SSD LIVE
https://www.youtube.com/@ssd555
सांप्रदायिक,सामाजीक,शैक्षणीक तसेच राजकीय क्षेत्रातील व विविध कार्यक्रमाचे प्रसारण SSD LIVE
26/05/2026
कै. बाजीराव देशमुख विद्यालयात लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
शेळगाव महाविष्णु : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शेळगाव महाविष्णु येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमास मा. सभापती विलास कोकाटे, मा. सरपंच रफीक कुरेशी, मा. सरपंच प्रविण काळे, देविकांत देशमुख, पो.पा. सुनिल गोरे, शिवाजी घात, अच्युत चव्हाण, सत्यम मुलगीर, शिवाजी पंचागे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार धबडे, भक्तराज गांगर्डे, धम्मानंद खंदारे, ओमप्रकाश लष्करे, रमेश हेंडगे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास, सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि विकासाभिमुख नेतृत्व आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
SSD LIVE
🌺🙏 संत चोखामेळा पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन सोहळा 🙏🌺
वारकरी संप्रदायातील थोर संत, भक्तीभावाचा अखंड झरा असलेल्या संत चोखामेळा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य किर्तन सोहळा
🎤 किर्तनकार :
श्री हभप माऊली महाराज रामपुरीकर
🥁 मृदंगाचार्य :
संगीत अलंकार श्री हभप सुदर्शन महाराज जोगडे
🙏 आयोजक :
श्री हभप अत्तम महाराज धोतरे
📍 स्थळ :
श्री महाविष्णु देवस्थान, शेळगाव
ता. सोनपेठ, जि. परभणी
📡 SSD LIVE फेसबुक पेजवर थेट प्रसारण
॥ हरि विठ्ठल ॥ जय हरि विठ्ठल ॥ 🌺
🌺🙏 संत चोखामेळा पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन सोहळा 🙏🌺
वारकरी संप्रदायातील थोर संत, भक्तीभावाचा अखंड झरा असलेल्या संत चोखामेळा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य किर्तन सोहळा
🎤 किर्तनकार :
श्री हभप माऊली महाराज रामपुरीकर
🥁 मृदंगाचार्य :
संगीत अलंकार श्री हभप सुदर्श महाराज जोगडे
🙏 आयोजक :
श्री हभप अत्तम महाराज धोतरे
📍 स्थळ :
श्री महाविष्णु देवस्थान, शेळगाव
ता. सोनपेठ, जि. परभणी
📡 SSD LIVE फेसबुक पेजवर थेट प्रसारण
॥ हरि विठ्ठल ॥ जय हरि विठ्ठल ॥ 🌺
27/04/2026
उष्माघातापासून बचाव करा!
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टारांचा सल्ला घ्या.
#उष्माघात
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
SHREE MAHAVISHNU DEVASTHAN SHELGAON
Parbhani