Asmita Multipurpose Organization - Reg.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Asmita Multipurpose Organization - Reg., Non-Governmental Organization (NGO), Empire Industries Centrum midc chickloli, kalyan badlapur Road, Badlapur.
16/04/2023
न थांबणारा प्रवाह...! अस्मिता चे आर्थिकदृष्ट्या मजबुतीचे पुढील एक पाऊल...........!.
आपण काही ही म्हटले किंवा त्यातून बाजूला राहिलो तरी काही कार्य आपल्या शिरावर येऊन पडते नव्हे तर ते कार्य आपलेच असल्याने ते निभावण्यासाठीच आपला जन्म असावा.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जो वारसा आम्हाला दिला त्यानुसार चालणे हे आम्ही आमचे परम कर्तव्य मानतो . आयुष्यात चूका होत असतात त्या झाल्या ही पाहिजे म्हणून काय आपण आपले कार्य सोडून चालत नाही. ज्या उदेशाने आम्ही हे कार्य करण्यास प्रेरित झालो त्यासाठी वाट्टेल ती तयारी करणे व त्यासाठी मेहनतीने कार्य करणे हेच बाबासाहेबाना खरे अभिवादन आहे.
होय , अस्मिता ची निर्मिती ही आपल्या समजातील लोकांना व्यवसायीक क्षेत्रात आणून सामाजाची आर्थिक उभारणी करणे त्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधून नवउद्योजक घडविणे व त्यांना व्यावसायमूलक पायाभरणी करण्यास मदत व मार्गदर्शन करणे ह्यासाठीच झालीय. वर्गणीदार हा देणगीदार व्हायला हवा तरच समाजाचा दृष्टीकोण बदलेल.
सामाजिक दरी जरी कमी झाली असली तरी आर्थिक दरी खूप मोठी आहे आणि ह्यावर आपणाला कार्य करणे गरजेचे आहे.
अस्मिता चे अध्यक्ष मा किरण तांबे यांची ह्यासाठी असणारी तळमळ खूप मोठी आहे किंबहुना ती तळमळच आम्हला अधिक ऊर्जा देते. हा परिसंवाद त्यांनीच घडवून आणला.
अस्मिता च्या ध्येय धोरणानुसार यावर्षीच बदलापूर येथील हेंद्रेपाडा विभागातील बौ.प.समिती शाखा क्र 707 तसेच संलग्न सुजाता महिला मंडळ आयोजित भीम जयंतीच्या कार्यक्रमात नोकरी की व्यवसाय या विषयावर अस्मिता चे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते समोर 500 लोकांच्या उपस्थित अस्मिताचे कार्य आणि उपक्रम सांगण्यात आले.
आजच्या काळात व्यवसायिक निर्मिती गरज आहे छोट्या मोठ्या व्यवसयांचीची निर्मिती म्हणजे आपल्या समाजातील आर्थिक क्रांती करण्याची पायाभरणी आहे असे आम्ही मानतो, कारण आर्थिक स्वतंत्र जर आपण मिकवू शकलो व त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी योग्यप्रकारे केला तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज उभारण्यात वेळ लागणार नाही.
प्रामाणिकपणा ,सत्यशीलता,योग्य ध्येयाने प्रेरित झालेले लोक जर एकत्र येऊन कार्य करू लागले तर यश नक्कीच मिळेल.
या परिसंवादाचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला बदलापूर मधून किमान 50 लोकांनी अस्मिताच्या अर्थीक चळवळीत सोबत येण्याची तयारी दर्शविली हे काही थोडके नसे.
लवकरच नव्या एका वेगळ्या उपक्रमात सोबत अस्मिता येत आहे.
विशेष आभार : बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र 707 तसेच संलग्न सुजाता महिला मंडळ, हेंद्रेपाडा, बदलापूर पश्चिम, चे कार्यकर्ते, सभासद यांनि मोलाची संधी दिली त्याबद्दल अस्मिता कडून विशेष आभार..!!
-प्रमोद
सरचिटणीस
अस्मिता
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
Empire Industries Centrum Midc Chickloli, Kalyan Badlapur Road
Badlapur
421503