Shobha Banshetti

Shobha Banshetti

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shobha Banshetti, Politician, Shukrawar Peth, Behind Ajoba Ganapati Mandir, Solapur.

बनशेट्टी आप्पा प्रतिष्ठानचा उपक्रम... भाविकांना महाप्रसादाचं केले वाटप... | VIRSHIV SABALE TRUST 21/08/2025

*https://youtu.be/hNudehSyiHA?si=d6Ayp4y3YnLQzf4F*

बनशेट्टी आप्पा प्रतिष्ठानचा उपक्रम... भाविकांना महाप्रसादाचं केले वाटप... | VIRSHIV SABALE TRUST बनशेट्टी आप्पा प्रतिष्ठानचा उपक्रम... भाविकांना महाप्रसादाचं केले वाटप...

29/07/2025

सोलापुरच्या विकासाचे कर्मयोगी माजी महापौर व नगराध्यक्ष लिंगैक्य विश्वनाथ ( आप्पा ) बनशेट्टी
यांच्या जयंतीनिमित्त आप्पांचा सोलापुरच्या जडणघडणीत असलेला महत्वाच्या योगदानावर विशेष प्रकशझोत.

आप्पांचा जन्म २९ जुलै १९१३ साली कसब्यातील हब्बुंच्या वाड्यात झाला . अगदी प्रतिकुल परिस्थितीत आप्पांनी आपल्या वडिलांचा परंपरागत व्यवसाय मधला मारुतीच्या रस्त्यावर बसुन वनौषधी विक्री करायचे. कालांतराने आप्पांनी अपार मेहनतीने मधला मारुती परिसरात वनौषधीचे दुकान चालु केले. अशा रीतीने संसाराचा गाडा हाकत आप्पांनी राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्रातील अकरा वेळा निवडून येणारे नगराध्यक्ष व महापौर झालेले एकमेव व्यक्तिमत्व अशी त्यांची इतिहासात नोंद आहे.

आप्पां नगराध्यक्ष व महापौर असताना औज सोलापुर आणि उजनी सोलापुर पाण्याची पाईपलाईन , पार्क स्टेडियम,पार्क चौकातील वीर सावरकर जलतरण तलाव बांधणे ही कामे आप्पांनी पुर्ण करुन घेतली.

महापौर असताना छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व महानगरपालिकेसमोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवायचा होता तेंव्हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिल्पकार मुंबईतील शाम सारंग यांना पुतळा बनवायचे काम देण्यात आले.

त्यावेळेसच तुळजापूर नगरपालिकेनेही छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवण्याचं काम शिल्पकार शाम सारंग यांना देण्यात दीलं होतं! सध्याचा सोलापुरच्या छत्रपती शिवाजीमहाराज चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आम्ही बनवायला सांगितलंय आणि तो आम्ही तुळजापूर ला घेऊन जाणारच असा हट्ट तुळजापूरच्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी धरला! पण आप्पांना महाराजांचा भारदस्त रुबाबदार पुतळा कशाही परिस्थितीत सोलापुरलाच आणायचा होता ! महाराजांचा जाज्वल्य इतिहास या अश्वारूढ पुतळ्यासमोर उभा राहिल्यावर पुढच्या पिढ्यांना आठवावा यासाठी आप्पांनी कौशल्य चातुर्यांने महाराजांचा तोच अश्वारूढ पुतळा अखेर सोलापुरातच आणून विराजमान केला त्याचा एक रोमांचकारी इतिहास आहे!

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महानगरपालिकेसमोर उभा करण्याचा प्रस्ताव आप्पांच्या कारकिर्दीतच मांडला व ठरावही करुन पूर्णत्वास नेला.

शहरातीलच नाही तर महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळाना अनेक अडचणींचा सामना करावं लागत असे. त्यावेळी प्रशासन व सार्वजनिक मंडळात समन्वय असावं यादृष्टीने आप्पांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची संकल्पना राबविली या मंडळातील अनेक कार्यकर्ते आमदार खासदार नगरसेवक झाले आणि आजतागायत हे कार्य सुरु आहे.

पुर्वी गणेशोत्सव काळात उत्सव मिरवणुकांना मशीदींसमोर ,पोलिस चौक्यांसमोर व शासकीय इमारती समोरून जाताना वाद्ये वाजविण्यास मनाई असे त्या विरोधात त्याकाळी आप्पांनी सोलापुरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र करुन प्रशासनाला ही बंदी हटविण्यासाठी रेटा लावला अखेर प्रशासनाने ही बंदी उठवली.

सोलापुरातीलच नव्हे तर भारतातील पहिला असलेला मानाचा आजोबा गणपती ज्याचा आदर्श घेऊन संपुर्ण भारतात गणेशोत्सव सुरु झाला! उत्सव काळात फक्त दहाच दिवस नाही तर वर्षभर आजोबा गणपती चे दर्शन घेता यावे यासाठी आजोबा गणपतीचे मंदिर लिंगैक्य विश्वनाथ आप्पा बनशेट्टींनी जागा घेऊन शुक्रवार पेठेत बांधले.

सोलापुरच्या जडणघडणीत विकासाचे कर्मयोगी माजी महापौर लिंगैक्य विश्वनाथ ( आप्पा ) बनशेट्टी यांचे मोलाचे योगदान आहे आज त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!

29/07/2025

कै. विश्वनाथअप्पा बनशेट्टी

जयंती दिन विनम्र अभिवादन

(नागपंचमी)

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Shukrawar Peth, Behind Ajoba Ganapati Mandir
Solapur
413002