Electricity Conservation Awareness Programme
'save electricity for our next generation'
10/05/2019
एक दिवसही वीज न वापरलेली पर्यावरणवादी प्रा. हेमा साने
पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या आप्पा बळवंत चौकात (एबीसी) एक जंगल आहे. लोकांना हे ऐकूण आश्चर्य वाटेल जसं मला वाटलं होतं. एबीसीतल्या जोगेश्वरी मंदीरापासून लक्ष्मीरोड कडे जाताना मध्येच एक पिंपळाचे मोठे झाड आहे. त्या झाडाखाली बाहेरून एक जूना वाडा दिसतो. मोठा लाकडी दरवाजा असलेला. जुण्या काळतला. पण हा दरवाजा उघडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. दरवाजा उघडताच डोळ्यासमोर संपुर्ण जंगल, जिथे अनेक झाडं, वेली, पाला पाचोळा, पक्षांचा किलबीलाट, त्यांची घरटी, अनेक प्रकारच्या वनस्पती सगळच कस हिरवगार दिसतं. यामधूनच एक पायवाट काही मिटर अंतरावर असणाऱ्या झोपडीपर्यंत जाते. शेकडो वर्षापासून इथे कोणी रहात नसावे अशी झोपडी. सगडीकडूनच पडझड झालेली, कुजलेली लाकडं, त्यावर कोळ्यांच्या जाळ्या, धुळीने माखलेली, मुंग्या, झुरळ अशा अनेक जिवांची ही जागा. झोपडीच्या दारात निवांत विसावा घेणारा एक कुत्रा, आतामध्ये जाताच एक खाट आहे त्यावर विसावलेली मांजर, त्याच खाटेवर पुस्तकांचा ढीग, पान, कचरा, कपडे सगळकाही अस्थाव्यस्त एक माणूस मांडी घालून देखील बसू शकणार नाही एवढा पसारा. आणि भर दुपारीसुद्धा संपुर्ण काळोख.
पण याच काळोखात सुर्यप्रकाशासारख्या चमकणाऱ्या वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापीका हेमा साने या आजी राहतात. त्या गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या या आजी 78 वर्षांच्या आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक दिवसही विज वापरली नाही. तेलाचे दिवे, पणत्या आणि मागील काही काळापासून सौर दिवे वापरत आहेत. पर्यावरण संरक्षण आणि उर्जा बचतीसाठी संपुर्ण आयुष्य त्यांनी समर्पीत केलं आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींवर अनेक पुस्तकही त्यांनी लिहिली आहेत. असे असूनही सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून दुर निसर्गाच्या सानिध्यात त्या एकट्याच रहातात. आणि यातच त्यांना आनंद वाटतो. च्या youtube चॅनल वर आपल्या प्रा.हेमा साने यांच्या आयुष्याविषयी अधिक जाणून घेता येईल. खाली लिंक देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=ea1m_bHUtwE
एक दिवसही वीज न वापरलेल्या प्राध्यापिका | Decode India | EP 10 | एक दिवसही विज न वापरलेली पर्यावरणवादी प्रा. हेमा साने पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या आप्पा बळवंत चौकात (एबीसी) एक ज....
13/10/2017
Save Electricity Save Nation
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Nashik