Adhar Rekha Pratishthan
Adhar Rekha Pratishthan is Support Group for Cancer Patients, Survivors and their family members.
28/01/2026
बुधवार-२१-१-२०२६🙏नमस्कार,
आज संक्रांत स्पेशल आधारमैत्र मध्ये शब्द व बौद्धिक खेळांची वाणं सर्वांनी मनसोक्त लुटली!!
दोन अर्थ असलेले शब्द (कर,कर),दागिन्यांची नावे,मूक अभिनयातून म्हणी ओळखणे,वेगवेगळे संक्रमणांचे विषय,प्रकार यावर चर्चा करणे, अशाप्रकारे गमतीदार पद्धतीने मेंदूला छान खुराक मिळाला.
संक्रांत वाण व अहंकाराचा त्याग यावरील लेख ,
व पु काळे यांचा विरजण या विषयावरील लेख,
अशोक नायगावकर स्टाईल तिळगूळ विशेष लेख यांचे वाचन झाले.
तिळगूळ, गोड व तिखट पदार्थांचाही आस्वाद घेत सर्वांनी निरोप घेतला🙏
नमस्कार,
*आधार रेखा प्रतिष्ठान* तर्फे दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात व त्यासाठी रोख बक्षिसे ही देण्यात येतात.
यावर्षीही अशा दोन स्पर्धा जाहीर करत आहोत.
1. वक्तृत्व स्पर्धा
2. पोस्टर स्पर्धा
*वक्तृत्व स्पर्धा* आधार मैत्र मधे *29 October2025* ला *संध्याकाळी 5 वाजता* घेण्यात येईल.
ही स्पर्धा सर्व प्रौढांसाठी खुली असुन तिच्या साठी कुठलेही शुल्क नाही.
*विषय*:
*१) छंदाची निकड*
*२) फजिती वर मात करताना*
*३) तुम्ही बदला जग बदलेल*
वेळ: 5-7 मिनिटे
भाषा: मराठी
स्थळ:
हितवर्धीनी आफिसच्या वर
ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे पश्चिम
2. पोस्टर स्पर्धा
विषय, तारीख व इतर नियम लवकरच कळवले जातील.
वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले नाव WhatsApp द्वारा 96533 53908
या नंबर वर दिनांक
14 October 2025 पुर्वी नोंदवावे.
संपर्क
मेघना ओगले 9969033921
तनुजा तावडे 9653353908
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
3, First Floor, Anant CHS/Near Karve Hospital, Brahman Society, Thane West
Thane
400602