The Glorious Dhangar
यह पेज सामाजिक अर्थिक एवं राजनीतिक जन चेतना के लिए बनाया है।
आइये हम सभी मिलकर समाज को मजबूत करे।
10/04/2026
🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨 १० एप्रिल १७५८ मराठ्यांचा अंमल पंजाब मुलतान लाहोर प्रांतात मे १७५८ पर्यंत होता. पंजाबचे बंदोबस्तास अलिजाबहादुर शिंदे यांचे वतीने सरदार साबाजी शिंदे तर सुभेदार मल्हारराव होळकर चे वतीने महाराजा तुकोजीराव होळकर यांना नेमले होते. लाहोर येथून परत फिरण्याचा श्रीमंत राघोबादादाने घेतलेला निर्णय कसा उचित आणि व्यवहार्य होता. ते जदुनाथ सरकार पत्रात लिहितात.
१० एप्रिल १७५८ ला लाहोर ताब्यात घेतले होते .रघुनाथराव पेशवे यांनी एक मोहीम पूर्ण केली, तिकडे गॅरिसन च्या लक्षात आले की, जसे त्याचे स्वतःचे सैन्य आत येऊ शकत नाही. तरी पण त्याच्या घरापासून इतक्या दूर असलेल्या प्रांतात गॅरिसन ला प्रवॄत केले. हिवाळ्यातील खूप कडाक्याची थंडी असताना, शिखांनी बंडखोरी केली .तरी मराठा सरदारांनी पंजाबवर अधिकार चालवला. एवढ्या पंजाबला नाम मात्र करण्याचे एकमेव साधन म्हणजे मराठ्यांची सत्तेशी निष्ठा, आणि त्यातून जास्तीत जास्त महसूल मिळवणे. वसुली चे काम आदिनाबेग वर सोपवायचे होते. कारण त्याच्या कडे खूप अनुभव आणि त्यांच्यात खूप समजही होती. शिखांच्या विरोधात त्यांना खूप अनुभव होता. आदिनाबेग ने पंजाब प्रांतात प्रशासक म्हणून बरेच दिवस काम पाहिले आहे.त्याच्या अधिकारक्षेत्रात यानंतर हे काम व्हावे या उद्देशाने चर्चा अंती मराठा सरदारांनी त्यांचे सैनिकासह दिल्लीकडे कूच केले.
🇮🇩 १० एप्रिल १७९३ 🇮🇩
अधून मधून अंतःकरण पूर्वक विरक्त होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एकीकडे नव्या शस्त्रास्त्रांची जमवाजमवी करीत होत्या. मिस्टर बाईड या ब्रिटिश माणसाची संपर्क ठेवून , त्यांच्याकडे माँसाहेबांनी बंदुका खरेदीसाठी पैसे दिले .मिस्टर बाईड याने मार्गावरून मातोश्री अहिल्यादेवी यांना पत्राद्वारे कळविले की,
" बहुत दिवस अमृतमय पत्र येऊन वर्तमान कळले नाही . हरघडी पत्री आज्ञा असावी. आम्ही पुण्याहून ३० मार्च १७९३ या दिवशी यशवंतराव गंगाधर या दिवाणजीं चा निरोप घेऊन निघालो. वाटेने शिंदे यांचे भय होते, २१ फेब्रुवारी १७९३ रोजी नंदुरबारेस दाखल झालो . पुण्याहून येते समयी बंदुका बरोबर आणावयास बनले नाही. लोकही फुटून बाहेर काढली, काही आले , काही आले नाही. नंदुरबारेस आल्यापासून आपल्या पायाजवळ लवकर यावे म्हणून तरतुदीत आहोत .बंदुका आणावयास सुरतेस गेलो .रस्त्याने सोनगडास गायकवाड यांचे लोकांनी पंधरा-वीस दिवस खोळंबा केला. तेथून निघून सुरतेस गेलो बंदुका वगैरे सरंजाम घेतला आहे .नंदुरबारेस आलो आपल्या पायाजवळ येण्यास बहुत दिवस लागत नाहीत .ज्या गोष्टीची जलदी धनीसाहेंबास आहे, त्या गोष्टीची मलाही जलदी आहे. सुरतेस खुद आम्ही गेलो, म्हणून बरे झाले. बाजारात बंदुका कोठे मिळत नव्हत्या, इंग्रजाचे कोठीतून भीड घालून घेतल्या. सुरतेचे व्यापारी इतरांना बंदूक विकत नाहीत. आपल्या पुण्य प्रतापे करून काम फत्ते झाले. लवकरच येतो आमची सचोटी धण्याच्या कामास प्रसंगी उपयोगी पडो .त्यासमयी आम्हीमाणूस कसे आहो ते ते ध्यानात येईल .उगाच पत्री प्रोढपणा दाखवावा हे नाही. नूतन कामाचा सरंजाम तयार होण्यास दिवसगत लागले. अडचणी आल्या. परंतु याजवर रागे भरू नये. आपला पैका घेऊन उगीच वावगी वर्तणूक करावी हे मनुष्य आम्ही नव्हे. हा काळपर्यंत वर्तमान झाले ते साद्यंत चरणापाशी विनंती निवेदन करीन. लवकरच येईन.ज्यादा काय लिहिणे. प्यार मोहबत असो द्यावी हे किताबत.पैवस्त छ.२८साबान " ( १० एप्रिल १७९३)
🇲🇨 १० एप्रिल १८०० 🇲🇨
( लेखांक ३ ) 'राजे जालमसिंग झाले 'संस्थान कोटे यांस : महाराज यशवंतराव होळकरांकडून (ता . १० एप्रिल १८०० गुळेगुळे दत्तर ) सारांश दुदरनेक फरांसीस यांस सरकारांतून हत्ती खरीदी करून, ऐवज सरकार हिशेबी लिहिणें म्हणोन .
( लेखांक ४ ) राजे 'जालमसिंग झाले' यांस महाराज यशवंतराव होळकरांकडून .(ता . १० एप्रिल १८०० गुळगुळे दत्तर ) सारांश कीं फुलण फरांसींसाकडील ५० हजारांची वरात जाहली आहे .तो ऐवज घरोब्याचे चालीस व्यंग न पडतां , ऐवजाचा निर्गम दुदरनेक याजकडेस करून पावती घेणें म्हणोन वगैरे .
🇲🇨 १० एप्रिल १८६५ 🇲🇨
कर्नल मीड साहेब ए.सी.जी. सरकारचे( द्वितीय तुकोजीराव होळकर ) भेटीस आले .बक्षीजी व दिवानसाहेब पेशवाईस गेलें होते .महाराजसाहेबांनी (श्रीमंत द्वितीय तुकोजीराव होळकरांनी ) बाळासाहेब यांची ( शिवाजीराव होळकर )भेट करविली .सरकार वाड्यांत रोशनाई झाली होती . या सुमारास इंदूर शहरीं वाख्याचा ( = कॉल-याचा ) उपद्रव सुरू झाला .
🇮🇩 १० एप्रिल१९१४ 🇮🇩
सवाई तुकोजीराव होळकर ( तृतीय) हे शिक्षणासाठी खूप जागरूक होते. त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन असल्यामुळे, संपूर्ण राज्यातील जनता शिक्षित झाली .तर राज्याची प्रगती होणार.म्हणून सुभेदारांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. आर्थिक प्रगती व्हायची असेल तर, राज्यात औद्योगीकरण आवश्यक आहेम्हणून हुकूमचंद मिलची निर्मिती केली.
प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)
पिछले हफ़्ते मुझे अपनी पोस्ट्स पर 1,000 से ज़्यादा रिएक्शन मिले! मुझे सपोर्ट करने के लिए आप सभी का धन्यवाद! 🎉
18/03/2026
#धनगरसमाज
किसी गरीब की शादी में जाकर उत्पात मचाना गुंडागर्दी करना ये भाजपा नेताओं का फैशन बन गया हैं।
पुलिस प्रशासन से अनुरोध हैं कि असामाजिक तत्वों पर सख्त कार्यवाही की जाए ।
मामला मथुरा जनपद के bsa रोड का हैं।
धनगर समाज की बेटी की शादी में मैरिज होम में घुसकर मारपीट और गोली भी चलाई गई हैं।
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Mathura