Rahul Mahadik
Passion Changes Everything...
14/07/2026
थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि पुरोगामी विचारांना विनम्र अभिवादन!
बुद्धीप्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणांचा पाया रचणारे त्यांचे विचार आपल्या समाजाला नेहमीच प्रगतीची आणि समतेची दिशा दाखवत राहतील.
[ Gopal Ganesh Agarkar Jayanti, Rahul Mahadik, BJP Sangli, Social Reformer Maharashtra, Sangli ]
11/07/2026
विशेष कार्यकारी अधिकारी हे शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
📍 पेठ नाका | 🗓️ दि. ११ जुलै २०२६
आज पेठ नाका येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी मान्यवरांचा सत्कार, तसेच त्यांना प्रशस्तीपत्र व अधिकृत शिक्के वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. सम्राटबाबा महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी होत विशेष कार्यकारी अधिकारी मान्यवरांना शुभेच्छा देण्याची संधी लाभली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. जयराजदादा पाटील, आष्टा मंडल भाजपा अध्यक्ष अमोल पडळकर, वाळवा मंडल भाजपाध्यक्ष अर्जुन साळुंखे, नेर्लेचे माजी सरपंच जयकरबापू कदम, पंचायत समिती सदस्य राजनभैय्या महाडीक, शुभम पाटील, प्रदीपदादा कांबळे, समर्थ पाटील, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. विद्याताई पाटील, वनश्री नानासाहेब महाडीक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सतीशदादा महाडीक, शिराळा तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक केदारभैया नलावडे, मा. रणजीत जाधव, माजी पंचायत समिती सदस्या प्राजक्ता देशमुख यांच्यासह ईश्वरपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघातील सर्व विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
04/07/2026
आपल्या अमूल्य विचारांनी संपूर्ण जगाला युवाचेतनेचा आणि राष्ट्रभक्तीचा नवा संदेश देणारे, कोट्यवधी तरुणांचे अखंड प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आणि विचारांना कोटी कोटी विनम्र अभिवादन...!
स्वामीजींचे ध्येयवादी विचार आपल्या सर्वांना राष्ट्र उभारणीसाठी आणि लोकसेवेसाठी सतत प्रेरित करत राहो, हीच सदिच्छा.
[ Swami Vivekananda Smritidina, Rahul Mahadik, Sangli, BJP Maharashtra, Youth Icon India ]
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Islampur
415407