N.S.G Foundation

N.S.G Foundation

Share

Social Worker,
Vice President, Nationalist Youth Congress Party, Nashik

Photos 13/04/2017

भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,विश्ववंदनीय. प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!!
💐💐💐💐जय भिम💐💐💐💐

Photos from N.S.G Foundation's post 03/05/2016

एन.एस.जी. फौन्डेशन तर्फे "दुष्काळावर मात, बळीराजाला साथ" या उपक्रमांतर्गत मोफत हिरवा चारा वाटप
नाशिक(सुरगाणा) : केवळ विदर्भच नाही तर सुरगाणा, मनमाड तालुक्यासह इतर भागात दुष्काळाची छाया पसरलीय.. त्याचे पडसाद मात्र अवघ्या महाराष्ट्रात दिसायला सुरुवात झालीय. दुष्काळाची समस्या, सध्या बळीराजाला भेडसावत आहे.....मे महिना आत्ता सुरु झालाय, पण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दुष्काळ पसरलाय. या दुष्काळाचं संकट शेतक-यांसमोर आ वासुन उभं आहे. महाराष्ट्राच्या कुणा एका बळीराजाची व्यथा ही केवळ त्याचीच नाही तर महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा सोस सोसणा-या असंख्य बळीराजाची आहे. मे महिना आत्ताच सुरु झाला आहे, पण एवढ्यातच महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात दुष्काळानं काहूर माजवलय. पण ज्यानी बळीराजांला न्याय आणि आधार द्यावा अशा सा-यानीच हात वर केलेय.. आणि दुष्काळाच्या या दुष्टचक्रात अभिमन्युप्रमाणे झुंजतोय तो फक्त दुष्काळग्रस्त...
दुष्काळ अनेकांच्या संसाराच्या मुळावर उठलाय. आधीच गरीबी त्यात शेतात काम असलं तर पोट भरत मात्र जिथं शेतात काम नाही तर संसार चालवायला पैसै येणार तरी कुठून? जनावरांना खायला चार आणणार कुठून? हा प्रश्न आहे......शेतकऱ्याला खायलाच पैसै जमवणं कठीण त्यात मुलांचे शिक्षण काय करायचे, साधे जनावरांना चार आणायला हि पैसे नाहीत, त्यात पाणीही आता विकत घ्यावं लागतंय, त्यामुळं काय करावे कळत नाही.
दुष्काळानं कुटूंबियांची दैना केली आहे, यांना मदतीचा आधाराची गरज आहे, आणि याच भावनेतून पंचवटीतील एन.एस.जी. फौन्डेशन तर्फे फौन्डेशनचे संस्थापक तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष किरण पानकर यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंगबाजी व जाहिरात बाजीवर खर्च न करता सुरगाणा तालुक्यातील उंबर्डे गावातील शेतकऱ्यांसाठी "दुष्काळावर मात, बळीराजाला साथ" हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्यातील उंबर्डे गावात जनावरांना मोफत हिरवा चारा वाटपाचे आयोजन करण्यात आले......
सदर चारा वाटप करतांना एन.एस.जी. फौंडेशनचे संस्थापक किरण पानकर, अभिजित राउत, संतोष जगताप, अमेय श्रीवैष्णव, संकेत कुलकर्णी, प्रफुल्ल पाटील, महेश लभडे, रितेश जाधव, आकाश साळवे, अनिकेत साळवे, गौरव चव्हाण, सचिन बिडकर, सागर दवंडे, चेतन दिवाण, आदींसह फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते…।

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Takle Nagar, Panchavati
Nashik
422003