Sunjeevan yog
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sunjeevan yog, Health/Beauty, D P Road, Kothrud.
05/06/2025
*वयाची तिशी उलटली की माणसाच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. काही प्रमाणात अशक्तपणा जाणवू लागतो. प्रत्येकाच्या शरीरात बदल घडतात, ज्यांमुळे तंदुरुस्त राहणं एक आव्हान बनतं.*
तिशीनंतर आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं होतं. आहारात फळांच्या ज्यूसचं सेवनं करावं. यामध्ये संत्रे द्राक्षे अथवा लिंबू यांचा समावेश करावा. जेणेकरुन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. खालील काही गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास वजन कमी होतेच शिवाय हृदयविकाराचा धोका कमी होतो.
*ब्रोकोली -*
ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते, हे जीवनसत्त्वांचे भांडार आहे. ब्रोकोलीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हाडेही मजबूत होतात. त्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश आवर्जुन करावा.
*लसूण -*
लसणामुळे पचन शक्ती वाढते शिवाय पोटासंबंधी आजार दूर होतात. यासोबतच शरीरात असणाऱ्या घातक सूक्ष्मजीवांनाही लसूण नष्ट करतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. लसणामुळे शरीरावरील इन्फेक्शन दूर होते आणि पोटातील जंतूही नष्ट होतात.
*तेलकट मासे (Fatty Fish) -*
सॅल्मन आणि ट्राउट यासारखे तेलकट मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या माशांमुळे शरीरात हवे असलेले आवश्यक हार्मोन्स तयार होण्यास मदत होते. हे मासे मेंदू आणि हृदयासाठी अतिशय पोषक काम करतात. त्याशिवाय चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. तेलकट माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, याचा आपल्या शरीराला फायदा होतो.
*सुकामेवा (Dry Fruits)-*
सुकामेवामुळे वजन कमी करण्यास मदत करतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असतात. याचा निरोगी आरोग्यसाठी फायदा होतो.
*मध (Honey)-*
मागील पाच हजार पेक्षा जास्त वर्षांपासून मध औषध म्हणून वापरलं जातेय. अनेक औषधांवर रामबाण उपाय म्हणून वापर केला जातो. मधामध्ये अँटिसेप्टिक, अँटिऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. आरोग्यशिवाय काही जण मधाचा वापर कॉस्मेटिकसाठी करतात.
*चिया बिया (Cheea Seeds) -*
चिया बिया या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसीड आणि मॅग्नेशियम असतात. चिया बियाण्यामध्ये प्रोटिनही मोठ्या प्रमाणात असते. चिया बियामुळे भूक नियंत्रणात राहण्यासम मदत होते. चिया बियामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर एक असा घटक आहे जो वजन कमी करण्यास तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. आपल्या आहारात नक्कीच चिया बियाणे समाविष्ट करा.
*आपल्या नातेवाईकांना मिञ मैञीनींना मेसेज व लिंक शेअर करा
*जर आपल्याला कोणता आजार 🤒 असेल व आपल्याला त्यापासून लवकरात लवकर सुटका 😁 हवी असेल त्यासाठी आमच्याकडे प्रत्येक आजारावर विशिष्ट व गुणकारी औषधे 💊 उपलब्ध आहेत त्यासाठी तुम्ही आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधू शकतात.*
---------------------------------------------------------
*सर्व समुहात सारखीच माहिती आसते त्यामुळे एकच समुह जाॅईन करावा , बरेच जण दोन तीन समुह जाॅईन करतात व नतंर परत बाहेर पडतात*
*आपणास हा संदेश आवडत असेल किंवा एखाद्याच्या उपयोगी ठरेल असे वाटत असेल तर हा संदेश आपल्या ओळखीच्या / मित्रांना / किंवा आपल्या व्हॉट्सअप गृपच्या मित्रांना पाठवावा ही विनंती जेणेकरून कोणाची तरी मदत होईल.*
*टिपः हे घरगुती उपचार असले तरीसुद्धा प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाने आधी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करावी आणि नंतरच हे उपचार घरी करावे
🤗 *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा
10/07/2022
संत कृपा झाली ।*
*इमारत फळा आली ।*
*ज्ञानदेवे रचिला पाया ।*
*भारिले देवालया ।*
*नामा तयाचा किंकर ।*
*तेणे विस्तरिले आवार ।*
*जनी जनार्दन एकनाथ ।*
*स्तंभ दिला भागवत ।*
*तुका झालासे कळस ।*
*भजन करा सावकाश ।*
*बहिणा फडकती ध्वजा ।*
*तेणे रूप केले ओजा ॥*
*हा आहे आज पंढरपूरला जमलेल्या लाखो भक्तांच्या वैभवाचा.. जगात भगवंत भक्तीने समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या भागवत धर्माचा इतिहास.*
*हा अभंग आहे संत बहिणाबाईंचा. देवगाव.. रंगारी (ता.कन्नड) येथे जन्मलेल्या या संत तुकोबांच्या शिष्या (१६२८-१७००). वारकरी पंथातील महत्त्वाच्या स्त्री संत. त्यांचे जीवनच तुकामय. वयाच्या ५ व्या वर्षीपासून परमार्थाकडे ओढा.*
*पूढे कीर्तनातील तुकोबारायांचे अभंग ऐकून त्या एवढ्या प्रभावीत झाल्या की वैकुंठवासी तुकोबांचाच अनुग्रह घेण्याचा निर्धार केला. तुकोबांना गुरु मानून भक्ती सुरू ठेवली. अखेर वैकुंठगमनानंतर तुकोबांनी दर्शन देत अनुग्रह दिल्याचे त्या अभंगात सांगतात. अनुग्रहानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात अभंग लिहलेत.*
*पृथ्वीवरील पवित्र ठिकाण.. संतांचेही माहेर पंढरीच्या अंगणी भक्ती सागर उसळलाय. भगव्या पताकांचेच राज्य. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष सुरू आहे. सर्वत्र आनंदी आनंद कारण उन.. वारा पाऊस अंगावर घेत अखेर आज विठुरायाचे दर्शन होणार*
*सर्वच संत मंडळींच्या पालखी बघून वारकरी आनंदाने त्या त्या पालखीचा इतिहास उत्साहानं एकमेकांना सांगत आहेत. ते बघा, शेगावचे संत गजानन महाराजही आलेत. ती रुख्मिणी मातेची पालखी. त्यांच्या माहेरुन अर्थात अमरावती जवळच्या कौडिंण्यपूरहून आलीय. ४० मुक्काम होतात या पालखीचे.*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
D P Road
Kothrud
Opening Hours
| Monday | 6am - 5pm |
| Tuesday | 6am - 5pm |
| Wednesday | 6am - 5pm |
| Thursday | 6am - 5pm |
| Friday | 6am - 5pm |