Samartha Kala
Samarthakala is an academy for drawing and painting. Here kids discover their art while adults disco
13/04/2026
13/04/2026
जुन्या मूर्तिंचा जीर्णोद्धार करताना खुप खुप समाधान मिळते
आनंद होतो
तोहि खुप आतून , खुप मनापासून ,अन्तरंगातुन होतो ....
होत रहातो ....
काम पूरे होइतोवर ती कारंजी उडत राहतात ....
😇
या २ मूर्तिंच्या वेळी ती अनुभूति थोडी जास्तच आली. त्याला अनेक कारणे होती -
मुख्य म्हणजे या मुर्ती कदाचित 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या असाव्यात. म्हणजेच मूर्तिकार देवधर यांच्या कडील मूळ साच्यातील होत्या. त्यामुळे जास्त सुबक , सौंदर्यपूर्ण होत्या. ( आजकाल मिळणाऱ्या बहुतांश मुर्ती या मूळ मूर्तिच्या कॉपीवरुन कॉपी कॉपीवरुन कॉपी अशा अनेक पिढ्यांच्या असतात. त्यामुळे त्यातील मूळ सौंदर्य , नजाकत तितकेसे उतरलेले नसते.) त्यामुळे यांचा जीर्णोद्धार म्हणजे त्या मूळ मूर्तिकाराला वाहिलेली आदरांजली , भावांजली , मानाचा मुजरा होता.
शिवाय या कामामुळे त्या मुर्तीन्चे , कलाकृतिंचे आयुष्य काही वर्षांनी वाढण्यास माझा हातभार लागला याचे समाधान होते.
याचबरोबर ज्यांच्या घरात या मुर्ती होत्या त्यांच्या अनेक वर्षांचा भावबंध त्यांच्याशी जोडलेले होते. कदाचित त्यांच्या लहानपणापासुन त्या मुर्ती त्या घरातील सदस्य असतील. कदाचित आधीच्या पिढीला या पिढीशी जोडून ठेवणारा हा एक धागा असेल.
त्या दॄष्टिने त्याचे मोल अनमोल असेल.
ते जपले जाण्यात माझा खारीचा वाटा असेल.
आणी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे
या मुर्ती उंचावर व उघड्यावर शोकेसविना असल्याने त्यावर खुप धूळ असुन तीही घट्ट बसली होती. मुर्ती जुन्या असल्याने पीओपी ही ठिसुळ झाले होते. त्यामुळे धूळ साफ करणे , मुर्ती स्वच्छ करणे इत्यादी प्राथमिक कामाला खुप च अडचणी येत होत्या. खुप वेळा काम थांबवावे लागत होते. अनेकदा काम शक्य नसल्याचे सांगून मुर्ती परत द्याव्यात असेही वाटून गेले.
पण .....
हो नाही करता करता शेवटी गड जिंकलाच ......
शेवटी पंढरी गाठलीच ....
जेव्हा शेवटी लय सापडली होती तेव्हा मूळ प्रायमर देताना एका मुर्तीचे काम करताना तिरप्या नजरेने दुसऱ्या मुर्तीकडे लक्ष जायचे तर उगाच ती हसत असल्यासारखे वाटत होते 😊
असो...
बाकी सरस्वतीच्या हाती फूल, विणेच्या तारा, मोराचा पिसारा मोठा करणे या नेहमीच्या गोष्टिंच्या बरोबर यावेळी देवीने तीच्या मागे प्रभावळ मागितली ...
त्यासाठीचे मटेरियलही लगेच हाताशी सापडले ....
तिही फर्माइश पुर्ण केली ...
प्रभावळ बनवण्यापेक्षा जास्त ती लावण्यासाठी कष्ट घ्यावे लागले....
इतके सारे होईपर्यंत लक्ष्मी माझ्याकडे बघत असल्याचे तिरप्या डोळ्यातून दिसत होतेच ...
ती रूसायला नको म्हणून मग तीलाही प्रभावळ आणि तिच्यासमोर धनाचा घडा भरून ठेवला.
अशा रीतीने
आता दोन्ही देवी आनंदाने त्यांच्या नवीन घरात अजुन काही वर्ष वास करतील...
त्यांच्या भावबंधाचा भाग बनून राहतील ...
आशीर्वाद देत राहतील ....
समर्थ कला
9881211870
13/04/2026
कलाकार
चारचौघांप्रमाणेच नाक , डोळे हात पाय डोके असलेला प्राणी
पण तरिहि तो असतो इतरांपेक्षा वेगळा ....
आणी त्याला वेगळा बनवते
त्याची नजर .....
जी शोधत असते नावीन्य , वेगळेपण , सौंदर्य
त्यामुळेच त्याचा भवताल , त्याचा परिसर , त्याच्या वस्तु , त्याची वास्तु सर्व काही वेगळी असते .... वेगळी भासते ......
अशाच एका वास्तुत जायची संधी मिळाली
जिथे एक नव्हे तर सारेच कलाकार .... त्यामुळे तेथील चरचरात कलासक्ति , कलादृष्टी वसत होती , दिसत होती .....
अगदी तेथील तुळशीवृंदावन सुद्धा ....
जे रंगवून त्याच्या सौंदर्यात माझ्या परिने भर टाकायचा प्रयत्न करता आला ....
ज्याद्वारे माझा त्या कलासक्त वास्तुत अप्रत्यक्ष निवास राहील
😊😊
13/04/2026
या क्षेत्रात असल्याचा एक फायदा म्हणजे अनेकदा नवनव्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळते .....
जशी काल मिळाली .....
एकांच्याकड़े त्यांचे देवघर डेकोरेट करायचे होते .. नेहमीपमाणे आधी त्याचा फोटो मागवुन घेतला की जेणेकरून काम करण्याच्या आधी काही थोडाफार होमवर्क करून जाता येईल . अन्यथा एकदम साइटवर जाऊन कामाला सुरवात करायची म्हणले तर वेळ जातो , आणि अनेकदा काम सुरु झाल्यावर किंवा कधी कधी काम झाल्यावर , याच्याऐवजी दुसऱ्या प्रकारे करायला हवे होते , असे वाटते ... ज्याला काही उपाय नसतो . पुन्हा ते काम करायला मिळणार नसते .... एक संधी मिस झाल्यासारखे वाटते ......वाटत रहाते .....
पण फोटोवरुन फार काही सुचेना ....
शेवटी एक दोन दिवस पुढे मागे करून काम करायला गेलो ....
सुरुवातीला जे काही थोडेफार ठरवले होते त्यानुसार काम करायला सुरवात केली .....
आणि काम सूचत गेले ...
पूर्णत्वाला येत गेले ....
👍👍👍👍
04/12/2025
*गोष्ट माहित असणे व ती प्रत्यक्ष आकळणे यात खुप फरक असतो* ......
तोच फरक आज पुन्हा एकदा जाणवला
पुन्हा एकदा याची अनुभूती आली
आपले फोक फॉर्म , जुन्या , प्राचीन लोककला ....खास करून चित्रकला .... यांच्यामध्ये खुपशा गोष्टी अशा प्रकारे नियमबद्ध , आखीव रेखीव केलेल्या असतात की त्या फॉलो केल्या की किमान सुंदरता त्या कलाकृतिमध्ये उतरतेच उतरते .....
जशी या चित्रात उतरली आहे .....
( जेव्हापासुन हे चित्र समाजमाध्यमांवर जास्त प्रसारित झाले आहे तेव्हापासुनच ते चितारायची इच्छा होती .... ती आज पुर्ण झाली 😊)
( अजुन एक ...
अनेक दिवसांपूर्वी फाइनल झालेले काम अनेकविध कामांमुळे पुढे पुढे जात बरोबर आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी
क्लाएंटच्या नव्या व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी
पुर्ण झाले ......
त्यांच्या व्यवसायासाठी ही गोमाता कामधेनूपमाणे वरदायिनी ठरावी
हीच शुभेच्छा )
समर्थ कला
9881211870
( अधिकच्या फोटोंसाठी कृपया माझे स्टेटस पहावे ही विनंती )
2025
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Kothrud
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |