Kolhapur Earth Warriors

Kolhapur Earth Warriors

Share

Sustainable Development will be the core of our work.

Photos from Kolhapur Earth Warriors's post 06/05/2026

आज मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांची गोलमेज परिषद शिवाजी विद्यापीठ येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. कोल्हापूर अर्थ वॉरियर्स ,शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली. या परिषदेला साधारणपणे 26 संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेत विद्यापीठ विकास मंच आणि शिवाजी विद्यापीठाचे कौन्सिल मेंबर स्वागत परुळेकर, सकाळचे निखिल पंडितराव सर तसेच सिनेट मेंबर उषा पवार, पर्यावरण विभागाच्या प्रमुख असावरी जाधव मॅडम आणि कोल्हापूर अर्थ वॉरिअरचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर अर्थ वॉरियसने दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीने केले, उद्घाटनाच्या वेळी निखिल पंडितराव सर तसेच कोल्हापूर अर्थ वॉरियर्स चे आशिष कोंगळेकर आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आसावरी जाधव मॅडमनी झाडाला पाणी घालून केले तसेच उपस्थित सर्व संस्थांना प्रमुखांना गावरान कुळीथाच्या बिया दिल्या. आपले देशी पारंपारिक बियाणे संवर्धन केले पाहिजे याची प्रतिक रूपाने नोंद सर्वांनी घ्यावी आणि हे बियाणे घरी रुजवावे अशा उद्देशाने हे बियाणे दिले. तसेच गोमाता संवर्धन गोवंश टिकला पाहिजे, त्याचे महत्त्व समजण्यासाठी गाईच्या शेणापासून तयार केलेले अतिशय उत्तम प्रतीचे द्रवरुप खत म्हणजे जीवामृत, हे प्रत्येकी 200 एम एल रियूज्ड बाटली मधून सर्वांना घरच्या बागेसाठी भेट देण्यात आले. हे जीवामृत प्रतिक गुळवणी यांनी या परिषदेसाठी खास तयार करून दिले होते.
कोल्हापुरातील पर्यावरणीय समस्या आणि त्यावरील आपापल्या परीने काढलेले उपाय यावर सर्व संस्थांचे चर्चासत्र अभिजीत कुलकर्णी यांनी घेतले. यानंतर कोल्हापूर अर्थ वॉरिअरच्या सदस्या संगीता कोकीतकर यांनी नदी प्रदूषण तसेच जमीन प्रदूषण रोखण्यासाठी कशा पद्धतीने आपण बायो एन्झाईम केले पाहिजे याचे महत्त्व सांगत बायो एंझाईमची कार्यशाळा घेतली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव श्री व्ही एन शिंदे सर यांनी या परिषदेस उपस्थिताना मार्गदर्शक भाषणाने समारोप केला. संपूर्ण कार्यक्रमाचे तृप्ती देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

18/02/2026
Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Morewadi
Kolhapur
416013