Manisha Jadhav

Manisha Jadhav

Share

writer/storyteller

28/10/2025

आईसाहेब🙏
आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी मायेची सावली म्हणजे आमच्या आईसाहेब🙏माझ्या छोट्यातल्या छोट्या विजयावर माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आईला होतो आणि साधा काटा टोचला तरी तीच जास्त कळवळते.
बऱ्याच वेळा वाटतं की आता तिचं वय झालंय.म्हणून मग कधी काही प्रॉब्लेम असेल,दुखत खुपत असेल तर तिच्यापासून मी जाणीवपूर्वक लपवते.या वयात तिला टेन्शन येऊ नये म्हणून.पण म्हणतात ना "घार हिंडते आकाशी...चित्त तिचे पिलापाशी" आईचं सुद्धा तसंच आहे. सारा जीव आमच्याजवळ.मग काहीही झालं तरी कधीच तिच्यापासून लपून राहत नाही.मग सगळं बळ एकवटून ती पाठीशी खंबीरपणे उभी राहते.आयुष्यात परमेश्वराने दिलेल सर्वात मोठ वरदान म्हणजे माझी "आई"

मनिषा ठाणगे जाधव.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Bhandup?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Bhandup