Tech
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tech, Business Center, Nashik.
04/03/2018
http://amzn.to/2oQ7Sqf
399rs only
SanDisk Cruzer Blade SDCZ50-016G-135 16GB USB 2.0 Pen Drive Description for Higadget SanDisk Cruzer Blade SDCZ50-016G-135 16GB USB 2.0 Pen DriveSize name:16GBProduct DescriptionThe Higadget SanDisk 16GB Cruzer Blade USB Flash Drive from Higadget is a compact, portable USB flash drive. It allows you to carry and transfer files on the go like photos, videos...
07/06/2016
पोलीस दाम्पत्याने एव्हरेस्ट सर करून रचला इतिहास
07 जून :
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या राठोड दाम्पत्याने आज (मंगळवारी) एक नवा इतिहास रचला आहे. ते माऊंट एव्हरेस्ट सर करणारं पहिलं भारतीय पोलीस दाम्पत्य ठरलं आहे.
महाराष्ट्र पोलिसात असलेल्या तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड यांनी सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं. दोघंही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.
राठोड दाम्पत्याने 23 मे रोजी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत सर केला. पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून माऊण्ट एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले भारतीय दाम्पत्य आणि पोलीस कर्मचारी जोडी बनली आहेत. या कामगिरीमुळे त्यांनी भारतासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
‘ऍडव्हेंचर कपल’ या नावाने प्रसिद्ध असणारे राठोड दाम्पत्य 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघं 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एकत्र एव्हरेस्ट शिखर गाठण्याचं त्यांचं स्वप्न होतं. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती.
या 30 वर्षीय जोडप्याने ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखरावरही त्यांनी यशस्वीपणे पाऊल ठेवलं असून स्काय डायव्हिंग सारख्या काही खेळातही ते सहभागी झाले आहेत. राठोड दाम्पत्याला साहसी खेळांची आवड आहे. सन 2015 मध्ये नेपाळ भूकंपामुळे अपूर्ण राहिलेले एव्हरेस्ट चढाईचे त्यांचे स्वप्न यावर्षी पूर्ण झाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील एका पोलिसाने एव्हरेस्ट सर केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या नव्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
07/06/2016
बियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी
Tuesday, June 7, 2016 -
नाशिक : बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय.
नाशिकच्या मखमलाबाद शिवारातील शेतीची मशागत करणारा हा आहे तरूण शेतकरी सचिन जगझाप. गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरड्या पडलेल्या जमिनीचा दाह थो़ड़याच दिवसांत पडणाऱ्या पावसाने कमी होईल. पुन्हा एकदा शेतीत भरघोस उत्पादन येईल असा विश्वास सर्वच शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामांना गती आलीय. कुठे मशागत तर कुठे तण, कचरा निवडणी केली जातेय. तर काही ठिकाणी आहे त्या पिकांची काळजी घेण्यासाठी, वादळ वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
एकीकडे शेतकऱ्याची मान्सूनपूर्व तयारी सुरू असताना प्रशासनही तयारीत गुंतलंय. पावसाळ्याच्या दिवसांत दरवर्षी खत आणि बियाणांची साठेबाजी केली जाते. त्यावर अंकूष ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसलीय. साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.
मागील वर्षापासून चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातली भीषण पाणी टंचाई जाणवतेय. त्यामुळे आता धुंवाधार पावसाची आवश्यकता आहे. बळीराजाची प्रतिक्षा आता लवकर संपावी आणि लवकरात लवकर वरूणराजा बरसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
07/06/2016
काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचा राजकारणातून संन्यास
07 जून : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेलं गुरूदास कामत यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे निवेदनच कामत यांनी प्रसिद्ध केलं आहे.
’10 दिवसांपूवच् मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं गुरुदास कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे.
गुरूदास कामत यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुरूदास कामत यांची राजकीय कारकीर्द
– 1984 – 2009 – सलग पाच वेळा लोकसभेवर
– 2009 – 2011 – केंद्रात मंत्रिपद
– 2014 – लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून पराभव
– 2014 ते 2016 – पक्षात फारसे सक्रिय दिसले नाहीत
– 2016 – राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Nashik
422009