Shahu Chhatrapati

Shahu Chhatrapati

Share

Descendant of Chhatrapati Shivaji Maharaj, Rajarshi Shahu Maharaj. Leader for education, philanthropy & progress.
-Team Shahu Chhatrapati

Photos from Shahu Chhatrapati's post 10/11/2025

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर खासदार श्री शाहू छत्रपती महाराज आणि एआयसीसीचे सचिव बी. एम. संदीप जी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, दौलत देसाई, अभिजीत तायशेटे, बाळासाहेब सरनाईक, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राहुल माने, प्रवीण केसरकर, मधुकर रामाणे, भारती पोवार, यांच्यासह काँग्रेसचे विविध विभागाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
.rajubaba.j.awale

Photos from Shahu Chhatrapati's post 10/11/2025

भारत संचार निगम लि. (बी. एस. एन. एल.) च्या दूरसंचार सल्लागार समितीची बैठक खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी छत्रपती ताराराणी सभागृहाच्या फलकाचे उदघाटन महाराजांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सल्लागार समिती सदस्यांकडून आलेल्या सूचनांवर चर्चा झाली.

यावेळी महाप्रबंधक अरविंद पाटील, उपप्रबंधक अरविंद कुलकर्णी, वसंत पाटील, विजयानंद माने तसेच सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

06/10/2025

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना ही अत्यंत धक्कादायक व अस्वस्थ करणारी आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च आसनावर असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करण्याची बाब चीड आणणारी तर आहेच शिवाय संविधानाचा अवमान करणारी आहे. न्यायव्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न करून दबाव आणण्याचे डावपेच लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना घातक आहेत. मात्र तरीही भारतीय न्याय व्यवस्था अशा भ्याड कृत्यापुढे झुकणार नाही.

सुदृढ लोकशाही टिकून राहावी यासाठी न्यायालयाचा सन्मान राखणे, न्यायमूर्तींची सुरक्षा सुनिश्चित करणेच्या बाबींकडे सरकारने लक्ष द्यावे. केंद्रसरकारने या प्रकरणात न्यायाधीशांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट कराव्यात.

न्यायसंस्थेचा सन्मान आणि स्वातंत्र्य हेच आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या आधारस्तंभांना धक्का पोहोचू नये यासाठी सरकार, समाज आणि प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.

Photos from Shahu Chhatrapati's post 04/10/2025

कॅप्टन शिवाजी महाडकर महाराजांचे अत्यंत जवळचे मित्र, भारतीय लष्करातील समर्पित अधिकारी आणि AISSMS संस्थेत प्रभावी नेतृत्व करणारे व्यवस्थापक होते. त्यांच्या शौर्य, कार्यनिष्ठा आणि समाजहितासाठीच्या योगदानाची स्मृती सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने आपण एक जिवलग मित्र आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

Photos from Shahu Chhatrapati's post 30/09/2025

आज दि. ३०-०९-२५ आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून पुणे विभाग शिक्षण मतदार संघातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 5106 शाळांना खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत टिव्ही संच आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, संभाजीराव देसाई, बाळासाहेब चव्हाण, यशवंत चव्हाण, विद्याधर गुरबे, अभिषेक शिंपी, बसवराज आजरी, दिग्विजय कुऱ्हाडे, सोमगोंडा आरबोळे, एम.जे. पाटील, राजू खमलेट्टी, नौशाद बुडेखान, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन बी.जी. काटे. जे. बी. बारदेस्कर, के. बी. पवार, आर. पी. पाटील, आर. आर. खराटे, अनिल सुरूतकर, रमेश देसाई, एम. आर. भोगुलकर, सुभाष सावंत, जे.डी. पाटील, आर. के. शिंदे, एस. एम. पाटील, दत्ता देशपांडे, श्रीकांत पाटील, मारुती मधुरकर. टि.बी. देसाई यांच्यासह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते!

Photos from Shahu Chhatrapati's post 19/09/2025

महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबईचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती एसपी तावडे साहेब यांना महाराष्ट्र सरकारने Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar award for excellence and social engineering पुरस्कार दिला त्याबद्दल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्ट बार असोसिएशन यांनी त्यांचा सत्कार आयोजित केला होता. मा. श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते जोतिबाची प्रतिमा देऊन सत्कार संपन्न झाला. यावेळी राज्य ग्राहक आयोगाचे सदस्य विजय प्रेमचंदांनी, कोल्हापूर आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत, कंझ्युमर बार असोसिएशन चे अध्यक्ष प्रताप जाधव सचिव राजेंद्र वायंगणकर व पाच जिल्ह्यातील वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Photos from Shahu Chhatrapati's post 18/09/2025

महाराष्ट्र दिनमान या वेब पोर्टल आणि यु ट्यूब चॅनेलच्या वर्षपूर्ती सोहळ्याला खासदार श्री शाहू छत्रपती महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते वर्षपूर्ती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या कार्क्रमाला खासदार श्री धनंजय महाडिक, डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, महेश जाधव, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, गणी आजरेकर, वैभव नाईकवाडी, विजय चोरमारे, माणिकराव साळुंखे, शैलजा साळुंखे, अभिनेते किशोर कदम, हिंदकेसरी दीनानाथ सिहं यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Photos from Shahu Chhatrapati's post 05/09/2025

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे DJ कृणाल घोरपडे अर्थात DJ KRATEX कोल्हापूर मध्ये खाजगी कार्यक्रमानीमित्त आले असता त्यांनी आज आवर्जून कोल्हापूरचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली

Photos from Shahu Chhatrapati's post 02/09/2025

नाथागोळे तालीम, शिवाजी पेठ मंडळाच्या पाताळ भुवनेश्वर मंदिर (उत्तराखंड) या देखाव्याच उद्घाटन खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, व्ही बी पाटील, विजय देवणे, आर के पोवार, महादेव आडगुळे, रविकिरण इंगवले, प्रतिज्ञा उत्तुरे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
.chhatrapati

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


New Palace
Kolhapur