Suresh Navale
माजी ऊर्जा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ...
माजी आमदार,बीड विधानसभा...
मंदिरातले सोने बाजारात आणा……………….
प्रा सुरेश नवले.
डॅालरच्या तुलनेत रुपया शतका कडे वाटचाल करत आहे.
देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रुपयाची किंमत वाढणे आवश्यक आहे.
एकेकाळी आपल्या देशात सोन्याचा धुर निघत होता असे बोलले जाते.
अर्थ व्यवस्थेची वाटचाल “धुराडा”च्या दिशेने चाललेली आहे असे अर्थतज्ञ सांगतात.
देशाच्या कोनाकोपरातील मंदिरामध्ये अमाप सोने,सोन्याचे अलंकार पडून आहेत.
देव या दागदागीन्याचे भुकेलेले नाहीत.
या सोन्यामुळे अर्धनग्नांना वस्त्रे,भुकेलेल्यांना अन्न मिळणार असेल तर देव प्रसन्नच होतील.
या अलंकार आणि सोन्याची देशाला गरज आहे.
सर्व मंदिरे,देवस्थाने येथे भिजत घोंगड्या सारखे पडून असलेला हा ठेवा बाहेर काढा.
देशाच्या सेवेत सुपूर्द करा.
कदाचित या अडगळीत पडलेल्या सोन्यामुळे
देशाला सोनियाचे दिवस येतील.
हे मंदिरातले “धन”जगामध्ये भारताची प्रतिष्ठा आणि प्रतिमा ऊजळुन टाकेल.
सरकारला सुबुद्धी सुचावी,माझी सुचना पचावी
असे वाटते.
या उपक्रमाला कर्माठांचा विरोध हा होणार .
पण हे राष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी हे
“धर्मकार्य “ठरेल.
शेतकरी आत्महत्या,बेकारी याने देश अस्वस्थ आहे.
अश्या परिस्थितीत हा ऊपाय सकारात्मक कार्य करून जाईल.
रुपयाचे जे अवमूल्यन झालेले आहे त्यालाही पुर्णविराम बसेल.
कदाचित हा “रामबाण”उपाय ठरेल.
सोन्यासारखी मानस अमेरीकेच्या दारात झोळी
घेऊन ऊभी राहतात हे केविलवाणे चित्र बदलण्यासाठी,डॅालरला त्याची जागा दाखवून देण्यासाठी ,रूपया पुढे घेऊन जाण्यासाठी हा जालीम उपाय केला पाहिजे असे माझे ठाम मत आहे.
05/05/2026
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छ🌺
04/05/2026
प.पू. प्रीतीसुधाजी महाराजांचे देव
लोक गमन
दीक्षा दिनापासून ते संथारा व्रता पर्यंत त्या अखंड अध्यात्म आणि धर्मकार्यात एकरूप झालेल्या होत्या
वैराग्य अंगी भिनले आणि संन्यस्त हेच माझे जीवन हा "आचारधर्म" त्यांनी स्वीकारला.
तनी मनी ध्यानी एकच निग्रह तो म्हणजे अहिंसा परमोधर्म.
आचार विचार आणि उच्चार यांनी युक्त हेच त्यांचे जीवन.
किशोर सुलभ भावभावनांचे विसर्जन करून वैराग्याच्या हातात हात देऊन ,वाळवंटरूपी वाट हाच माझा जीवनमार्ग, हेच माझे जीवन साध्य,हा निर्धार करून त्यांनी दीक्षा घेतली. अखंडपणे पार पाडली.
ही काटेरी वाट रक्तबंबाळ करणारी आहे हे माहीत असूनही तिचा सहज स्वीकार करून त्या चालत राहिल्या.
मागे वळून कधी पाहिलेच नाही.
असेही जिवात्मे असतात की, त्यांना ब्रम्हांड विशेष कार्य करण्यासाठीच प्रवृत्त करते आणि त्यांच्या हातून ते करवून घेते. त्यापैकीच प.पू. प्रीतीसुधाजी महाराज एक होत्या असे मी मानतो.
ध्वनी आणि प्रतिध्वनी ही ब्रम्हांडाचीच कार्यरचना आहे ,त्याप्रमाणे घडत असते .आपल्याकडून घडणाऱ्या घटनांची नोंद ब्रम्हांड ठेवते असे मानले जाते.
जसे कराल तसे भराल.
जैसी करनी वैसी भरणी
ना माने तो करके देख ,
जोजब भी है ,जन्नत भी है,
ना माने तो मर के देख.
म्हणूनच हा विचार पुढे आलेला दिसतो.
मी शाळेमध्ये असताना प्रीतीसुधाजी महाराज बीड मध्ये आलेल्या होत्या .
तत्कालीन मंत्री श्री सुंदरराव सोळुंके हे त्यांच्या भावामृतात न्हाऊन निघालेले होते. तेव्हा मला तसे काही कळत नव्हते पण डोळ्याने दिसत होते.मी ते पाहत होतो.
आज उस्मृती संपुष्टातील काही आठवणी सहज आठवल्या .त्यापैकीच वरील आठवण.
प्रीतीसुधाजी महाराज अखंड भ्रमण करत राहिल्या .चातुर्मासातून धर्म विचार आणि लोकप्रबोधन हाच संकल्प पार पाडत गेल्या.
त्यांच्या वाणिमध्ये गोडवा होता .कंठामध्ये अवीट "स्वरकुपी" दडलेली होती.
वेळप्रसंगी ती पाझरत असे. त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रकट होत असे.
श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असे.
त्या कारूण्यमूर्ती होत्या. त्यांचे लाघवी संवाद कौशल्य ऐकणाराला भुरळ घालत असे .ते एक प्रकारचे संवाद संमोहनच होते. त्या प्रभावातून ऐकणारा बाहेर पडत नसे. चातुर्मासासाठी प्रीतीसुधाजी महाराज आपल्या शहरांमध्ये असाव्यात म्हणून सर्व जैन बांधव "काया वाचा मने" प्रार्थना करत.
प्रीती सुता जी महाराजांचे शहरांमध्ये असणे म्हणजे चैतन्य आणि ऊर्जा यांचा जणू संचारच.
आभाळ भरून यावे,
विजांचा कडकडाट व्हावा,
ढगांनी गर्जना करावी,
आणि सरीवर सरींनी धरित्री नाऊन निघावी,
तसेच काहीसे श्रोत्यांचे प्रीतीसुधाजी महाराज यांचे प्रवचन ऐकल्यानंतर होत असे.
त्यांचा कंठ म्हणजे सरस्वतीने मुक्तहस्ते केलेली उधळणच. त्यांच्या देवलोक गमनाने हा अखंड चालणारा "वाणियज्ञ" शांत झाला.
विजुन गेला.
24 तीर्थंकरांची धर्मयात्रा चालती बोलती ठेवण्याचे कार्य प्रीतीसुधाजी महाराज करत राहिल्या.
सर्व धर्मीय श्रोते हा त्यांच्या वाणिचा विजय होता. जैन धर्माचे सूत्र आणि तत्व मानव्याचे कल्याण करणारे आणि मानवा प्रती प्रीती बाळगणारे आहे हे उच्चरावाने त्या सांगत राहिल्या.
त्यांच्या सांगण्यामध्ये जीवनाचे सार होते. सारांश रुपाने जरी ते स्वीकारले तरी मानव याचे कल्याणच होईल.
त्यांच्या देवलोग गमनामुळे त्यांची वाणि विसावली .शांत झाली,याचे दुःख वाटते .पण येणारा हा जाणारच आहे हे कटू सत्य स्वीकारणे अनिवार्य ठरते. प्रीतीसुधाजी महाराज---तो उन्नत आत्मा परमोच्च शिखर स्थानी विराजमान झाला............
त्यांचे योगदान त्यांचे तपशरण हे जैन धर्मियांसाठी दीपस्तंभा सारखेच......
प्रीतीसुधाजी महाराज ही एक विचार यात्रा आज देवलोग गमनाने स्थिरावली......
वर्तमानासाठी अनुकरणीय ठरली........
मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
प्रा. सुरेश नवले. बीड.
01/05/2026
महाराष्ट्राच्या प्रगतीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याला मानाचा मुजरा
त्यांच्या मेहनतीनेच उभा आहे आपल्या राज्याचा भक्कम पाया. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
18/04/2026
आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
26/03/2026
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्रीरामांच्या कृपेने जीवनात आनंद, शांती आणि यश नांदो. जय श्रीराम! 🚩
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Subhash Road
Bhir
431122