Abhay Tendulkar
Social Worker | Vice President Kolhapur Youth Foundation, Kolhapur |
भाजपा शक्ति
27/03/2026
*आज (चैत्र शु. ९, २७ मार्च) श्री रामदास जयंती...*
भारताच्या इतिहासात अनेक संत-महात्म्यांनी समाजप्रबोधन आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले आहे. अशाच थोर संतांमध्ये रामदास स्वामी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर... त्यांचा जन्म चैत्र शु. नवमी, ९ फेबुवारी १६०८ रोजी जांब (ता. परतूर, जि. जालना) येथे झाला.
ते केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर महान समाजसुधारक, संघटक आणि राष्ट्रप्रेमी संत होते. त्यांनी अविवाहित राहून समाज प्रबोधन, दासबोध ग्रंथनिर्मिती, मनाचे श्लोक, देवांच्या आरत्या, हनुमान स्तोत्र रचून लोकशिक्षण व धर्मसंस्थापनेचे कार्य केले. समर्थांनी पाहिले की, त्या काळातील समाज गुलामगिरीत आणि नैराश्यात होता. त्यांनी समाजाला नवीन चेतना देण्यासाठी आणि तरुणांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हनुमान उपासना आणि व्यायामशाळा (आखाडा संप्रदाय) सुरू केले. अनेक गावांमध्ये श्री हनुमानाची मंदिरे उभारली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी शिवरायांना 'निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु' अशा शब्दांत गौरवले. त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि समाजातील अन्यायकारक प्रथांना विरोध केला.. त्यांनी सध्याच्या सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर १६८१ साली समाधी घेतली. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकामध्येही त्यांचे हजारो भक्त आहेत
समर्थ रामदास स्वामींना जयंतीनिमित्त विनम्र प्रणाम...
जय जय रघुवीर समर्थ !
#समर्थरामदास #आध्यात्मिकगुरु #जयंती #प्रणाम
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Plot No 116 Salokhe Nagar Kalamba Road Kolhapur
Kolhapur
416007