Shrinath Bhimale
अध्यक्ष - स्थायी समिती पुणे महानगरपालिका
मा. सभागृह नेते पुणे मनपा Leader of house, Pune Municipal Corporation. Corp
18/06/2026
📍बिबेवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
आज दि. १८ जून रोजी प्रभाग क्र. २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क परिसरातील नियोजित पावसाळी कामे तसेच विविध विकासकामांच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी, अभियंते आणि विभागीय प्रतिनिधी यांच्यासमवेत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेल्या जलनिस्सारण व्यवस्था, नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पथदिवे, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन ती निर्धारित कालमर्यादेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत विकासकामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न पुढेही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आपला,
श्रीनाथ यशवंत भिमाले
अध्यक्ष – स्थायी समिती, पुणे महानगरपालिका
मा. सभागृह नेते, पुणे मनपा
यावेळी उपायुक्त माधव जगताप, वार्ड ऑफिसर शीतल वाकडे, नगरसेविका तथा बिबवेवाडी प्रभाग समिती अध्यक्षा मनीषाताई चोरबेले, नगरसेविका सिद्धीताई शिळीमकर, नगरसेवक प्रसन्नजीत वैरागे व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |