BrandWork

BrandWork

Share

Brand Deigning

13/06/2020

ट्रकशी जिव्हाळ्याचं नातं असलेल्या “Horn OK Please” या शब्दप्रयोगाची रंजक जन्मकथा नक्की वाचा

कधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून गेला की त्या ट्रक मागे लिहिलेला Horn OK Please हा शब्द हमखास आपलं लक्ष वेधून घेतो, आणि जन्मापासून हा शब्द नजरेस पडत असल्यामुळे आपण देखील दिसल्या दिसल्या नकळत तो मनातल्या मनात वाचतो देखील!

केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला?”

चला तर आज जाणून घेऊया या कोड्या मागचं कोणालाच माहित नसलेलं उत्तर!

तत्पूर्वी जाणून घेऊ या या शब्दामागचा सर्वमान्य समज/अर्थ

त्या शब्दामध्ये OK हा शब्द अधिक मोठा आणि ठळक शब्दांत लिहिलेला आढळतो. कारण मागील वाहनाने समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते.

Horn व Please हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील गाडी अधिक जवळ आल्यास त्यांना ते शब्द दिसावेत आणि त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी – असा सामान्य संकेत ह्यातून दिसतो.

आता जाणून घेऊ या याचा उगम कसा झाला.

ह्या शब्दप्रयोगच्या उगमाची ३ वेगवेगळी कारणं सांगितली जातात.

पहिला दावा असं सांगतो की, ‘Horn OK Please’ ही टाटा कंपनीमार्फत चालवली गेलेली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती – जी त्यांनी त्यांच्या OK या साबणाच्या प्रसारासाठी राबवली होती.

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक इंडस्ट्रीमध्ये केवळ टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने आपल्या नव्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी याच ट्रकचा मुव्हिंग होर्डींग्ज म्हणून वापर करण्याचे ठरवले.

त्या काळचा टाटा कंपनीने सदर केलेल्या नव्या साबणाच्या प्रोडक्टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते आणि आजही बहुसंख्य ट्रक्स वर OK शब्दाच्या वरती कमळाच्या फुलाचे चित्र असलेला हा लोगो आढळून येतो.

परंतु दुसरा दावा असे सांगतो की, पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे सिंगल लेनचे होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे.

तेव्हाच्या ट्रक्सना रियर मिरर व्हूज देखील नसल्यामुळे मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्यता असायची.

त्यामुळे एक नवीन शक्कल लढवण्यात आली ती म्हणजे ‘Horn Please’ हे दोन शब्द लिहिण्यात आले. दोन्हींच्या मधे “OK” लिहून या शब्दाभोवती बल्ब लावला जायचा.

म्हणजे –

मागून येणाऱ्या गाडीने Horn Please! ह्या विनंती नुसार हॉर्न वाजवायचा.

ट्रक ड्रायव्हरने OK शब्दावरील बल्ब पेटवून त्याला सिग्नल द्यायचा की “पुढचा रोड क्लियर आहे”.

हळूहळू मल्टीलेनचे रोड्स तयार होऊ लागले आणि बल्ब सिग्नल सिस्टम गायब झाली. पण ‘Horn OK Please’ हा शब्द मात्र तसाच राहिला.

तिसराही एक दावा केला जातो ज्यात थेट दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ येतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्स केरोसीन वर चालवले जायचे, पण त्यात असा धोका होता की लहानश्या अपघाताने देखील ट्रकचा स्फोट व्हायचा.

त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्सच्या मागे ‘On Kerosene’ असे लिहिले जायचे, म्हणजे मागू येणाऱ्या गाड्या उगाच ओव्हरटेक करण्याची घाई करणार नाहीत आणि मोठा अपघात होणार नाही.

पुढे ‘On Kerosene’ चे संक्षिप्त रूप म्हणजे OK ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिले जाऊ लागले आणि सोबतच सिग्नल म्हणून Horn Please देखील लिहिण्यास सुरुवात झाली.

या तीन पैकी टाटा कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा दावा हा सर्वमान्य मनाला जातो. इतर दावे त्यापुढे दुबळे ठरतात. पण अजूनही हा गमतीशीर शब्दप्रयोग आला कुठून हे खात्रीशीर रित्या स्पष्ट झालेले नाही.

असो, ते काही का असेना.

Horn OK Please या शब्दने आजही वाहतुकीची शिस्त शाबूत आहे हे मान्य करावे लागेल.

#साभार इनमराठी

29/04/2020

#खरी_परीक्षा
#लॉकडाऊन_संपल्यावरच

कोविड 19 हा विषाणु म्हणजे काही दिवस मुक्कामाला आलेला पाहुणा नाही, की त्याला गाडीत बसवून दिलं की आपण सुटलो असं समजायला. हा आपल्यापासून कदाचित दूर झालेला असेल किंवा कदाचित आपल्याजवळ कुठेतरी दबा धरुन बसलेलाही असेल. तुम्ही एखादी चूक केली, थोडं गाफील राहिलात की हा हल्ला केल्याशिवाय राहाणार नाही. या विषाणुची भीती अनेक कारणांनी वाटते आहे. हा कुणालाही मृत्युच्या दारात नेऊन ठेवू शकतो. एकदा हा एखाद्यावर स्वार झाला की त्याला कुटुंबापासून, समाजापासून दूरच राहावं लागतं. दुर्दैवाने जर एखाद्याचा मृत्यु झाला तर अंत्यविधीही करण्याचा अधिकार कुटुंबीयांकडे शिल्लक राहिलेला नसतो. आपण पाहिलं आहे की अपवादात्मक घटनात कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला आहे. आपले मित्र नातेवाईक प्रयत्नपूर्वक आपल्यापासून दूर राहातात. यापेक्षा अधिक क्‍लेषकारक काय असणार? म्हणूनच हा विषाणु आपल्यापासून चार हात दूरच राहील याची दक्षता घ्यायची, आज आणि लॉकडाऊन संपल्यावरही. आता पहिल्यासारखं जगायचं नाही. आता नवे नियम, नवे विचार आणि नवी दक्षता घेतच जगण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

लवकरच लॉकडाऊन संपेल आणि हळु हळु सगळे व्यवहार सुरु होतील. तसे करावेच लागतील. आणि त्यानंतरच आपली परीक्षा सुरु होणार आहे. म्हणूनच आताच ठरवून टाकायचं की कोणकोणती काळजी घ्यायची आणि कसं कसं बदलायचं.

सगळ्यांच्या डोक्यावरचे केस कान झाकायला लागलेत. अनेकांना असं झालं असेल की मी कधी एकदाचा सलूनमधे जातोय आणि केस बारीक करुन येतोय. पण सावधान. तुम्ही केस कापणार्‍या कलाकारापासून जेमतेम काही इंचावर असणार आहात आणि तेही जवळपास अर्धातास. तुम्हाला कळणारही नाही की तो कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही.त्या खुर्चीशेजारी आणखी काही खुर्च्या असतील. त्यावरही एक एक गिर्‍हाईक आणि एकेक कलाकार असेल. त्यांच्या आरोग्याबाबतही तुम्हाला माहीत नसणार. शिवाय तुमच्या अंगावर टाकलेले कापड, वापरलेल्या कातर्‍या, वस्तारे यावर एखादा विषाणु नाही याची तुम्हाला कल्पना नसणार आहे. वरकरणी कितीही स्वच्छता दिसली, सॅनिटाईज केलं आहे तरीही खात्री देता येणार नाही. हा प्रश्न केवळ ग्राहकाचा नाही. तो कलाकार ज्याचे केस कापणार आहे त्या ग्राहकाबाबतही त्या कलाकाराला माहिती नसणार आहे. मग काय करायचं? केसांच्या जटा वाढवायच्या का? नाही. आता सध्या बाजारात बॅटरीवर चालणार्‍या मशीन आहेत. त्याचा वापर करुन घरीच कटींग करणे सोपे आहे. घरातल्या कुणाला तरी मदतीला घेतलं तर उत्तम कटिंग होवू शकते.यात सलून चालविणारांचं नुकसान होणार आहे, पण या धोकेदायक काळात याशिवाय मार्ग नाही.

लाॅकडाऊन संपल्यावर उपवास सोडायची जशी घाई होते, तशी अनेकांना अनेक प्रकारे झालेली उपासमार संपविण्याची तीव्र इच्छा होईल. एखादा आठवडा बाहेर जेवायला गेलं नाही की आयुष्यात काहीतरी विचित्र चाललं आहे असं वाटायला लागायचं इतके आपण बाहेर खाण्याबाबत आग्रही बनलो होतो. त्यामुळे लेगेच हॉटेलचा रस्ता धरु नका. तुम्हाला माहीत नाही, की तुम्ही बसत असलेल्या खुर्चीवर अगोदर कोण बसून गेलं आहे. टेबलावरचा अ‍ॅश ट्रे, टिश्युचा स्टँड हे काही सतत सॅनिटाईज केले जाणार नसतात. शिवाय भटारखाना कसा आहे तुम्हाला माहीत नाही. खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत आणून देणारा वेटर कसा आहे माहीत नाही. तुम्हाला तो डिश आणून देताना भटारखान्याच्या धुरामुळे शिंकला नसेल हे कसं समजणार? त्यापेक्षा काही महिने हॉटेल म्हणजे निशिध्द क्षेत्र समजा. तुम्ही बाहेरुन लागण घेऊन घरी आलात तर ज्यांचा काही दोष नाही अशांचं जगणं नक्कीच धोक्यात आणणार आहात. जी अवस्था हॉटेलची तीच सिनेमाची. आपण दोन महिने सिनेमावाचून जिवंत आहोतच ना? मग आणखी काही महिने तिकडे फिरकायचं नाही.

मसाज करत असाल, फिजियोथेरपी घेत असाल तरीही तुम्ही कुणाच्या तरी खूप जवळ जात असता. ते आता काही काळ टाळा. तोंडाला मास्क लावणे हे आता आवश्यक आहे. घराबाहेर पडताना अंगात शर्ट जरी घातला नाही तरी तोंडाला मास्क आवश्यक आहे याची खुणगाठ बांधा. आता कपडे खरेदी करताना किंवा जसा महिन्याचा किराणा भरतो तसे मास्कही नियमित खरेदी करा. फारतर आपल्या शर्टाला किंवा साडीला मॅच होणारे मास्क घ्या. आता वेगवेळ्या डिझाईनचे मास्क मिळायला लागतील. साडीसारखं आता मास्कचंही कौतुक करायला शिका.

सोशल डिस्टन्सिंगचं व्यसन लाऊन घ्या. शेखहँड हा शिष्टाचार नाही. शेखहँड हे बेजबाबदारपणाचं लक्षण समजा आणि छानपैकी नमस्कार करायची सवय लावा. प्रत्येक सोसायटीत तळमजल्यावर एक सार्वजनिक नळ उभारा आणि पूर्वी वाड्यात जाताना जसं हातपाय धुवूनच घरात प्रवेश केला जात असे तशी सवय परत लावा.

मास्क, डिस्टन्सिंग, हातपाय धुणे, बाहेरचं खाणं टाळणे अशा काही सवयी लागल्या तर केवळ कोरोनाच काय पण इतर आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतील. तब्बेत उत्तम राहील, घरचं खाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल आणि आयुष्य निरामय बनेल.

एक बदललेली जीवनशैली स्वीकारली तर जगण्यात अधिक आनंद निर्माण होईल, आजार आणि मृत्युचं भय कमी होईल. आपण आतापर्यंत जगलो ते खरं तर स्वातंत्र्य नव्हतं. तो एक स्वैराचार बनला होता. आता काळच सांगतोय की बाबा सुधार.

लॉकडाऊन नंतरच्या परीक्षेच्या काळात आपण बदललो तर भीती उरणारच नाही. चला मस्त जगू या, आनंदी जगू या आणि भयमुक्त वातावरणात आयुष्य उपभोगू या.

28/04/2020

ाणून_घ्या

कृपया फरक लक्षात घ्या :*
(1) कोरडा खोकला + शिंक = #वायू_प्रदूषण

(2) खोकला + श्लेष्मा + शिंका येणे + वाहणारे नाक = #सामान्य_सर्दी

(3) खोकला + श्लेष्मा + शिंका येणे + नाक वाहणे, शरीरावर दुखणे + अशक्तपणा + हलका ताप = #फ्लू

(4) कोरडा खोकला + शिंका येणे + शरीरावर वेदना + अशक्तपणा + उच्च ताप + श्वास घेण्यात अडचण = #कोरोनाव्हायरस

#पॅथॉलॉजी_विभाग_AlIMS_दिल्ली

Want your business to be the top-listed Business in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Ahmednagar
414001