Channel B
प्रतिबिंब जनमानाचं ! Channel B Is Leading News Channel In Kolhapur District
09/07/2026
🟪 *७ / १२ बातमीपत्र - ०९-०७-२०२६*
https://youtu.be/2qwbNdVuEls
🔵 *राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द पुलावरील खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त, दहा वाड्या-वस्त्यांचा संपर्क पूर्ववत*
https://youtu.be/HfQc58YGlLE
🔵 *गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडीतील अंगणवाडी शाळेवर वीजखांब कोसळला, सुदैवानं जीवितहानी टळली*
https://youtu.be/KJIBoGovOVQ
🔵 *पन्हाळा तालुक्यातील माजगाव-पोर्ले पुलावरून शेतकरी दुचाकीसह पडला पाण्यात, सुदैवानं शेतकरी बचावला, तर दुचाकी गेली वाहून*
https://youtu.be/N_pVx3khqw8
🔵 *डोंबिवलीतील डॉक्टर, परिचारिकांवरील हल्ल्याचा इचलकरंजीतील डॉक्टरांकडुन निषेध, हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी*
https://youtu.be/pfsRdgKOYb8
🔵 *करवीर तालुक्यातील पासार्डे इथल्या मराठी शाळेची सुरक्षा भिंत अतिवृष्टीमुळं कोसळली, निकृष्ट कामामुळं भिंत पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप*
https://youtu.be/xlDWC3qhpFQ
🔵 *शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळांवर ३१ जुलैपर्यंत बंदी, धबधबे, धरणं आणि पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई, महसूल विभागाचं आवाहन*
https://youtu.be/Kq4l5238Q34
🔵 *बळीराजाच्या सोबतीनं शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला चिखलातील आनंद, राधानगरी तालुक्यातील कोते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं शिवार शिक्षण उपक्रम*
https://youtu.be/hvbs56owZwg
🔵 *लव्ह जिहाद विरोधी कायदा लागु करण्याच्या मागणीसाठी इचलकरंजी प्रांतकार्यालयासमोर निदर्शनं*
https://youtu.be/eHFgoLcGVms
🔵 *पन्हाळा तालुक्यातील पाटीलवाडीत वादळी वार्यासह अतिवृष्टीनं जनावरांच्या शेडवर कोसळलं निलगिरीचं झाड, सुमारे ६० हजारांचं नुकसान*
https://youtu.be/pI-NMlU7xpM
🔵 *हुपरी शहरातील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासह पाणीपुरवठा योजना, सिटी सर्व्हे यासह अनेक विकासकामं लवकरच मार्गी लावणार, नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची माहिती*
https://youtu.be/a7uFqS6mvp0
*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻
निवासी अतिक्रमण नियमितीकरणासह पाणीपुरवठा योजना, सिटी सर्व्हे यासह अनेक विकासकामं लवकरच मार् हुपरी शहरातील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासह पाणीपुरवठा योजना, सिटी ...
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन शहरवासीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने आज अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध शाळांतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर जनप्रबोधन उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर पोलीस दलाने हे विशेष अभियान आयोजित केले. राजर्षी शाहू स्मारक येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले.
प्रायव्हेट हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, साई हायस्कूल, नेहरू हायस्कूल, वेध अकॅडमीसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी “नशेकडे पाऊल टाकू नका, स्वतःचे जीवन संपवू नका”, “अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे मृत्यूचे आमंत्रण” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन बिंदू चौक ते दसरा चौक मार्गावर पदयात्रा काढली.
यानंतर विद्यार्थ्यांना नशामुक्ती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. संतोष प्रभू आणि नाना पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक शपथही देण्यात आली.
Click here to claim your Sponsored Listing.
Address
CTS No. 446 3rd Floor, Kailash Tower, Assembly Road, Station Road Corner, Assembly Rd, New Shahupuri
Kolhapur
416003