yash

yash

Share

yash

Photos from Solapur vision news's post 11/05/2026
11/05/2026
09/05/2026

राजकीय कटुतेला पूर्णविराम? देवेंद्र कोठे-अमोल शिंदे एकाच फ्रेममध्ये; सोलापुरात चर्चांना उधाण”

सोलापूर व्हिजन

सोलापूर, दि.९ मे


माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर शहराच्या राजकारणात शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांच्यातील राजकीय दुरावा सातत्याने चर्चेत राहिला होता. एकेकाळी एकाच प्रभागातून निवडून आलेले आणि जवळचे मित्र मानले जाणारे हे दोन्ही नेते पुढे राजकीय प्रतिस्पर्धी बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भाजपचे तब्बल ८७ नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे केवळ दोन आणि शिवसेनेचे काहीच सदस्य निवडून आले. मात्र संख्याबळ कमी असूनही शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली होती.

विशेषतः शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर थेट टीका करत राजकीय वातावरण तापवले होते. अनेकदा दोन्ही नेत्यांतील संघर्ष आणि शाब्दिक चकमकी शहराच्या राजकारणाचा चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

दरम्यान, सोलापुरातील एका विवाह सोहळ्यात

आमदार देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे एकाच मंचावर आले. यावेळी दोघांनी हातात हात घालून नवदांपत्यासोबत फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहराच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या नागरिकांनाही दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला. दीर्घकाळ राजकीय विरोधात उभे ठाकलेले हे नेते एका फ्रेममध्ये दिसल्याने “राजकारणात काहीही कायम नसते” याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

08/05/2026

“काँग्रेस संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी इतिहास विसरू नये”; चेतन नरोटेंचा सचिन कल्याणशेट्टींवर पलटवार

सोलापूर व्हिजन

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेस संपेल या भ्रमात कोणीही राहू नये. काँग्रेस ही केवळ राजकीय पक्ष नसून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेली विचारधारा आहे,” असे नरोटे यांनी म्हटले.

नरोटे म्हणाले की, इंग्रज सत्तेलाही काँग्रेस संपवता आली नाही. आजही देशभरात काँग्रेसचे शेकडो आमदार, शंभरहून अधिक खासदार आणि अनेक राज्यांत सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेसला कमी लेखण्यापूर्वी भाजपने स्वतःचा इतिहासही आठवावा. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

भाजपवर टीका करताना नरोटे यांनी निवडणुकांमध्ये दबावतंत्र, प्रशासनाचा वापर, विरोधकांवर चौकशांचा ससेमिरा आणि साम-दाम-दंड-भेदाच्या राजकारणाचा आरोप केला. सोलापूरमधील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवारांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा उल्लेख करताना नरोटे म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर प्रणितीताई शिंदे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली आहे. “राज्यात कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना, टीका करणाऱ्यांना स्तर शिकवण्यापेक्षा उत्तर देणे गरजेचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करून त्यांच्या कामाचा वेग कमी होणार नाही, असे सांगत नरोटे यांनी त्यांच्या जनसंपर्क आणि लोकसेवेच्या कार्याचे कौतुक केले. “सोलापूरच्या जनतेच्या मनात त्यांचे स्थान हे भाषणांमुळे नव्हे, तर कामामुळे निर्माण झाले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

07/05/2026

“७४० कोटींच्या महामार्गावरून श्रेयवाद पेटला;

मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी निधी आमच्या दोघांच्या पाठपुराव्यानेच; आ.कल्याणशेट्टींचा खा.शिंदेंवर पलटवार”

सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि.७ मे

जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली असताना मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी ७४० कोटींचा निधी त्यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला, हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे. या कामाचा आराखडा मंजूर झाल्यानंतर केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून खासदार शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी आमदार सुभाष देशमुख आणि आपण स्वत: प्रयत्न केले आहेत. ७४० कोटींचा निधी हा आमच्या दोघांच्या प्रयत्नांमुळेच मिळाला असल्याचा दावा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे.
गुरुवारी, आमदार कल्याणशेट्टी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस पक्ष आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मोहोळ-वळसंग राष्ट्रीय महामार्गासाठी ७४० कोटी मंजूर झाले. यासाठी आमदार देशमुख यांच्यासोबत आपणही प्रयत्न केले. त्यामुळे या कामाचे श्रेय सुभाषबापूंसह मलाही आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडून या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार देशमुख व मलाही पत्र प्राप्त झाले. आमदार देशमुख हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे व केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जिव्हाळ्याचे संबंध जगजाहीर आहेत, हेही आमदार कल्याणशेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.
जनमताअभावी लोप पावत चाललेल्या काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तारतम्य बाळगावे, असा सल्लाही आमदार कल्याणशेट्टी यांनी दिला.

स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेत्यांनी सतत दिल्ली-मुंबई न करता मतदारसंघात थांबणे गरजेचे आहे. मात्र खासदार शिंदे मतदारसंघाच्या विकासाऐवजी कायम दिल्ली-मुंबई वारीवर असतात. देशात काँग्रेस नेते राहुल गांधी तर सोलापुरात खासदार शिंदे यांच्या भूमिकेने काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ होत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला त्या बळच देत आहेत. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्याविषयी बोलताना थोडा संयम बाळगावा, असा उपरोधिक टोलाही आमदार कल्याणशेट्टी यांनी लगावला.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी १४ मे रोजी सोलापुरात

अक्कलकोट तालुक्यातील विविध रस्त्यांच्या लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे १४ मे रोजी अक्कलकोट दौर्‍यावर येत आहेत. लवकरच त्यांचा अधिकृत दौरा प्राप्त होईल, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

Want your business to be the top-listed Media Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

Kumtha Naka
Solapur
413003