Deva Zinjad
लिहायचं फक्त माणसांची डोकी नांगरण्यासाठी...
माणसं जोडत रहायची. आजन्म विद्यार्थीच...
13/06/2026
#माझी_रोजनिशी:
# *मेंदूची_मशागत*
आदरणीय देवा झिंजाड लिखित 'मेंदूची मशागत' या पुस्तकाबद्दल समाज माध्यमातून खूप साऱ्या प्रतिक्रिया वाचत होतो. मग काही दिवसांनी पुस्तक मागवले, पण कामामुळे वाचायला वेळ मिळत नव्हता. गेल्या आठवड्यात तब्बेत बरी नव्हती म्हणून ऑफिस ला सुट्टी घेतली होती. मग पुस्तक हातात घेतले आणि वाचू लागलो.
मेंदूची मशागत हे केवळ एक पुस्तक नसून, लेखकाचे अनुभव आहेत. त्यांच्या संघर्षाच्या अनुभवातून आपल्याला जीवनाबद्दल अचूक मार्गदर्शन मिळते. मेंदूची मशागत होऊन चांगले विचार पेरले जातात. पुस्तकातून समाजातील अनेक वाईट प्रथांना, वाईट चालीरितींना छेद दिला जातो.
घरातील लहान मुलांना वाचायला दिले तर या पुस्तकातून चांगले विचार नक्कीच पेरले जातील. भाषा साधी सरळ असल्यामुळे मुलांना व आपल्यालाही वाचायला मजा येते. लेखकाला ग्रामीण पार्श्वभूमी लाभल्यामुळे आणखी वाचायला आपलेपणा वाटतो.
आपल्या आईचे कष्ट, स्वतःला चपलेच्या एका जोडसाठी करावा लागणार संघर्ष आणि त्यातून होणारी निराशा, पायाला चटके लागू नये म्हणून वडाची पाने पिशवीत भरून ते पायाला बांधून तो उन्हाचा प्रवास खरंच हृदय पिळवून टाकतो.
हे पुस्तक मी रोज थोडे-थोडे वाचत 4-5 दिवसांनी संपवले. आता मुलांना ते वाचायला दिले आहे. मन लावून वाचत आहेत. त्यांची 10 प्रकरणे वाचून झाली. पुस्तक वाचून झाल्यावर त्यांना पुस्तकाच्या किंमतीएवढे आवडेल ते गिफ्ट देण्याचे कबूल केले आहे. आपल्या मुलांवर वाचन संस्कार मुलांवर होण्यासाठीची लेखकाची कल्पना यातूनच मला वरील कल्पना सुचली.
धन्यवाद देवा सर! असेच मार्गदर्शन करत रहा. आपले 'एक भाकर तीन चुली' अजून वाचायचे आहे. लवकरच अभिप्राय कळवतो.
मेंदूची मशागत
देवा झिंजाड
संदीप रा.पाटील
अमळनेर, जळगांव.
9764605856
त्यांना तिच भाषा कळते. बाकी काही नाही.
Click here to claim your Sponsored Listing.