Yuva Ladha
'Yuva Ladha' is a media/news company. It has been publishing a magazine since 2013.
वाढदिवस आईचा अन् शुभेच्छा देतो गर्लफ्रेंडला - संग्राम भंडारे महाराज
आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने दिंड्या निघालेल्या आहेत. पंढरपूरच्या रस्त्यांवर जागोजाग वारकऱ्यांच्या स्वागताचे बॅनर लागत आहेत. यात मुस्लिम समाजाकडून लावण्यात येत असलेल्या बॅनरला कीर्तनकार संग्राम भंडारे महाराज यांनी विरोध दर्शवत टीका केली आहे.
13/07/2026
Donald Trump | अमेरिकेने इराणवर हल्ल्याची तयारी केली आहे. अशातच इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येविषयी विधान केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशातील शांती वार्ता फिसकटली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ट्विटरच्या माध्यमातून धमकी दिली आहे.
12/07/2026
अमेरिकेने इराणवर हल्ल्याची तयारी केली आहे. अशातच इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)चे प्रवक्ते इब्राहिम झोल्फघारी यांनी आखाती देशांतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना युद्धाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जगावर पुन्हा युद्ध व तेल संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.
Kalyan Accident | कल्याणमधील इमारतीचा मोठा भाग कोसळला; खिडकीतून उडी मारत वाचवला जीव
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात रविवारी दुपारी री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी सुमारे 2 वाजून 5 मिनिटांनी ही घटना घडली असून, इमारतीचा मोठा भाग थेट रस्त्यावर कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारतीलगत राहणाऱ्या मोरे कुटुंबाने वेळेवर धोका ओळखत आपल्या घरातील स्वयंपाकघराच्या खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. मात्र, या दुर्घटनेत त्यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पाडकामादरम्यान पुरेशा सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप केला आहे. विकासकाच्या कथित हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Jayant Patil | भूकंपात झोपडी पडली नाही पण पूल कसा पडला - जयंत पाटील
नांदेड-लातूर महामार्गावरील विष्णुपुरी उड्डाणपुलाचा काही भाग नुकताच कोसळला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. "भूकंपात झोपडी पडली नाही पण पूल पडला असे सरकार कसे म्हणू शकते," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ंतपाटील
आमची लढाई प्रवरेच्या सभासदांच्या हक्काच्या पैशांसाठी - डॉ. सुजय विखे पाटील
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट घोषणा केली. आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांनी गुरुवारी (दि. ९) स्पष्ट केले.
08/07/2026
Donald Trump | अमेरिका व इराण यांच्यातील चर्चा फिसकटली आहे. अमेरिकेने बुधवारी (दि. ८) पहाटे इराणवर हवाई हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य समोर आले आहे.
08/07/2026
Staff Reduction | मायक्रोसॉफ्टने ४८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा घेतला निर्णय; 'AI'कडून तरुणांच्या रोजगाराला पहिला मोठा धक्का
मायक्रोसॉफ्टने अंदाजे ४,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हा निर्णय का घेतला, याचे स्पष्टीकरण कंपनीच्या एचआर प्रमुखांनी दिले आहे. मायक्रोसॉफ्टने अलीकडेच आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २.१ टक्के म्हणजेच अंदाजे ४,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. यामुळे खर्च कमी करण्यासाठी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कंपनी कर्मचाऱ्यांची छाटनी करत आहे. गेल्या वर्षी, याच सुमारास, कंपनीने अंदाजे १५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
08/07/2026
PCMC Building Collapse | मोशीमध्ये कचरा डेपोची इमारत खचली; सुमारे १२ कर्मचारी अडकल्याचा अंदाज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील इमारतीचा पाया अचानक बुधवारी (दि. ८) सायंकाळी अचानक खचला. त्यामुळे ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यावेळी या इमारतीत १० ते १२ कर्मचारी असावेत असा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी बचाव कार्य करत आहेत.
07/07/2026
उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर ओसरणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.
Click here to claim your Sponsored Listing.