ProFiT

ProFiT

Share

Providing services for Financial Planning, Investments, Insurance, Tax Planning, Tax Provisions, Tax D.’s/ Corporate F. D.’s/ F. D.’s with Credit Societies etc.

18/03/2020

म्युच्युअल फंडांमध्ये सोयीस्कररीत्या परंतु नियमितपणे गुंतवणूक करीत राहण्यासाठी ‘एसआयपी’ मदतकारक ठरते."

विशेषत: बाजाराच्या अनाकलनीय आणि पेचात टाकणाऱ्या ‘चढ’ आणि ‘उतारा’च्या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी ‘एसआयपी’च गुंतवणूकदारांचा सर्वात प्रभावी सारथी ठरत असतो. प्रत्येक समयी म्युच्युअल फंडांचे युनिट्स त्यातून गोळा होत असतात.

परंतु बाजाराचा प्रवाह अगदी उलटय़ा दिशेने सुरू असतो तेव्हा ‘एसआयपी’ सुरू ठेवणे अनेकांसाठी जड जाते. खरे तर अशा समयी गुंतवणुकीत तग धरून राहणे खूप आवश्यक असते. लक्षात ठेवावयाची गोष्ट हीच की, पडत्या बाजारातच एसआयपी गुंतवणुकीतून तुम्ही अधिकाधिक युनिट्स गोळा करीत राहण्याची संधी तुम्हाला मिळत असते. बाजारातील उलटफेरीच्या समयी मध्येच ‘एसआयपी’ गुंतवणूक थांबविणे आणि सर्व गुंतवणूक विकून मोकळे होण्याची महागडी चूक अनेकांकडून बऱ्याचदा केली जात असते. ‘वरच्या किमतीत खरेदी’ आणि ‘किमती पडल्या असताना विक्री ’ अशा प्रकारची ही घोडचूक ठरते. ‘एसआयपी’ गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळवायचा झाल्यास, बाजार मंदीच्या चक्रात मग ते कितीही लांबलेले का असेना गुंतवणुकीत कायम राहणेच गुंतवणूकदारांसाठी हितावह ठरेल. दीर्घ मुदतीत गुंतवणुकीच्या यशस्वितेचा हाच एक मूलमंत्र आहे.
मागे वळून पाहिल्यास लक्षात येईल की, भांडवली बाजार आजवर प्रत्येक पडझडीतून सावरून पुढे सरसावत आला आहे. ‘एसआयपी’मार्फत नियमित गुंतवणुकीतून तुम्ही बाजाराच्या घसरगुंडीत भाव उतरले असताना खरेदी करत राहता. त्यामुळे अधिकाधिक युनिट्स गोळा करण्यासाठी बाजारमंदीसारखा प्रतिकूल काळही तुमच्यासाठी उपकारक ठरतो. कारण गुंतवणुकीची मात्रा तेवढीच ठेवत अशा पडत्या बाजारात तुम्हाला म्युच्युअल फंडाचे तुलनेने अधिक युनिट्स मिळत असतात. त्यामुळे बाजार जितका पडत जाईल, तितके ते तुमच्या एसआयपी गुंतवणुकीचे वजन वाढत जाण्यासाठी फायद्याचे ठरेल.
एक पसंतीचे वित्तीय साधन म्हणून म्युच्युअल फंडांना मिळत असलेली वाढती स्वीकारार्हता पाहता, अनेक म्युच्युअल फंड घराण्यांनी नियमित एसआयपी व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना अन्य नवीन साधने उपलब्ध करून दिली आहेत. ती म्हणजे –
एसआयपी टॉप-अप एसआयपी पॉज एसआयपी विथ लाइफ कव्हर
एक महत्त्वाचे संपत्ती निर्माण साधन म्हणून ‘एसआयपी’चे स्थान आहे. गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा ध्यानात घेऊन, म्युच्युअल फंड उद्योगानेही ‘एसआयपी’मार्फतच गुंतवणूकदारांसाठी विविधांगी प्रस्तुतींचे सादरीकरण केले आहे. घाईगडबडीत मध्येच ‘एसआयपी’ थांबविणे आणि विकून मोकळे होऊ नका. नेमके उलट करून, बाजाराच्या पुढच्या तेजी आवर्तनापर्यंत संयम राखून ‘एसआयपी’ची मात्रा वाढवत नेणेच हितावह. काळच स्वत:ला सिद्ध करेल या न्यायाने गुंतवणूक हेच सर्वोत्तम धोरण ठरेल.
तुम्ही निर्धारीत केलेले आर्थिक उद्दिष्ट हे जर दीर्घावधीचे असेल तर वेगवेगळ्या बाजार चक्रांदरम्यान गुंतवणुकीत कायम राहून हा कालावधी तरून जाणे निश्चितच फायद्याचे ठरेल.
असे तरून जाणे ‘एसआयपी’द्वारे सहज – सोपे बनविले गेले आहे. त्यामुळे मनात तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवून घ्या आणि समभागसंलग्न म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी एसआयपी सुरू करण्याची सध्या सर्वोत्तम वेळ असल्याचे लक्षात घ्या.

सध्याच्या परिस्थितीत बाजार गुंतवणूक करण्याकरिता अतिशय योग्य पातळीवर आहे. अश्या सुवर्णसंधी अभावानेच मिळत असतात. या पातळीवर शक्य असल्यास जमेल तेवढी एकत्रित (Lumpsum) रक्कम गुंतवणूक करणेही फायद्याचे ठरेल. मागील अनुभव लक्षात घेता अश्या पद्धतीने कोसळलेला बाजार पुढील ५/६ महिन्यात सावरुन परत योग्य वाटचालीस सुरुवात होते. "अधिकस्य अधिकम फलं" या उक्ती प्रमाणे आपण आता जितकी जास्त गुंतवणूक करू, त्याची फलेही तितकीच अधिक मिळतील. त्यामुळे वाट न बघता जे शक्य असेल त्या पद्धतीने आपली शक्य ती गुंतवणूक या पडलेल्या बाजारात लवकरात लवकर करावी. सल्ल्यासाठी/गुंतवणुकीसाठी कॉल करा.

ProFiT
९९२२७२००१९
७०२०२६१६७१

31/10/2019

Exactly 11 years before on this date (27 Oct 2008), NIFTY formed lowest low 2253 and yesterday (27 Oct. 2019) closed at 11627 that means in the last 11 years it moved up by 4 times

😉✌🏼☝🏻Believe in long term. You can make money in short term, but for wealth you need to be invested for long term.

ProFiT
Shrirang Deodhar

Want your business to be the top-listed Finance Company in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


1/11, SUPER TOWN, SHRIKRISHNA NAGAR, AMBAD
Nashik
422010