YASH Solutions
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YASH Solutions, Financial service, 10 th line Rajarampuri, Kolhapur.
*MSG FOR CLIENTS*
*We all are working hard to earn money ,but do we allow our Money to work hard for us ???*
To know more where to invest your hard earned money @ right Asset,attend an interactive and *Most Awaited session of Mr. Krishan Sharma* (HDFC MF AVP and Sr. Fund manager) at Kolhapur.
Subject -
*GOD and Govt both are investing in Equities, Why not You*
✔Date and Time - *at 11th May*, Thursday at
5.00 to 5.45 Hi Tea
*Presentation Time* - 6.00PM (sharp)
Venue - :
*Keshvarav Natygruh*, Near Khasbag, Kolhapur 416012
*No Entry Fees*
Followed by Hi Tea.
*Request you to confirm your attendance*
Warm Regards,
Bharat Kanire
9881244108
*मेडिक्लेम....एक आवश्यक गरज ..!*
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच जण अगदी धावत आहोत पैश्यासाठी, करीअरसाठी, टार्गेट साठी, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी...
पण या सार्या व्यापात आपण स्वतःला च विसरून गेलो अाहोत. कुटुंबातील व्यक्तिंसोबत वेळ देणे, नियमीत पायी फिरायला जाणे, मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालविणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे अगदी दुरापास्त झाल्यासारखे आहे. सतत कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, सकस अाहाराचा अभाव, तेल व फास्ट फुड चा अति वापर, वाढत चाललेली व्यसनाधीनतेची फॅशन यावर आपल्या शरीरावर जो अन्याय होतोय तो आपण सोयीस्कर विसरतो . परिणामी आजकाल अगदी पस्तीशीच्या लोकांनाही ह्रदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह, दमा, स्थौल्य आदी समस्या उद्भवत आहेत. गतिमान आयुष्यात अधिक गतीने व पुरेशी सावधानता व वाहतूकीचे नियम न पाळता वाहने चालविणे वा दुसर्याच्या चुकीमुळे अपघात हेही नित्याचेच झालेले आहेत. अश्या एकंदरीत प्रतिकूलतेचा विचार केल्यास आपल्याला केव्हा ना केव्हा तरी हाॅस्पीटलची पायरी चढावीच लागणार ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे.
आपण अनेकविध भौतिक सुखं व चैनीच्या वस्तूंसाठी पैसे खर्च करतो. व्यसने पूर्ण करण्यासाठी काही लोक नित्यनेमाने पैसे खर्च करत असतात. पण जेव्हा स्वतःच्याच आयुष्याचा प्रश्न उभा राहतो, स्वतःच्या शरीरास एखाद्या गंभीर आजाराने ग्रासले जाते, तेव्हा चांगल्या चांगल्यांचीही पायाखालील जमीन सरकते. अचानक उद्भवणाऱ्या या परिस्थितीचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे उपचारासाठी लागणारा पैसा. आपल्या भारतात सार्वजनिक सरकारी आरोग्य यंत्रणेची सेवा म्हणजे न बोललेलंच बरं! प्रत्येकच जण अश्यावेळी खाजगी हाॅस्पीटलकडे धाव घेतो. स्वच्छ, स्वतंत्र रूम्स, तत्पर सेवा, अत्याधुनिक उपचार प्रणालीचा वापर यासाठी सर्वसामान्य मनुष्य देखील खाजगी हाॅस्पीटल्सलाच पसंती देतो. आजार सर्वसामान्य असेल तर तो आवाक्यात असतो. पण जेव्हा मोठा अपघात, ह्रदयविकाराचा झटका, कॅन्सर इ. स्वरूपाचा किचकट जीवघेणा आजार असेल तर अश्यावेळी लागणाऱ्या तपासण्या, महागड्या औषधी, मेजर आॅपरेशन्स किंवा इन्व्हेजीव प्रोसीजर्स या सर्वाना सामोरे जावे लागतेच लागते. या सर्वासाठी पैसा हा लागतोच. आपण आजतागायत कमविलेली जमापुंजी खर्च करण्याची पाळी येते. ती देखील नसली तर नातेवाईक -मित्र किंवा समाजसेवी संस्थांकडे मदतीचा हात पसरावा लागतो. काहींना यात अनेकदा चांगल्या-वाईटाचा अनुभव येतो. आणि जर घरातील कर्ता पुरूषच आजारी असेल तर अजुनच फसगत होते. कुणी मदत करुन करणारही किती? प्रत्येकालाच सांसारिक गरजा असतात. अश्या प्रसंगातून जो पार पडला असेल तोच याचे गांभीर्य जाणतो.
या सगळ्या गोष्टीवर खबरदारी म्हणून स्वतःचा व परीवारातील सदस्यांचा मेडिक्लेम करुन तो नियमितपणे रिनीव्ह करुन घेणे हे अधिक सुरक्षितता देणारे ठरते. आपल्या कुटुंबातील व्यक्तीला कुणास डायबेटिस वा उच्च रक्तदाब असल्यास पुढील शक्यता गृहित धरून मेडिक्लेम हा केलाच गेला पाहिजे.
आपल्या भारतात युरोपातील देशांप्रमाणे मेडिक्लेमचे कम्पल्शन नाही. तितकी जाणीव जागृतीही नाही. यावर विपरीत म्हणजे लोक विमा म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून करतात. आपल्या स्वार्थासाठी विमा कंपन्या ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातुनच प्रोजेक्ट करतात. अापल्या स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता असल्यामुळेच पाश्च्यात्य लोक आरोग्यदृष्ट्या सुखी आहे. सरकारी तिजोरीवरही त्याचा भार न येता डेव्हलपमेंट साठी त्याचा वापर करता येतो. इन्व्हेस्टमेंटचे अधिक रिटर्नस् देणारे अनेकही चांगले मार्ग आहेत. मनुष्य मेल्यानंतर पैसा मिळालाच तर तो कुटुंबाच्या उपयोगी येईलच पण गंभीर आजारात अथवा अपघातात जायबंदी झाल्यास काय? सुदृढ शरीर व उत्तम आरोग्य ही देखील आपली एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहेच. यासाठी मेडिक्लेमचा पुरस्कार करणे केव्हाही चांगले. आपल्या विमाप्रतिनीधी बंधुंनीच खरंतर ही जागृकता आणावयास हवी. शिवाय 80 D अंतर्गत त्यास करसंरक्षण आहेच. आपण आपल्या कारचा, मोटारसायकलीचा विमा करतो शिवाय समोरच्यास काही झाल्यास थर्डपार्टीचीही तरतुद करतो, पण आपल्या स्वतःला व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य सेवेबद्दल इतकी अनास्था का बाळगतो?
मी आजपर्यंत रुग्ण व नातेवाईकांचे अनुभव बघितले, त्यातुन हे सांगावेसे वाटले. आपल्या कुणावरही असा बिकट प्रसंग उद्भवू नये पण उद्भभवलाच तर निश्चित दिलासा म्हणून मेडिक्लेम हा चांगला उपाय आहे असे वाटते.
संपर्क-
यश सोल्युशन्स
भरत कणिरे
9881244108
नियमित आणि सुरक्षित उत्पन्नाच्या दृष्टीने लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून बँकेच्या ठेवी ओळखल्या जातात. आपल्या पैशांची सुरक्षितता आणि निश्चित उत्पन्न देणारे साधन म्हणून ठेवींचा अवलंब केला जातो. मात्र, आयकराचे काय? बँकेच्या ठेवींवर मिळणारे व्याज करपात्र उत्पन्न आहे. ठेवींवर मिळणारे व्याज संबंधिताच्या उत्पन्नाचा भाग समजला जातो. त्यामुळेच बहुतांश फायनान्शियन प्लॅनरकडून ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’चा (‘एसडब्ल्यूपी’) पर्याय सुचवला जातो..
सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीमुळे अद्याप बँकेत ठेवी ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, सध्या बँकिंग व्यवस्थेमध्ये व्याजाचे दर हळूहळू का होईना कमी होत आहेत. त्यामुळे ठेवींवरील व्याजातही घट होण्याची शक्यता आहे. घटणाऱ्या व्याजाच्या दराशिवाय मिळणारे व्याज करपात्र असल्याचा मुद्दाही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळेच की काय फायनान्शियन प्लॅनरकडून ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’चा (‘एसडब्ल्यूपी’) पर्याय सुचवला जातो. बँकेत ठेवी ठेवण्यापेक्षा हा पर्याय निवडण्याकडे गुंतवणूकदारांचा विशेषतः मोठ्या प्रमाणात कर भरावा लागणाऱ्या गुंतवणूकदारांचा कल वाढू लागला आहे. या शिवाय ठराविक रक्कम मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून नियमित उत्पन्न प्राप्त करण्यासाठीही हा पर्याय अवलंबला जात आहे.
गरजेप्रमाणे गुंतवणूकदाराला गुंतवलेली रक्कम काढून घ्यायची असेल, तर रोखतेचा फायदा मिळावा या हेतूने फायनान्शियल प्लॅनरद्वारे ‘डेट् फंडां’चा पर्यायही सुचवला जातो. ‘डेट् फंडां’ना सध्या ‘पॉझिटिव्ह दर्जा’ देण्यात आला आहे. ‘आउटलूक एशिया कॅपिटल’चे सीईओ मनोजन नागपाल यांच्या मते २०१८पर्यंत बँकांच्या व्याजदरात आणखी एक ते दीड टक्का कपात होईल. त्यामुळे ‘डेट् मार्केट’ना फायदा होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी व्याजदर खाली जातात; त्याचा सर्वस्वी फायदा ‘डेट् मार्केट्स’ना होत असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक विकासदर खालावल्याने तसेच महागाई दर खाली आल्यामुळे ‘डेट् मार्केट’मधील अनेक योजनांचा व्याजदर घसरला. विविध योजनांच्या घसरलेल्या व्याजदरांमुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्याकडे वाटचाल करीत आहे, असेही नागपाल यांनी स्पष्ट केले..
‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ म्हणजे काय?
गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड योजनेतून नियमितपणे गुंतवलेली रक्कम काढून घेण्याची सुविधा मिळणे म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात ‘एसडब्ल्यूपी’ होय. या पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला नियमितपणे निश्चित उत्पन्न प्राप्त करण्याची संधी मिळते. ‘एसडब्ल्यूपी’ सध्या दोन पर्यायात उपलब्ध आहे. पहिल्या पर्यायात संबंधित गुंतवणूकदाराला दरमहा किंवा तिमाहीला निश्चितपणे टप्प्याटप्प्याने ठराविक उत्पन्न प्राप्त करण्याची संधी मिळते. दुसऱ्या पर्यायात गुंतवणूकदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीनंतर मिळवू शकतो..
‘एसडब्ल्यूपी’ आणि बँकेच्या ठेवी
‘डेट् फंडा’त केलेली गुंतवणूक किमान तीन वर्षांसाठी असेल तर ती दीर्घकाळ समजण्यात येते. सध्या ‘डेट् फंडां’वर २० टक्के इतका दीर्घकाळ भांडवली लाभ करपात्र आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मूळ गुंतवणुकीवर ‘इंडेक्सेशन’चा फायदा मिळवू शकतो. याचाच अर्थ मूळ गुंतवणूक चलनवाढीचा दर आणि कर यांच्याप्रमाणे निर्धारित केली जाते. मात्र, ‘डेट् म्युच्युअल फंडा’त केलेली गुंतवणूक तीन वर्षांच्या आत काढून घेतली अथवा युनिटची विक्री केल्यास अल्पकाळ भांडवली लाभ करपात्र उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाते. या पार्श्वभूमीवर ‘डेट् फंडा’तील ‘एसडब्ल्यूपी’चा पर्याय बँकेतील मुदत ठेवींच्या तुलनेत अधिक चांगला समजला जातो. छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये ‘एसडब्ल्यूपी’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यांना ठराविक प्रमाणात नियमित गुंतवणूक अपेक्षित आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य आहे. ‘डेट्’चा अंतर्भाव असणारे ‘एसडब्ल्यूपी’ मूळ गुंतवणुकीला सुरक्षितता प्रदान करतात, अशी माहिती ‘क्लीअरटॅक्स’च्या सीईओ प्रीती खुराणा यांनी दिली. बँकेच्या मुदतठेवींवर (ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे विशेष परतावे सोडून) मिळणारे परतावे कायम ‘डेट् फंडां’च्या परताव्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. कारण, बँका सुरक्षिततेचे कारण दाखवून मुदत ठेवी स्वतःजवळच ठेवतात. उदारणार्थ बँकेत ठेवलेल्या एक वर्षाच्या मुदत ठेवीवर साधारणतः ७ ते ८ टक्के दराने व्याज प्राप्त होते. या उलट बहुतांश ‘डेट् फंडां’कडून (इन्कम डेट् फंड, लिक्विड फंड) गेल्या वर्षी आठ टक्क्यांहून अधिक दराने परतावा प्राप्त झाला आहे. याचा अर्थ दर वर्षी ‘डेट् म्युच्युअल फंडां’कडून भविष्यात अशाच कामगिरीची अपेक्षा करता येत नसली, तरी त्यातील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा नेहमीच मुदत ठेवींपेक्षा अधिकच राहिला आहे.
alt Simple toys to make your kids smart.
Ad Magic Crate.
बँकांच्या मुदत ठेवींविषयी काही तथ्ये
बँकांमध्ये गुंतवणूक करण्यात येणाऱ्या मुदत ठेवींवर मिळणारे व्याज चलनवाढ आणि अर्थव्यवस्थेच्या अस्थिरतेसमोर टिकू शकत नाही. सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या विकसनशील देशातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा पर्याय शोधणे काळाची गरज बनली आहे. ज्यावेळी चलनवाढीचा दर अतिशय कमी अथवा मर्यादित असतो, अशावेळी मुदत ठेवीतील गुंतवणूक हा योग्य पर्याय असू शकतो. मात्र, ज्यावेळी चलनवाढीच्या दरात सातत्याने बदल होत असतील, महागाईही वरच्या पातळीवर असेल, त्यावेळी किमान ‘डेट् फंडां’चा पर्याय अनुभवण्यास हरकत नाही..
शेवटचे आणि महत्त्वाचे...
विचार करा की, दर वेळी तुम्ही दैनंदिन खर्चांतून पैसे बाजूला काढणार आणि ते मुदत ठेवीत गुंतविणार. काही वर्षांनी जेव्हा ठेवींची मुदत संपेल, त्यावेळी दहापेक्षा अधिक मुदतठेवींच्या तारखा आणि त्यांचे व्याजदर लक्षात न राहिल्यास तुमची पंचाईत होऊ शकते. ज्यावेळी तुम्हाला खरोखरच पैशांची गरज भासेल, त्यावेळी नेमकी कोणती मुदत ठेव काढावी, या विषयी तुमचा संभ्रम होऊ शकतो. या शिवाय या मुदत ठेवींचा कालावधी कधी पूर्ण होईल, याचीही नोंद कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणे आवश्यक असेल. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘डेट् फंड’ तुमची मुक्तता करतात. केवळ ‘फोलिओ’ तयार करून त्यामध्ये नियमित गुंतवणूक करण्याचा सुलभ आणि सोपा पर्याय ‘डेट् म्युच्युअल फंड’ उपलब्ध करून देतात. ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी ठराविक रक्कम काढून बँकेच्या खात्यात जमा करा...इतकी सुलभता हे फंड देतात.
**महाराष्ट्र टाइम्स....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
10 Th Line Rajarampuri
Kolhapur
416008