mcoerc
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from mcoerc, Education, Eklahareshivar, Near Odhagaon, Opp Nashik-Aurangabad Highway, Nashik.
30/07/2022
पुण्य नगरी वृत्तपत्र
Sport's Day
Sports Day
23/07/2022
दि. २१/०६/२०२२ रोजी एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालययामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षित वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील योगा हॉल मध्ये करण्यात आले होते व सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर अहिरे आणि आरती गायकवाड यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चांगले आणि निरोगी आरोग्य कसे ठेवता येईल आणि यासाठी योगाचे किती महत्व आहे हे सांगितले. याप्रसंगी सिव्हिल अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आणि योग्य अभ्यासिका नीलिमा अहिरे यांनी योगाचे शिबीर घेतले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील, माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रा. निरंजन भाले, आर्टिफिशल इंटेलिजन्स शाखेचे डॉ. जयंत चोपडे, यांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख डॉ. जयंत भंगाळे, स्थापत्य शाखेचे विभागप्रमुख डॉ. अमोल सनेर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे डॉ. देविदास दिघे, डॉ. ज्ञानेश्वर अहिरे, महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. निलेश घुगे आदी उपस्थित होते.
23/07/2022
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात दि २७/०४/२०२२ रोजी "चंद्रमुखी" या मराठी चित्रपटाचे प्रोमोशन साठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर या आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्रांगणात तरुणाईचा उत्साह पाहण्याजोगा होता. सर्वांचे आवडते अभिनेते महाविद्यालयाच्या प्रांगणात पाहण्यासाठी विदयार्थ्यांनी लक्षणीय उपस्थिती नोंदविली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. अभिनेते आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर यांनी महाविद्यालयाची माहिती घेतली, ग्रामीण भागात असूनही मातोश्री महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शैक्षणिक सोयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या प्रोमोशनला उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील मातोश्री तंत्रनिकेतनचे प्राचर्य संजय बागुल, औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले, एम. बी. ए. चे प्राचार्य डॉ. योगेश गोसावी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली सूर्यवंशी, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या माधवी गायकवाड, प्लॅनेट अर्थच्या सुवर्णा सांगळे, सुनील आव्हाड तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
23/07/2022
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक. १३/०४/२०२२ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी प्रा. जयश्री बागुल खरे उपस्थितांना संबोधित करताना तसेच उपस्थित विद्यार्थी व शिक्षकवृंद.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Eklahareshivar, Near Odhagaon, Opp Nashik-Aurangabad Highway
Nashik
422105