Rohan Gaikwad
I believe in Vision , Patience & Achievement. Rohan Gaikwad = People's Voice.
23/06/2026
वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येत्या प्रभाग समिती बैठकीसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे व निवेदन आज मा. सहाय्यक आयुक्त यांना सादर करण्यात आले.
प्रभाग समिती ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये केवळ निवडून आलेल्या नगरसेवकांनाच उपस्थित राहण्याची व सहभाग घेण्याची परवानगी असावी. नगरसेवकांचे नातेवाईक, स्वयंसेवक, कार्यकर्ते, बॉडीगार्ड, चालक अथवा इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना बैठकीत उपस्थित राहण्याची किंवा आसनस्थ राहण्याची परवानगी देऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
मागील प्रभाग समिती बैठकीचे फोटो व उपलब्ध माहितीनुसार काही नगरसेवकांचे नातेवाईक व इतर व्यक्ती बैठकीत उपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते. लोकशाही प्रक्रिया, प्रशासकीय शिस्त आणि संविधानिक मूल्यांचे पालन होण्यासाठी अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे.
तसेच मागील प्रभाग समिती बैठकीसंदर्भातील सर्व कागदपत्रे व अहवाल माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात आले असून, त्याबाबतही मा. सहाय्यक आयुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकशाही व्यवस्थेचा सन्मान राखत पारदर्शक व जबाबदार प्रशासनासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील.
रोहन विलास गायकवाड.
8087709147.
" वानवडी क्षेत्रीय कार्यालय "
"प्रभाग समितीचा कारभार की लोकशाहीची थट्टा?"
अधिकृत कागदपत्रांसह संपूर्ण खुलासा.
प्रभाग समितीतील उपस्थिती, ठराव आणि वास्तव काय?
लवकरच फेसबुक लाईव्ह.
15/06/2026
सन्माननीय श्री. सचिनजी खंडेलवाल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
यावेळी उदयबाग–सोपानबाग तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक १८ मधील विविध विकासकामे, स्थानिक नागरिकांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सकारात्मक संवाद झाला.
या सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी माझ्या वतीने तसेच कु. निकिता जगताप यांच्या वतीने पूर्ण सहकार्य व पाठपुरावा करण्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.
Sachin Vijay Khandelwal
पाणी हा अधिकार, Undertaking Letter ( हमीपत्र ) चा अन्याय मान्य नाही.
NIBM Annexe, Mohammadwadi & Undri.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Pune
411048