Good Morning Parbhani

Good Morning Parbhani

Share

News, analysis, promotions, advertising, events and all about Parbhani City and District!

15/07/2018

*प्राचार्य रामदासजी डांगे स्मृति व्याख्यानमाला, परभणी - पुष्प ४ थे*

संत साहित्याचे साक्षेपी समिक्षक, वारंकरी संप्रदायाचे अनूयायी, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक, मराठी शब्दकोश महामंडळाचे निर्माते व महाराष्ट्र शासनाचा संत साहित्यातल्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त परभणी येथील प्राचार्य (कै.) रामदासजी डांगे स्मृति व्याख्यानमालेत माजी केंद्रीयमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्राचार्य (कै.) रामदासजी डांगे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने परभणी महापालिकेने गेल्या चार वर्षापासून स्मृतिव्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले असून *चौथ्या स्मृति व्याख्यानमालेत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील या 'नव्या पिढी समोरील आव्हाने' या विषयावर पुष्प गुंफणार आहेत.*

या कार्यक्रमास पुणे येथील डॉ.एम.एस.बागवान, प्राचार्या सौ.संध्याताई दुधगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर माजीमंत्री सुरेश वरपुडकर हे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत.

या व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर सौ.मीनाताई वरपुडकर, आयुक्त रमेश पवार, उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान लाला, गणेश देशमुख, भगवान वाघमारे, विजय जामकर, सौ.मंगला मुदगलकर, जलालोद्दीन काजी, चंद्रकांत शिंदे, समितीप्रमुख नगरसेवक बंडू पाचलिंग यांच्यासह महापालिका सदस्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

दिनांक : *सोमवार, १६ जुलै*
स्थळ : *बी.रघुनाथ सभागृह, परभणी*
वेळ : *सायंकाळी ५ वाजता*

10/09/2017

यूवकांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या - राजेंद्र दर्डा

ग्रामीण भागात शिक्षण घेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षणच समाजात परिवर्तन घडवू शकते ही बाब ओळखुन त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचे हे सामाजिक कार्य इतरांसाठी दिशादर्शक ठरेल असे गौरव उद्गार माजी शिक्षणमंत्री तथा लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी काढले. यूवकांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या असे ते म्हणाले.

येथील श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा टृस्ट परभणी च्या १८ व्या सेवा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात जिंतुर येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांना या वर्षीचा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करणयात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य अतिथी तथा लातूर येथील रोटरी इंटरनॅशनलचे भूतपूर्व प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी, डॉ.विवेक नावंदर, ऍड. अशोक सोनी, संदीप भंडारी उपस्थित होते. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, समाजाचा आरसा असणार्‍या पत्रकारांनी वाईट गोष्टीवर आसूड जरुर ओढावेत मात्र ज्या चांगल्या बाबी घडत आहेत त्याचीही दखल घेवून त्या समाजापर्यंत गेल्या पाहिजेत याची दक्षता घ्यावी. तोष्णीवाल यांनी शिक्षणाची दारे खुली करतानाच समाजातील दीनदुबळयांसाठी आरोग्य शिबीर घेवून त्यांच्यात परमेश्‍वर पाहिला. त्यामुळे वंचितांमध्ये आपलेपणा शोधणार्‍यांसाठीचा हा पुरस्कार आहे असे आपल्याला वाटते असेही ते म्हणाले. आज आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करत आहेत अशा वेळी माहिती व तंत्रज्ञानाला महत्व तर आहेच पण त्याचबरोबर समाजाला सुदृढ करण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत याचाही विचार शिक्षणतज्ञांनी करून या शिक्षण प्रणालीमध्ये बदल करावा असे आवाहन त्यांनी केले. युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपल्या माहितीचा खजिना वाढू द्या मात्र त्या बरोबरच आपल्या चरित्र्याचा विकास होवू द्या. युवकांना आता रेडीमेड पॅकेज उपलब्ध होणार नाही त्यासाठी त्यांना प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या लागतील. त्याचप्रमाणे आलेल्या संकटाना घाबरुन न जाता त्या संकटांशी सामना करण्याचे सामर्थ्य आपल्यात निर्माण करावे लागेल यासाठी वाणीत गोडवा, डोक्यात शांतता आणि वागण्यात नम्रता हे गुण आपल्याला बाळगावे लागतील असेही ते म्हणाले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ.सोमाणी यांनी परिवाराविषयी नेमकी संकल्पना काय असावी यावर भाष्य केले. विज्ञानाच्या माध्यमातुन आम्ही प्रगती केली मात्र याच विज्ञानाने बॉंम्ब बनवून विनाशाकडे वाटचाल केली. परिवारातील वाढत चाललेला दुरावा यामुळे आपली संस्कृती,परंपरा ही कुठ जात आहे याच चिंतन आपल्याला कराव लागणार आहे. कुटुंबामध्ये अहंमपणाच्या रुपाने अहंकाराने प्रवेश केला आहे. त्यामुळे या अहंकाराला दूर करावयाचे असेल तर परिवारामध्ये शांतता नांदली पाहिजे. सुखी परिवारासाठी तीन गोष्टी महत्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. यात त्यागवृत्ती, परिवारातील व्यक्तींविषयी विश्‍वास आणि व्हॉटअपच्या जमान्यात बंद पडलेला एकमेकांप्रतीचा संवाद. यासर्व बाबी बंद झाल्या आहेत त्यामुळे सुखी परिवारासाठी पुन्हा एकदा एकत्र कुटुंब पध्दतीचा स्विकार करावा लागेल. हिंदु संस्कृतीमध्ये १६ संस्कार असून हे संस्कार आपल्या मुलांना आवश्यक द्या. आपल्याकडे आईवडीलांसाठी वेळ नाही असे मुल सांगतात मात्र याच आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यामुळे त्यांना वेळ द्या अन्यथा तुमच्यावरही तशीच वेळ येईल. समय महत्वाचा आहे जीवनात जेव्हा अंधकार निर्माण होईल तेव्हा परमेश्‍वराला शरणा जा आणि योगक्षेमं वहाम्यहम चा विचार करा असेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी आपल्याला पुरस्कार खुप मिळाले मात्र हा पुरस्कार आपल्यासाठी आर्शीवाद असल्याचे नमूद करतानाच आता जबाबदारी आणखी वाढली असल्याचे नमूद केले. जीवनात सत्याच्या मार्गावर चालत असून याच मार्गाचा आयुष्यभर स्वीकार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाला जीवनात कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र जिद्द आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी ठेवणारा यशस्वी होतो. सामाजिक कार्याच्या माध्यमातुन आपल्याला यापुढेही दीनदुबळयांची सेवा करायची आहे असे मनोदय त्यांनी केला. आपल्या मुलांना पैशापेक्षा योग्य संस्कार देऊन पालकांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांना पुरस्काराच्या रुपाने मिळालेली २१ हजार रुपयाची देणगी त्यांनी टृस्टला परत करून यातुन सामाजिक कार्य करावे असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजगोपाल कालानी त्यांनी करून टृस्टच्या माध्यमातुन होत असलेल्या कार्याची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुणकुमार ओझा यांनी तर आभार संदीप भंडारी यांनी मानले.

Photos from Good Morning Parbhani's post 07/09/2017

राहूल गांधीचा उद्या परभणीत रोड शो ? .................................

काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा उद्या शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी परभणीत रोड शो आयोजित करण्यात येईल अशी चिन्हे आहेत. संघर्ष यात्रे निमित्त दूपारी एक वाजता खा. राहूल गांधी हे परभणीत दाखल होणार आहेत. नांदेडहून ते कारने येणार असून त्रिधारेपासून सभास्थळापर्यत राहूल गांधींनी मोटरसायकलद्धारे रोड शो करावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेतेमंडळीनी प्रयत्न सूरू केले आहेत, पण त्यास सूरक्षा यंत्रणानी अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामूळे रोड शो बाबत शंका आहे.

#दैनिकदिलासा

Want your organization to be the top-listed Government Service in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Dainik Dilasa
Parbhani
431401

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm