Navishk Creations

Navishk Creations

Share

Thank you for contacting
Navishk Creations.We provide Delicious cakes, Cake material and Amla Candy
Please let us know how we can help you.

23/06/2021

विमा अंतर्गत *टॅलेंट हंट* स्पर्धेचे आयोजन 1 मे ते 20 मे दरम्यान केले होते . कोणतीही स्पर्धा म्हणले की हारजीत तर आलीच. पण ही स्पर्धा खरोखरच खुप छान व वेगळीच होती. कारण या स्पर्धेमधून हरण्या किंवा जींकण्यापेक्षा डिजिटल च्या माध्यमातून आपला व्यवसाय अनेकांपर्यंत पोहोचणार आहे ही बाबच अतिशय उल्लेखनीय होती आणि म्हणूनच खुप उत्साहाने व हिरीरीने मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 20 दिवसांचा स्पर्धेचा कालावधी होता. अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही बनवलेली प्रॉडक्ट्स ची जाहिरात किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पाठविण्यासाठी त्याचे जे एडिटिंग केले त्यासाठी मी विमा टीमची ( विशेषतः पियाली मॅडमची ) खुप आभारी आहे. 20 दिवस..... सोशल मीडियावर प्रॉडक्ट्स झळकत होते . अनेकजण कंमेन्ट करत होते, लाईक करत होते. सरतेशेवटी 20 दिवस संपले आणि 22 मे ला स्पर्धेचा निकाल जाहीर होणार होता. 4 कॅटेगरी मध्ये ही स्पर्धा होती. मी फूड कॅटेगरी साठी सहभागी होते. अनेक स्पर्धक होते. त्यातून विजयी कोण होणार याची उत्कंठा तर मला पण होती. अखेर तो क्षण आला . सीमा वेदक मॅडमनी ऑनलाइन सोहळा असूनही प्रत्यक्षात जसा सोहळा होतो आणि आपण अगदी कोण विजयी होणार याची ज्या अधीरतेने वाट पाहत असतो तीच अधीरता, तेच दृश्य त्यांनी निर्माण केले आणि अगदी कान टवकारून प्रत्येकजण ऐकतच होता....... टिक टिक टिक टिक........ टिकणीन टिकणीन........... ओ$$$$$.….... कोण आहे *फूड क्वीन विजेती......... आणि अचानक *स्वप्नाली दोशी* असे नाव घोषित केले आणि काय सांगू हृदयाचे ठोकेच वाढले. खुप अनपेक्षित होते हे सगळे. पण पडद्यावर माझे नाव घेतले असले तरी यामध्ये अप्रत्यक्षरीत्या सहभाग माझ्या मित्रमेंत्रिणीचा, नातेवाईकांचा , सहकाऱ्यांचा, माझ्या परिवाराचा आणि आपल्या प्रॉडक्ट्सला लाईक करून, शेअर करणाऱ्या , किमान प्रॉडक्ट काय आहे हे पाहणाऱ्या सर्वांचे हे यश आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच , प्रॉडक्ट्स वर ठेवलेल्या विश्वासमुळेच हे साध्य होऊ शकले. आणि फुड कॅटेगरी मधील क्वीन हा मान मला मिळाला यासाठी मी सर्वांचीच खुप खुप आभारी तर आहेच आणि ऋणीही आहे. सुनीता मॅडमचे यासाठी असणारे प्रोत्साहन खरोखरच खुप अवर्णनीय आहे. मॅडम तुमचा दांडगा आत्मविश्वास बघितला की , खुप हुरूप येतो आणि प्रेरणा मिळते, तेव्हा तुमचेही आणि संपूर्ण विमा टीमचेही खुप खूप धन्यवाद!!

*स्वप्नाली दोशी*
*Navishk Creations*
*9892172917*

Want your business to be the top-listed Bakery in Kamothe?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Kamothe