Girish Patil
कोल्हापूर
महानगरपालिका निवडणूक - फॉर्म भरणार नाही.!
मित्र, परिवार, आम आदमी पक्ष आणि सर्व हितचिंतक यांनी दिलेल्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद..!
जोपर्यंत बॅलेट पेपर येत नाही तोपर्यंत EVM विरोधात लढा सुरुच राहणार.!
Aap Kolhapur
EVM - VVPAT वर असणाऱ्या काळ्या काचेची जादू
-----------------------------------------------------
काळ्या काचेने महाराष्ट्र विधानसभेचे निकाल फिरवल्याची शक्यता, VVPAT च्या काळ्या काचेनेच विरोधकांचे वाजवले बारा.!
-----------------------------------------------------
EVM मशीन मध्ये पडलेली सर्व मते VVPAT मध्ये असणाऱ्या चिठ्ठयांसोबत मोजदात करूनही काही उपयोग नाही.
----------------------------------------------------
-गिरीश पाटील, संगणक तज्ञ, पुणे
----------------------------------------------------
✅ EVM मशीन हॅक करता येणे शक्य नाही हे २०० टक्के खरे जरी असले तरी काही EVM आणि VVPAT चा प्रोग्रॅमच चुकीचा सेट केला असेल तर मशीन हॅक करायची गरजच काय असा सवाल तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
-----------------------------------------------------
✅ EVM मशीन ज्यावेळी आले त्यावेळी सुरवातीला VVPAT नव्हते त्यामुळे आपण दिलेले मत कोणत्या उमेदवाराला गेले हे समजत नव्हते त्यामुळे नंतर ते समजावे यासाठी VVPAT आले ज्यात आपण मत कोणाला दिले हे VVPAT वरील स्क्रीनच्या मागे असणाऱ्या चिट्ठीतून दिसत होते.
-----------------------------------------------------
✅ सुरवातीला VVPAT वरील काचेची स्क्रीन ही पारदर्शक होती आणि मतदान केल्यानंतर VVPAT मध्ये खाली चिठ्ठी पडलेली दिसत होती. तसेच मतदान केल्यानंतर आपण कोणाला मतदान केले आहे हे १५ सेकंद दिसत होते.
-----------------------------------------------------
✅ पण २०१७ नंतर बऱ्याच VVPAT मध्ये काळ्या काचा बसवण्यात आल्या. पण सर्व VVPAT मशीन मध्ये काळ्या काचा लावण्यात आल्या नाहीत, असे का? तसेच मतदान केल्यानंतर आपण कोणाला मतदान केले आहे याचा VVPAT वरील कालावधी १५ सेकंदावरून ७ सेकंद इतका कमी करण्यात आला. तसेच VVPAT मध्ये खाली चिठ्ठी पडलेली देखील दिसत नाही. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात देखील हाच प्रकार दिसला.
-----------------------------------------------------
✅ २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात बऱ्याच VVPAT ला काळ्या काचा होत्या आणि तर काही मशीन ला पूर्वी प्रमाणे पारदर्शक काचा होत्या. हे असे का याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
-----------------------------------------------------
✅ निवडणूक आयोगाने एकूण उत्पादित केलेल्या VVPAT मधील किती टक्के VVPAT काळ्या काचेची आहेत आणि किती टक्के पारदर्शक काचेची आहेत. ही माहिती मतदारांना सांगणे आवश्यक आहे. पण निडणूक आयोगाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण कुठेही दिसत नाही.
-----------------------------------------------------
✅ काळ्या आणि पारदर्शक काचेची दोन्ही VVPAT सर्वच निवडणुकणांमध्ये वापरण्यात येतात, असे का? सर्वत्र एकाच प्रकारचे VVPAT का वापरण्यात येत नाहीत किंवा आले नाहीत. यामुळे शंकेला वाव मिळतो.
-----------------------------------------------------
✅ निवडणूक आयोग कमीत कमी ८ इंच बाय ८ इंच आकाराची पारदर्शक काच VVPAT ला का जोडत नाही कि जेणेकरून मतदाराला आपण दिलेले मत स्पष्ट दिसेल?
-----------------------------------------------------
✅ तसेच समोर मतदाराने दिलेल्या मताची चिठ्ठी VVPAT वर जरी दिसत असली तरी ती चिठ्ठी VVPAT मध्ये पडलेली मतदाराला दिसत नाही किंवा जाणवत देखील नाही. पण कमीत कमी ८ इंच बाय ८ इंच आकाराची पारदर्शक काच VVPAT ला जोडली आणि मतदान केल्यानंतर मतदारासमोरचं चिठ्ठी VVPAT मध्ये पडताना दिसली तर एकंदरीत निवडणूक निकालामध्ये अजून पारदर्शकता येऊ शकेल.
-----------------------------------------------------
📌 काळ्या काचेचे तांत्रिक तोटे / शक्यता -
-----------------------------------------------------
✅ मतदार EVM द्वारे मतदान करतो, VVPAT वर थोडीशी लाईट येते त्याला चिठ्ठी दिसते त्यानंतर VVPAT मधील लाईट जाते त्यानंतर मतदार तेथून निघून जातो. पण VVPAT मध्ये चिठ्ठी खाली पडली कि नाही याची खातरजमा होऊ शकत नाही. सॉफ्टवेअर प्रोग्रॅम मध्ये बदल करून किंवा प्रोग्रॅम सेट करून तीच चिट्ठी दुसऱ्या मतदाराला दाखवणे शक्य आहे. कारण आधीच्या मतदाराची चिठ्ठी खाली पडली कि नाही हे कोणालाच माहिती नाही.
-----------------------------------------------------
✅ तीच चिट्ठी दुसऱ्या मतदाराला दाखवून भलत्याच दुसऱ्या उमेदवाराची चिन्हासह चिठ्ठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम मध्ये बदल/सेट करून बॅकग्राऊंड ला प्रिंट करणे शक्य आहे. तसेच त्या दुसऱ्या उमेदवाराचे मत EVM च्या डेटाबेस ला रजिस्टर देखील करता येते. त्यामुळे निकालानंतर किंवा निकालादिवशी EVM आणि VVPAT चा काउन्ट जरी Tally केला तर तो बरोबरच येणार. कारण आधीच्या मतदाराची चिठ्ठी खाली पडली कि नाही हे VVPAT दाखवतचं नाही. त्यामुळे मतदाराची तंत्रज्ञामुळे फसवून झाली आहे हे कोणाच्या लक्षातच येऊ शकत नाही.
-----------------------------------------------------
✅ थोडक्यात काळी काच असल्याने VVPAT चा सॉफ्टवेअर कोड / प्रोग्राम सेट करून ठराविक कालावधीत मतांची हेराफेरी करता येऊ शकते आणि ज्या उमेदवाराला जिंकवून द्यायचे आहे त्याला EVM मध्ये बॅकग्राऊंड ला मत ट्रान्सफर करता येऊ शकते तसेच काळ्या काचेमुळे त्याच उमेदवाराची चिन्हासह चिठ्ठी देखील प्रिंट करता येते त्यामुळे जेंव्हा मतमोजणी होईल त्यावेळी मतांची संख्या (काऊंट) ही VVPAT सोबत मॅच होईल. त्यामुळे झालेली फसवणूक लक्षातच येत नाही. कारण आधीच्या मतदाराची चिठ्ठी खाली पडली कि नाही हे VVPAT दाखवतचं नाही.
-----------------------------------------------------
✅ काळ्या काचेमुळे वरील गोष्ट जी सहजा सहजी कोणाच्या लक्षातच येऊ शकत नाहीत आणि ही मतांची हेराफेरी २०० टक्के शक्य आहे.
-----------------------------------------------------
✅ VVPAT ला दोन काचा असतात. वरील काच जी पारदर्शक असते आणि आतील काळी काच ज्याच्या खाली चिठ्ठी प्रिंट होते. या दोन्ही काचा मोट्ठ्या आणि पारदर्शक हव्यात (कमीत कमी ८ इंच बाय ८ इंच आकाराच्या). पण मतांमध्ये झोलझाल करण्याच्या दृष्टीने काळ्या काचेचे लॉजिक आणले गेले असावे अशी शंका मतदारांमध्ये येते. सध्या निवडणूक आयोगाकडे जी VVPAT आहेत त्यापैकी बरेच VVPAT काळ्या आणि पारदर्शक काचेची आहेत. तर काही VVPAT मध्ये दोन्ही काचा पारदर्शक आहेत. असे का?
-----------------------------------------------------
✅ मतदान केल्यानंतर प्रत्येक जण VVPAT पाहतोच असे नाही. त्यामुळे आयोगाने जरी पारदर्शक स्क्रीन आणली तरी त्यामुळे जे VVPAT पाहत नाहीत त्यांची चिठ्ठी लाईट सेन्सर चा वापर करून पुढील मतदाराला दाखवणे तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य आहे. सध्या निवडणूक आयोगाकडे असणाऱ्या सर्व VVPAT मध्ये लाईट सेन्सर चा वापर करण्यात आला आहे. पण तो कोणत्या कारणासाठी करण्यात आला आहे याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला हवे.
-----------------------------------------------------
✅ जानेवारी २०२४ ते मे २०२४ पर्यंत देशभरात डेमो प्रदर्शने करून ४ कोटी नागरिकांना VVPAT वरील काळ्या काचेच्या जादूची माहिती आणि धोक्या बद्दल सतर्क केलं गेलं होतं, म्हणूनच नंतर लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत काही मशीन च्या काचा अर्ध पारदर्शी करण्यात आल्या आणि त्यामुळेच कदाचित ४०० पार फेल झालं. असो.
-----------------------------------------------------
✅ लाईट सेन्सर चा गैरवापर होतो कि नाही हा संशोधनाचा विषय आहे पण सध्या तरी काळ्या काचेच्या ब्लॅक मॅजिक मुळे विरोधकांचे बारा तर वाजलेच आहेत शिवाय एकंदरीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे निकाल फिरत असल्याची दाट शक्यता आहे.
-----------------------------------------------------
📌 काय करायला हवे?
-----------------------------------------------------
✅ निवडणूक आयोगाला निवडणूका आणि निकालांमध्ये पारदर्शकता आणायची असल्यास कमीत कमी ८ इंच बाय ८ इंच आकाराची पारदर्शक काच VVPAT ला जोडणे आवश्यक आहे तसेच मतदान केल्यानंतर मतदारासमोरचं चिठ्ठी VVPAT मध्ये पडताना दिसली पाहिजे आणि लाईट सेन्सर चा जो अनावश्यक वापर केला गेलेला आहे तो बंद केला पाहिजे.
-----------------------------------------------------
✅ दुसरा उपाय निवडणूक आयोगाने EVM आणि बॅलेट पेपर असे दोन्ही पर्याय मतदारांसमोर ठेवावेत. ज्या मतदारांना EVM द्वारे मतदान करायचे आहे ते EVM द्वारे मतदान करतील आणि ज्या उमेदवारांना बॅलेट पेपर द्वारे मतदान करायचे आहे ते बॅलेट पेपर वापरतील.
-----------------------------------------------------
✅ सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, सरकार, सत्ताधारी, प्रत्यक्ष उमेदवारदेखील EVM-VVPAT च्या तांत्रिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालत नसल्याने EVM आणि बॅलेट पेपर च्या वापराबाबत जनतेतूनच उठाव झाला पाहिजे.
-----------------------------------------------------
21/11/2024
मनःपूर्वक आभार.!
पहिल्यांदाच लढवत असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुक प्रचारासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, भेटून, फोनवरून, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे द्वारे सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व मित्र परिवाराचे मनःपूर्वक आभार.!
🙏🙏🙏🙏
15/11/2024
'कोल्हापूर'ला हवा..बदल नवा..! (जाहीरनामा एकदा नक्की वाचा)
-----------------------------------------------------------
कोल्हापुरात खालील मुद्यांवर काम करण्याचा माझा 'प्रामाणिक' प्रयत्न कायम राहील - 👇📌 यावेळी 'मतदान' करताना हा विचार कराचं.!
-----------------------------------------------------------
📌 जाहीरनामा-
-----------------------------------------------------------
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार
-----------------------------------------------------------
7️⃣ गिरीश बाळासाहेब पाटील
-----------------------------------------------------------
शिक्षण : BE(Comp), MBA(Ops), सॉफ्टवेअर इंजिनियर,
अध्यक्ष- आनंदी फाउंडेशन
-----------------------------------------------------------
EVM वर ७ नंबर ला 'बुद्धिबळ पट' या चिन्हा समोरील बटण दाबून 'उच्चशिक्षित' उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा. 👆🙏
-----------------------------------------------------------
♟️♟️♟️♟️♟️
-----------------------------------------------------------
📌 जाहीरनामा-📌
-----------------------------------------------------------
✅ दिल्लीच्या धर्तीवर अत्याधुनिक शाळा
✅ सुंदर, स्वच्छ, सपाट रस्ते
✅ अत्यल्प दरात दवाखाने व औषधे
✅ पर्यटन आणि पर्यावरण विकास
✅ जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल
✅ शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य किंमत देण्यासाठी प्रयत्न
✅ कोल्हापुरात IT पार्क साठी प्रयत्न
✅ घर तिथे रोजगार
✅ लघु-उद्योग व स्टार्ट अप वर विशेष भर
✅ विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना
✅ वृक्षतोड थांबवून झाडांचे प्रत्यारोपण
✅ जागोजागी CCTV
✅ मतदारसंघातील तलावांचे पुनरुज्जीवन
✅ ऑनलाईन / ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरे
✅ सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर
✅ कोल्हापूर साठी खंडपीठ
✅ जागोजागी प्रसाधनगृहे
✅ महापुराचे योग्य नियोजन
-----------------------------------------------------------
वरील जाहीरनामा ५०० च्या स्टॅम्प पेपरवर नोटराइज्ड Affidavit केलेला आहे.
-----------------------------------------------------------
📌 शेतकरी संघटना - रघुनाथ दादा पाटील यांचा जाहीर पाठिंबा.!
-----------------------------------------------------------
मतदान: बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
-----------------------------------------------------------
धन्यवाद 🙏
-----------------------------------------------------------
14/11/2024
थेट ५०० च्या स्टॅम्प पेपर वर दिला जाहीरनामा, आश्वासने पूर्ण केली नाहीत तर गुन्हा दाखल करा, उमेदवाराचा कोल्हापुरी पॅटर्न.!
--------------------------------------------------
कोल्हापूर दक्षिण चे अपक्ष उमेदवार गिरीश बाळासाहेब पाटील यांची राज्यभर चर्चा.!
--------------------------------------------------
स्टॅम्प पेपर चे फोटो कमेंट्स मध्ये..!
--------------------------------------------------
12-Nov-2024 - PRESS NOTE
--------------------------------------------------
थेट ५०० च्या स्टॅम्पवर दिला जाहीरनामा; अपक्ष उमेदवारा चा नवा प्रयोग
--------------------------------------------------
मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराने आयडियाची कल्पना केलीये. कायमच उमेदवार हे जनतेला आश्वासनं देतात आणि निवडले गेलेत की सर्व आश्वासनं पद्धतशीर विसरतात. हाच जनतेतील अविश्वास दूर करण्यासाठी अपक्ष उमेदवार गिरीश पाटील यांनी चक्क 500 रुपयांच्या बाँडपेपरवर त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
--------------------------------------------------
"मी गिरीश बाळासाहेब पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझा निवडणूक जाहीरनामा मी बाँडपेपरवर नोटरी करून जनतेला देत आहे, यातील आश्वासनं पूर्ण न केल्यास किंवा जाहीरनाम्यात नमूद केलेले जनतेचे प्रश्न सोडवण्या साठी काहीच प्रयन्त न केल्यास मी जनतेला माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देत आहे." असं गिरीश पाटील यांनी बाँडपेपरवर लिहून दिलंय.
--------------------------------------------------
गिरीश पाटील यांनी अनोख्या स्वरूपात सादर केलेला हा जाहीरनामा यामुळे सगळीकडे आता या स्मार्ट उमेदवाराची चर्चा होतेय. या बाँडपेपरवर जवळजवळ १८ वेगवेगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत.
--------------------------------------------------
दरम्यान या गोष्टींची पूर्तता झाली नाही किंवा काहीच प्रयन्त न केल्यास तर माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार या उमेदवाराने मतदारांना दिलाय. मतदार राजाचा उमेद्वारांबद्द्लचा समज बदलण्यासाठी अश्या प्रकारचा जाहीरनामा सादर करण्यास काहीच हरकत नाही असं मत गिरीश पाटील यांनी मांडला आहे.
--------------------------------------------------
गिरीश पाटील हे स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून राहिलेले आयुष्य समाजासाठी देण्यासाठी ते कोल्हापूर ला आपल्या स्वगृही परत स्थानांतरित झाले आहेत. वेग वेगळी आंदोलने, निवेदने, चळवळी यांच्यामार्फत ते जनतेचे प्रश्न सोडवण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. दरम्यान मी शंभर टक्के निवडून येईन असा विश्वास गिरीश पाटील यांनी व्यक्त केलाय.
--------------------------------------------------
https://news18marathi.com/maharashtra/kolhapur-independent-candidate-girish-patil-manifesto-on-stamp-paper-1277985.html
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Kolhapur