Joyful Journeys

Joyful Journeys

Share

Joyful Journeys To Delightful Destinations ! We are specialised in arranging Family tours to Kashmir, Ladakh, Sikkim, Rajsthan & Andaman.

31/07/2022

*जॉयफुल जर्नीज*
*३१ जुलै २०२२*

*सिक्कीम राज्य*

हे छोटुसे राज्य म्हणजे संपूर्ण पहाडी प्रदेशच आहे
गंगटोक ही राजधानी आहे
या राज्यात अजून स्वतः चे असे एअरपोर्ट पूर्ण विकसित झालेले नाही. त्यामुळे इथे जाण्यासाठी आपल्याला पश्चिम बंगाल च्या बागडोग्रा एअरपोर्ट किंवा एनजेपी रेल्वे स्थानक पर्यंत जाऊन मग तिथून पुढे गाडीत बसून गंगटोक गाठावे लागते, प्रवास अर्थातच सुंदर घाटांचा आहे
सिक्कीमचे वैशिष्ट्य आहे- रानफुले, ऑर्किड, धबधबे, असंख्य प्रकारचे पक्षी, बौद्ध संस्कृती मॉनेस्ट्रीज, चारधाम बारा ज्योतिर्लिंग यांची रिप्लिकेट मंदिरे एकाच जागी असलेलै सिद्धेश्वर धाम, काचेचा स्काय वॉक ब्रिज, भारतचीन बॉर्डर, लाचुंग सारखे अतिशय शांत सुरेख पहाडी गाव आणि तिथे पर्यंत पोचण्याचा अप्रतिम निसर्गसौंदर्य असलेला रस्ता, हिरवीगार झाडी आणि धबधबे !!! रोहडेंड्रॉन फुलांची घाटी, बर्फाच्छादित झिरो पॉईंट, त्सोग्मो लेक, कांचनजंगा ,पेलिंग ,बिक्सथांग.... बरीच यादी आहे

कधी जावे -
ऑक्टोबर, नोव्हेंबर-- थंडी कमी
मार्च, एप्रिल - जरा थंडी जास्त असते पण बर्फ जास्त मिळतो
मे , जून पहिल्या आठवड्यापर्यंत-- सगळ्यात उत्तम दिवस

कधी जाऊ नये -
जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर - पाऊस खूपच असतो
डिसेंबर जानेवारी -- थंडी खूपच असते, पण ज्यांना थंडी सहन होते आणि बर्फ वृष्टी पाहिजे असेल त्यांनी जावे

गंगटोक हे शहर वगळता अतिशय विरळ लोकवस्ती असलेले सिक्कीम हे खूप सुंदर राज्य आहे.
अतिशय समंजस आणि शिस्तबद्ध नागरिक आणि सेंद्रिय शेती हे सिक्कीम चे वैशिष्ट्य आहे...
येथे तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही.
कमालीची स्वच्छता दिसेल सगळीकडे !!
कितीही छोटे घर असले तरी दारात व सभोवताली सुंदर फुलझाडे असतीलच .
कोणीही ट्रॅफिक किंवा इतर कुठलेही नियम मोडत नाहीत, विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करत नाहीत...
कधी कधी शंका येते की नक्की आपण आपल्याच देशात आहोत का ते..😃
खंतही वाटते की हे शहाणपण संपूर्ण भारतात का नाही 😟
असो...
तर मंडळी अश्या या सुंदर राज्याचं पर्यटन हे एकदा केलंच पाहिजे... विचार करायला चालू करा..

डॉ अश्विनी राजगोळकर दंडगे
जॉयफुल जर्नीज
फोन नंबर - 9637210130, 6006295770, 9158750500
Website - www.joyfuljorneys.co.in

लेख फॉरवर्ड करणार असाल तर कृपया त्यात कुठलाही बदल न करता लेखिकेच्या नावासहित फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती

Want your business to be the top-listed Travel Agency in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


176, Sanchit, R. K. Nagar, Mool Society, Morewadi
Kolhapur
416013

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am