवाचन कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत तिथे प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते आणि प्रेक्षक यांचे खूप आभार!
लवकरच या माळेतील पुढचा कार्यक्रम जाहीर करूच.
-
प्रोज पब्लिकेशन्स
01/02/2023
नमस्कार मंडळी,
डिसेंबर महिन्यात आपण एक कथा स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये काही भयकथा ,रहस्यकथा मागवल्या होत्या. त्यातून आता ५ कथांची निवड झालेली आहे!
नेमक्या कशासाठी?
तर प्रोज पब्लिकेशन्स मार्फत साहित्यकट्टा अंतर्गत आपण घेत आहोत अभिनव कथा अभिवाचनाचा कार्यक्रम - एक गोष्ट सांगू?
दिनांक: १२ फेब्रुवारी २०२३ , रविवार
वेळ: सायंकाळी ५.३० ते ८.३०
स्थळ: फिरोदिया ऑडिओटोरिम भांडारकर इन्स्टिट्यूट, भांडारकर रोड ,पुणे.
या कार्यक्रमात नेमकी कोणाकोणाच्या कथांची वर्णी लागली आहे?
येणार आहे तुम्हाला भेटायला-
चंदर भागवत, मुंबई
डोहाचा तळ- प्राची देशपांडे , पुणे
आचमन- विद्या बालवडकर ,पुणे
अखेरचा शब्द- संतोष जाधव ,मुंबई
पाचवी कथा - अजून गुलदस्त्यात!
तर भेटूया १२ फेब्रुवारी च्या या कार्यक्रमात.
या लिंक वरून तुम्ही तुमची जागा आजच राखून ठेवा! https://bit.ly/EkGoshtaSangu
*प्रवेश विनामूल्य. काही जागा राखीव.
कार्यक्रम लहान मुलांसाठी नाही - वयोगट 18 आणि पुढे.
प्रवेशाचे हक्क प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
-
प्रोज पब्लिकेशन्स,पुणे
एक गोष्ट सांगू ? अनोखी कथा स्पर्धा!
स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचा भरघोस प्रतिसाद येतोय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद! आता मात्र कथा पाठवण्याची अंतिम तारीख जाहीर करत आहोत.
अंतिम तारीख : १० जानेवारी २०२३. भयकथा आणि रहस्यकथा, आम्ही अजूनही शोधतोय... लेखक मित्रमंडळींना टॅग करा, किंवा शेयर करा:
स्पर्धेसाठी नोंदणी फॉर्म - https://forms.gle/SgMoRmJocqwNyoCn6
यातून उत्तम कथांची निवड होईल.
निवड झालेल्या कथा उत्तम अभिवाचकांकडून सादर केल्या जातील. हा जाहीर कार्यक्रम आपण पुण्यात करतोय.
आणखीन एक महत्वाचं,
तुमच्या निवड झालेल्या कथेला इतर कथांसोबत Audiobook मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच हजारो, लाखोंच्या संख्येने या कथा ऐकल्याही जातील!
चला तर, पट्कन कथा पाठवा, आणि आमच्या मेल ची वाट बघा!
कथा पाठवण्यासाठी
-प्रवेश शुल्क, १००/₹ मात्र.
-कथा केवळ स्वलिखितच असावी
-कथेच्या निवडीचे अधिकार प्रोज पब्लिकेशन्स कडे राखीव.
-नियम व अटी लागू.
प्रोज पब्लिकेशन्स.
Dr. Urjita Kulkarni Soham Sabnis Vidya Chandrakant Balwadkar Aditi Bhave Dhange Charudatta Gore