Navinya's Handloom
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navinya's Handloom, Silver crest 1 Street floor Dadar East Hindmata, Mumbai.
31/05/2026
“सर मी काही पदराचे ऑप्शन सिलेक्ट केले आहेत पाठवू का तुम्हाला?”
गेल्या वर्षी २०२५ च्या जानेवारी पासून माझी जी काही धडपड सुरू झाली होती ती फक्त आणि फक्त आशा ताईंना भेटायची, प्रत्यक्ष पाहायची!
निमित्त मात्र हे पैठणी चे!
आशा ताई हे काही साधे व्यक्तिमत्त्व नाही! त्यांच्या सारखे दुसरे कधी होणे शक्य नाही!
त्यांच्या साठी पैठणी विणायची तर ती पैठणी सुद्धा तशीच राजेशाही असायला हवी!
तुला आवडेल तसे कर सोनाली…
ही मुभा तर मिळाली होती म्हणून ताल वाद्ये असलेला पदर करायची कल्पना सुचली…
रंग तर आधी पासून ठरलेला.. मोती रंग!
आत्ता तर दिवस ही ठरला! तारीख, वार, वेळ!
२१ एप्रिल २०२५ वार सोमवार- वेळ सकाळी ११ वाजता… पण पत्ता? तो अजूनही समजला न्हवता.. खूप धाकधूक, फोनची बॅटरी १० वेळा तरी चेक केली असेन मी!
हे सारे काही कॅमेरा बद्ध करायचे होते पण माझ्या पेक्षा कौतुक सुप्रिया ताईंना अधिक म्हणून हे सगळे फोटो त्यांनीच काढलेले !
प्रत्यक्षात आशा ताई दिसल्या नंतर ठरवून आलेले सगळचं एका क्षणात पूर्ण विसरले…
बघू तरी कसा आहे पदर?
वाह क्या बात है.. हल्ली ना खूप मोठे मोठे मोर काय नी पोपट काय.. हे छान केले आहेस तू..
आवडली हो मला..
माझ्या वाढदिवसाला नेसेन मी…
८ सप्टेंबर ताईंचा वाढदिवस!
अजून काय हव होत मला?
एक से बढकर एक गाणी प्रत्यक्षात ऐकायला मिळाली..
१० मिनिटात निघायचे होते आम्हाला..
दुपारी १२ ते २ असे संपूर्ण २ तास आम्ही फक्त सुरांच्या विश्वात होतो..
ही वेळ कधी संपूच नये असे वाटत होते!
एका प्रश्नाची तयारी रात्रीच केली होती..
धीर करून शेवटी विचारलाच प्रश्न..
“ताई तुमची आठवणीतली पैठणी कोणती?”
मी कायमच पांढरी, मोती रंग अशाच पैठण्या नेसल्या पण गौतम राजाध्यक्ष याने एक फोटो शूट करायचे आहे पण तुम्ही काळ्या रंगाची पैठणी नेसा.. ती मला आवडलेली सगळ्यात जास्त पैठणी! आमच्या कडे काळा रंग नाही नेसला जायचा म्हणून ती पैठणी माझ्या कपाटातच राहिली!
९२ व्या वर्षी सुद्धा इतकी तल्लख बुद्धी?
गाणी, गाणी गायच्या आधी त्याचे किस्से, गायक, गीतकार, संगीतकार यांची सगळ्यांची नावे ऐकून मंत्रमुग्ध झालो होतो, काय काय कानात साठवायचे असे झाले होते!
निघताना आपसूकच डोके ताईंच्या पायावर होते, मिळालेला आशीर्वाद आणि पैठणी सोबतची आठवण घेऊन निघालो!
अविश्वसनीय अशी ही भेट माझ्या आयुष्यातील २ व्यक्तींमुळे झाली होती! त्यांची परवानगी मिळताच नावे नक्की सांगेन!
या जन्मी मला हा आशीर्वाद मिळाला या साठी मी दोघांची ही ऋणी आहे!
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the public figure
Telephone
Website
Address
Silver Crest 1 Street Floor Dadar East Hindmata
Mumbai
400014
Opening Hours
| Tuesday | 10am - 7:30pm |
| Wednesday | 10am - 7:30pm |
| Thursday | 10am - 7:30pm |
| Friday | 10am - 7:30pm |
| Saturday | 10am - 7:30pm |
| Sunday | 10am - 7:30pm |