VEDH Parbhani
Parbhani Talks
What Students Really Felt | Vikrant Lohar Feedback | Parbhani Talks 2025
25/11/2025
23 नोव्हेंबरचा परभणी टॉक्स- प्रेक्षकांच्या अफाट उपस्थितीत अत्यंत यशस्वीपणे पार पडला!
या वर्षीच्या परभणी टॉक्समध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अनुभव, संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवले.
सत्राची सुरुवात झाली अशोक रोकडे यांच्या प्रभावी चर्चेने. आपत्ती व्यवस्थापन आणि White Army यांचा प्रवास त्यांनी मांडला
यानंतर ज्योती गवते यांनी त्यांच्या धावण्यातील संघर्षांपासून ते यशापर्यंतचा प्रवास मांडला.
सुमेध वाघमारे च्या रूपात जंगल भेटायला आले. त्यांनी आवाजातून जंगलाशी एकरूप होत, निसर्गाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.
राहीबाई पोपेरे मावशींनी त्यांच्या सहज, प्रेमळ आणि मनात उतरणाऱ्या बोलण्यातून प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे केले. बियाणांची जपणूक ते निसर्ग संवर्धनापर्यंत त्यांनी मांडलेल्या विचारांनी प्रत्येकाला पुन्हा निसर्गाशी नातं जोडण्यास प्रेरित केलं.
परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव यांचे टायगर हिलच्या लढाईतील चित्तथरारक प्रसंग त्यांनी इतक्या जिवंतपणे मांडला की सभागृहात एक क्षणासाठीही श्वास रोखला गेला. त्यांच्या शौर्यकथेनं संपूर्ण हॉलमध्ये देशभक्तीचा आणि प्रेरणेचा उद्गार जागा झाला.
या सर्व मुलखावेगळ्या व्यक्तींना ऐकताना प्रत्येक प्रेक्षक अक्षरशः खिळून बसला होता. सकाळी दहापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्वांनी एकाग्रतेने, उत्साहाने आणि मनापासून प्रत्येक वक्त्याला ऐकले.
नवी ऊर्जा, नवी जिद्द आणि नवा विचार घेऊन प्रत्येजण बाहेर पडला!
या सर्व पाहुण्यांना बोलत करणाऱ्या सुसंवादिनी धनश्री प्रधान दामले याचे विशेष आभार.
25/11/2025
Parbhani Talks 2025
15/11/2025
प्रवेशिकासाठी संपर्क: 8999349312
प्रगती बुक सेंटर,स्टेडीयम कॉम्प्लेक्स, परभणी
09/11/2025
🎯 मर्यादित प्रवेशिका उपलब्ध
संपर्क: प्रविण सोनोने सर - 9422178101
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the school
Website
Address
Parbhani