Ddlpune

Ddlpune

Share

We are non-profit online platform dedicated to building equitable resources for Marathi Literature Community

16/07/2020

दादांची डिजिटल लायब्ररी
Ddlpune काय आहे ..?

मित्रांनो ! डिजिटल लायब्ररी काय आहे ? असा प्रश्न आम्हाला खूप वेळा विचारला जातो. त्यावर हे....
साहित्यावर,संगीतावर प्रेम करणारा,चित्रकला-शिल्पकला,विविध लोककलां आणि अनेक दर्जेदार नाटकांचा चाहता आणि चोखंदळ असा जगभरातील रसिक-प्रेक्षक-वाचकवर्ग मोबाईल-इंटरनेटच्या माध्यमातून जोडला गेला आहे.ज्यात विविध वयोगटातील कला साहित्यावर प्रेम करणारे लोक साहित्य वाचण्याची,ऐकण्याची आणि बघण्याची इच्छा बाळगतात. ह्या सर्वांचाच हा ''ऑनलाइन डिजिटल कट्टा'' आहे. पुस्तक रूपातील लिखित कथा,कविता,नाटकं किवा पारंपारिक ओव्या,अध्यात्मिक गद्य-पद्य इत्यादी उपलब्ध सर्व वाचिक वाड्मय यावर आधारित कार्यक्रमांची ऑडीओ आणि व्हिडीओ स्वरुपात पुनर्निर्मिती करून असे कंटेंट डिजिटल माध्यमावर आणि सोशल माध्यामांवर प्रकाशित आणि प्रसिद्ध केले जातात.

निर्मितीसाठी विविध प्रकारे कवितेचे किंवा लघुकथेचे नाट्य सादरीकरण,वाचिक अभिनिवेशाने निवेदन किंवा लघुपट,मुलाखत आणि नाट्य, असे वर्गीकरण करून संहिताबद्ध रूपरेषा आखली जाते. वेबमालिका किवा पॉडकास्टिंग ऑडीओ, वाचकांचे सादरीकरणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, अभिनय,वाद्य वादन आणि शिल्पकला किवा चित्रकलेवर आधारित कार्यक्रम निर्मितीसाठी कलाकारांना पाचारण करून सर्व वयोगटातील कलाकारांना सहभाग दिला जातो.आणि सर्वांना पुन्हा पुन्हा आस्वाद घेता यावा यासाठी या सर्व कार्यक्रमांचे डिजिटल अर्काइव्ह तयार केले जाते..
पुस्तकातील निवडक साहित्य पॉडकास्ट सिरीज,वेब व्हिडिओ सिरीज आणि इतर अनेक मालिकातुन वेबसाईट वरून प्रसारीत केले जाते....
हिच दादांची डिजिटल लायब्ररी.ddlpune

कविता -"अहवाल" I अभिवाचन कवी उत्तम कोळगावकर I DDL-"ऐकू आनंदे" 16/07/2020

https://www.youtube.com/watch?v=k0sKoOwHy_Q&t=1s

कविता -"अहवाल" I अभिवाचन कवी उत्तम कोळगावकर I DDL-"ऐकू आनंदे" DDL म्हणजेच दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत साहित्याचा श्रवणीय आनंद देणारी साप्ताहिक ऑडीओ मालिका "ऐकू आनंदे"- ४ क.....

हरफन मौला I डॉ संगीता बर्वे यांची कविता I HARPHAN MOULA I DR SANGEETA BARVE 25/06/2020

जेष्ठ बाल साहित्यिक संगीता बर्वे यांनी सादर केलेली त्यांचीच एक सुंदर कविता डीडीएलपुणे ऐकू आनंदे या पूर्वप्रसारीत मालिकेतील !

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता राजीव बर्वे (माहेरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावच्या संगीता प्रभाकर गोंगे) या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. संगीताचे वडील शाळेत चित्रकला शिक्षक होते. संगीताबाईंना इयत्ता चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद लागला.
संगीता बर्वे या प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्या स्नुषा आहेत.
मुळशी तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात झालेल्या २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या..

हरफन मौला I डॉ संगीता बर्वे यांची कविता I HARPHAN MOULA I DR SANGEETA BARVE प्रेरणाविरेंद्र निर्मित दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत "ऐकू आनंदे" भाग -२ दिग्दर्शन-प्रेरणा आणि विरेंद्र निर्....

डॉ. यशवंत मनोहर यांची कविता I माय मराठी I MAY MARATHI I DR.YASHWANT MANOHAR 23/06/2020

एक आठवण !

डॉ. यशवंत मनोहर यांची कविता I माय मराठी I MAY MARATHI I DR.YASHWANT MANOHAR दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत मराठी भाषा दिवस २०१८ आयोजक दादांची डिजिटल लायब्ररी संकल्पना दिग्दर्शन-विरेंद....

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

Pune

Opening Hours

Saturday 12pm - 8pm
Sunday 12am - 9pm