Jotiba Innovations -Event Management
We provide all event-related services.
01/05/2024
आज (१ मे) महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन...
आजचा दिवस मराठी जनांच्या अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी १९६० साली ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. थोर संत, वीर, नेते, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षक, शेतीतज्ज्ञ, समाजसेवक यांची ही भूमी. या सर्वांनी महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र अस्तित्वात यायला १३ वर्षांचा काळ गेला. मराठी जनांना केंद्र सरकारशी कडवा संघर्ष करावा लागला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांवर सरकारने गोळीबार केला, त्यामध्ये १०६ जण हुतात्मा झाले. आजच्या दिवशी त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते.
सर्व महाराष्ट्रीय जनांना ‘महाराष्ट्र दिना’च्या मन:पूर्वक शुभेच्छा...
दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. कामगारांचा सन्मान व्हावा, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने १ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' साजरा केला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) अमेरिकेत १ मे १८८९ रोजी साजरा करण्यात आला, तर भारतात १ मे १९२३ रोजी श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने चेन्नई येथे हा दिन साजरा केला.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने देशविकासात असलेले कामगारांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवू या, त्यांचा सन्मान करू या.
#महाराष्ट्र #महाराष्ट्र_राज्य_स्थापना_दिन #महाराष्ट्रीय #शुभेच्छा #कामगार #आंतरराष्ट्रीय_कामगार_दिन #शुभेच्छा
17/04/2024
आज (चैत्र शुद्ध नवमी – १७ एप्रिल) श्रीराम नवमी...
आज श्रीराम नवमी... हजारो वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. श्रीराम हे श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानले जातात.
प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. मातृपितृभक्त, एकवचनी, महापराक्रमी, विनयशील, बंधुप्रेमी, एकबाणी, चारित्र्यवान, तत्त्वनिष्ठ, न्यायनिपुण, ऋषी-मुनी, सज्जनांचा आदर करणारा, प्रजेवर आत्यंतिक स्नेह करणारा असा हा राजा... रावणासारख्या अनेक क्रूर आणि जुलमी राक्षसांचा, दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन करून श्रीरामांनी पृथ्वी भयमुक्त केली. त्यांच्या राज्यात समस्त प्रजा सुखी, समाधानी होती. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत राज्याला ‘रामराज्य’ म्हटले गेले.
प्रभू रामचंद्रांच्या ठायी असलेल्या अनेक अलौकिक गुणांमुळेच त्यांना ईश्वरस्वरूप मानले जाते. त्यांच्या नामाचे स्मरण, चिंतन करण्यात अनेक भक्त धन्यता मानतात. संपूर्ण जगात त्यांना आदर्श मानले जाते. म्हणूनच हजारो वर्षे लोटूनही त्यांच्या नामाचा महिमा अबाधित आहे.
यंदाची रामनवमी खूपच उत्साहात साजरी होणार आहे. कारण सुमारे ५०० वर्षांनंतर याच वर्षी श्रीरामांची मूर्ती अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठित झाली आहे. समस्त हिंदूचे स्वप्न साकार झाले आहे. आपणही रामजन्माच्या सोहळ्यात रंगून जाऊ या, प्रभू श्रीरामांना भक्तिभावपूर्वक नमन करू या. समस्त भाविकांना रामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
जय श्रीराम... श्रीराम जय राम जय जयराम...
#श्रीराम #श्रीरामप्रभू #श्रीरामनवमी #पवित्रदिवस #अयोध्या #प्रणाम
17/04/2022
श्री महालक्ष्मी रथोत्सनिमित्त सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत..🙏
#महालक्ष्मीमंदिर #शक्तिपीठ #श्रीमहालक्ष्मीरथोत्सव #कोल्हापूर #भाविकांचे सहर्ष स्वागत.
16/04/2022
दख्खनचा राजा, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्री जोतिबा देवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत...🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Kolhapur