Mindsetalchemist
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mindsetalchemist, Education, Mumbai.
10/05/2026
उगाच कशाला त्या अध्यात्म आणि देवाच्या गप्पा हानता
आई च्या पोटी जन्म घेता अन् देव कुठे आहे म्हणता...
आई, मा, मम्मी...
♥️🧿♥️
23/03/2026
नको नको रे ज्योतिषा।
माझ्या दारी नको येऊ।
माझे दैव मला कळे।
माझा हात नको पाहू॥१
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह।
तळहाताच्या रेघोट्या।
बापा नको मारू थापा।
अशा उगा खऱ्या खोट्या॥२
- कवयित्री बहिणाबाई
आपल्या समाजात एक विचित्र पण खूप धोकादायक पॅटर्न दिसतो तो म्हणजे माणूस आजारी पडतो, थकतो, अंग दुखतं, झोप लागत नाही… पण तो डॉक्टरकडे जाण्याआधी “कारण” शोधायला लागतो. “कुणीतरी काहीतरी केलंय का?”, “घरावर काहीतरी परिणाम झाला आहे का?” असे विचार मनात येतात. प्रत्यक्षात ही खूप साधी, सरळ वैद्यकीय गोष्ट असू शकते शरीरात एखाद्या घटकाची कमतरता, छोटं-मोठं आजारपण… पण आपण त्या साध्या गोष्टीला गुंतागुंतीचं रूप देतो, कारण आपल्याला “science” पेक्षा “mystery” जास्त आकर्षक वाटतं. घाबरलेलं मन logic ऐकत नाही, ते आधार शोधतं… आणि तेव्हा कोणीतरी “बाबा”, “महाराज”, “गुरुजी” म्हणून समोर येतो. तो तुम्हाला एक कथा देतो की “तुझ्यावर काहीतरी केलंय”, “नजर लावली आहे”… आणि माणसाला सत्यापेक्षा अशा भाकड कथा जास्त आवडतात, कारण सत्यात जबाबदारी असते आणि कथेत दोष दुसऱ्यावर टाकता येतो.
मग तुम्ही औषध घेण्याऐवजी “उपाय” करायला लागता उपवास, विधी, पुड्या… आणि त्यांच्या फसवाफसवीने कधी कधी फरकही पडतो. कारण त्या मागे थोडं औषध, थोडा placebo effect आणि मोठा विश्वास असतो. पण इथेच सर्वात मोठी चूक होते ती ही की तुम्ही “बरे होण्याचं श्रेय” स्वतःच्या शरीराला किंवा science ला न देता त्या बाबाला देता… आणि तिथून सुरू होतं mind surrender.
मुळात हे बुवा, बाबा, महाराज अचानक होत नाहीत; आपणच त्यांना create करतो. आपणच त्यांना खतपाणी घालतो, पोसतो आणि एका टप्प्यावर ते इतके मोठे होतात की आपल्या आयुष्यावरच वर्चस्व गाजवू लागतात. आपणच त्यांच्या पायाशी पैसे ओततो, त्यांच्या चरणांना स्पर्श करून “कृपा” मागतो… आणि जेव्हा त्यांच्या विकृत कृत्यांचा पर्दाफाश होतो तेव्हा आपणच आश्चर्यचकित होतो “असं कसं झालं?” पण खरं सांगायचं तर समस्या त्या बाबांमध्ये नाही… समस्या आपल्या मानसिकतेमध्ये आहे. “भोंदू बाबा” ही केवळ एखादी व्यक्ती नसून ती एक मानसिकता आहे .. भीती, अज्ञान, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवतपणावर उभी राहिलेली मानसिकता.
गावोगावी, शहरोशहरी त्यांच्या आश्रमात जी गर्दी होते ती आपणच करतो. त्यांच्या भाषणांना टाळ्या आपणच वाजवतो. त्यांच्या नावाने आरत्या, भजनं आपणच रचतो. त्यांच्या नको त्या फसवणुकीला “चमत्कार” हे नावही आपणच देतो. आणि कोणी विरोध केला तर “धर्म धोक्यात आला” अशी आरोळी देणारेही आपणच असतो. ही फक्त श्रद्धा नाही ही विचारशून्यतेची सवय आहे.
धर्म हा मुळात जागृतीसाठी असतो… पण आपण त्याला अंधत्वात बदलून टाकलं आहे आणि आपण डोळे झाकून त्याच्या मागे चालतोय. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपण प्रश्न विचारणं बंद केलं आहे. “का?” हा शब्द आपल्याला भीतीदायक वाटतो… आणि जो प्रश्न विचारतो त्यालाच आपण चुकीचं ठरवतो. त्यामुळेच भोंदू लोकांना अजून बळ मिळतं.
आणि इथेच एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की मुळात देव आणि आपल्यामध्ये कोणी तिसरा का आला पाहिजे? रामायण, महाभारत, भगवद्गीता हे आपले मूलभूत ग्रंथ आपण स्वतः वाचू शकत नाही का? आपल्याला स्वतःचे प्रश्न समजून घ्यायला आणि सोडवायला येत नाही का? आपण एवढे अडाणी कधीपासून झालो? की कुणी स्वतःला so-called देवाचा अवतार म्हणवणारा, ज्याची राक्षस होण्याचीही लायकी नाही, अशा लोकांच्या आपण आहारी जातो?
वास्तव खूप सरळ आहे ही माणसं business करत असतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यांच्या माध्यमातून चालते. त्यांच्या भोवती जमलेले अनुयायी ही अनेकदा vote bank बनतात. त्यांना वरून पाठबळ मिळतं. तुमच्या आयुष्याबद्दल त्यांना काहीच घेणंदेणं नसतं. त्यांचा एकच हेतू असतो “माझ्याकडे जास्तीत जास्त गर्दी हवी”. आणि आपण? आपण स्वतःची कामं सोडून ५-६ तास त्यांच्या प्रवचनात बसतो… आणि त्या प्रत्येक तासात त्यांचा money meter सुरू असतो. एवढी साधी गोष्ट आपल्याला का कळत नाही?
Mindset Alchemist म्हणून एक गोष्ट स्पष्ट सांगते समस्या बाबांमध्ये नाही… समस्या dependency mindset मध्ये आहे. आपण स्वतःची जबाबदारी घ्यायला तयार नाही. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. आपण basic checkup टाळतो… पण “चमत्कार” शोधायला तयार असतो. हळूहळू माणूस मनाने पंगू होतो. तो स्वतः विचार करणं सोडतो… आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची क्षमता गमावतो. हे फक्त शरीराचं शोषण नाही हे मनाचं गुलामगिरीत रूपांतर आहे.
जोपर्यंत सामान्य माणूस स्वतः विचार करायला शिकत नाही, तोपर्यंत हा खेळ थांबणार नाही. हे बुवा-बाबा वाढत राहतील. स्वतःला अवतार म्हणवणारे लोक लोकांच्या आयुष्याशी खेळत राहतील… आणि आपण फक्त बघत राहणार.
खरं अध्यात्म तुम्हाला स्वतंत्र बनवतं. ते तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतं. जे तुम्हाला घाबरवतं, दबावतं ते अध्यात्म नाही, ते control आहे. म्हणून एक साधा नियम लक्षात ठेवा जिथे तुमचा विचार बंद होतो, तिथे तुमचं शोषण सुरू होतं.
आज एक छोटा निर्णय घ्याल का?
वर्षातून एकदा तरी full body checkup करा.
तुमच्या शरीराकडे लक्ष द्या.
तुमच्या विचारांकडे लक्ष द्या.
वेळ फार अमूल्य आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही. तिचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करा. शिक्षण घ्या, मेहनत करा, स्वतःवर काम करा, नामस्मरणात राहा , सगळं शक्य आहे. पण त्यासाठी कोणत्याही बाबा किंवा बुवांच्या तिजोऱ्या भरण्याची काहीच गरज नाही.
- प्रतिज्ञा 🙏
Image : Google
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Mumbai