The First Three Institute for Child Development
A space for babies and parents to grow and learn together The brain develops most rapidly in the first three years of life.
दोन कुटुंब त्यांच्या बाळांसोबत एका ठिकाणी बसली होती. मोठे आपापल्या गोष्टीत मग्न होते. बाळं अधूनमधून एकमेकांची दखल घेत होती.
एक बाळ दुसऱ्या बाळाला खूप हातवारे करून उडणारी माशी दाखवत होतं. पण त्याचा हात, बोटं त्याच्या मनासारखं वागेपर्यंत माशी अर्थात उडून जात होती. तेवढ्यात त्याला जमिनीवर अजून एक माशी दिसली. त्यानी अतिशय उत्साहानी पुन्हा माशीकडे बोट केलं. अख्ख्या शरीरानी "बघ ना गं sss " असं म्हणताना त्याचं बोट माशीच्या खूपच जवळ गेलं. आणि.....माशी उडलीच नाही! त्या क्षणभरात, आत्तापर्यंत आपण गोळा केलेली माहिती सदोष आहे का काय, अशी शंकेची पाल बाळाच्या मनात चुकचुकली. कपाळावर आठी आली. एरवी बोट जवळ नेल्यावर हा प्राणी पटकन हलत असतो आणि हे काय वेगळंच ? परीक्षण करून आपला निष्कर्ष बदलायला हवा असं दिसतंय, अशा गहन विचारात मेंदू असतानाच मागून आवाज आला , "आं ss खाली हात नको लावू sss"
बरोबर आहे, बाळाचे हात कुठे लागतायत याकडे लक्ष हवंच, पण बाळाचं लक्ष कुठे जातंय, मेंदू काय करतोय इकडेही लक्ष गेलं तर आपल्यालासुद्धा किती मज्जा येईल! कारण चक्क मेलेली माशीपण काहीतरी महत्त्वाचं शिकवतीये बाळाच्या शाळेत येऊन 😊
Click here to claim your Sponsored Listing.