Marathi Media

Marathi Media

Share

Marathi movie celebrate dasing webserver

10/07/2026

राज्यात 1 जून ते 8 जुलै या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला असून 78 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना निकषानुसार प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.

10/07/2026

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्न किंवा इतर शुभकार्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीची मोठी अडचण भेडसावत असते. अनेकदा ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर किंवा अन्य अवैध वाहनांचा वापर केला जातो. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळ लवकरच शेतकरी कुटुंबांना विशेष सवलतीच्या दरात बससेवा उपलब्ध करून देणार आहे.

महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बसेसच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे एसटी बस उपलब्ध होणार असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने लग्न सोहळ्यात वन्हाडी, पाहुण्यांसाठी ट्रक, टेम्पोसारखी वाहने आपोआप टाळली जातील.

06/07/2026

शहरातील वाहतूक कोंडी कायमची फोडण्यासाठी १,०२०.५० कोटी रुपयांचा 'एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्प सज्ज होत आहे. या महत्त्वाकांक्षी मार्गामुळे सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. राज्य सरकारच्या खंबीर पाठबळामुळे हा प्रकल्प सोलापूरचा चेहरामोहरा बदलणार यात शंका नाही!

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Pune