Rohan Survase Patil

Rohan Survase Patil

Share

नेते : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

16/06/2026

राज्याच्या प्रशासकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक केंद्रबिंदू असलेल्या पुण्यातील जलसंपदा विभागाची महत्त्वाची मुख्य अभियंता कार्यालये कोल्हापूर व सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय पुनर्विचार करण्याची गरज आहे.

या निर्णयाला विरोध करत ही कार्यालये पुन्हा पुण्यातच कार्यान्वित ठेवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मा. खासदार पार्थ दादा पवार यांना निवेदनही सादर करण्यात आले.

पुणे हे केवळ एक शहर नसून राज्याच्या प्रशासन, नियोजन आणि विकासाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाची महत्त्वाची कार्यालये पुण्यातच राहणे हे समन्वय, कार्यक्षमता आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

#जलसंपदा_विभाग #पुणे

Sunetra Ajit Pawar
Parth Ajit Pawar
CMOMaharashtra
NCPSpeaks_Official

14/06/2026

पुण्यातील जलसंपदा विभागाची महत्त्वाची कार्यालये पुण्याबाहेर हलवण्याच्या निर्णयाविरोधात सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन, शिक्षण, संशोधन आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही कार्यालये पुण्यातच कायम ठेवावीत, अशी जनभावना आहे.

या मागणीची राज्यातील विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली असून, या विषयाला व्यापक प्रसिद्धी मिळत आहे. पुण्याचे प्रशासकीय महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आणि जलसंपदा विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी ही कार्यालये पुण्यातच राहणे आवश्यक आहे.

#जलसंपदा_विभाग

Devendra Fadnavis
Sunetra Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Radhakrishna Vikhe Patil

12/06/2026

वीर जवान अमर रहें! 🇮🇳

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राचे सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव (शहापूर, कराड) आणि जवान विक्रम चव्हाण (ऐरोली, मुंबई) यांना वीरमरण आल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान राष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीला संपूर्ण भारताचा सलाम आहे.

या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना.

दोन्ही वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Photos from Sunetra Ajit Pawar's post 11/06/2026
Photos from Rohan Survase Patil 's post 10/06/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी छगन भुजबळ यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत पक्षाच्या स्थापनेच्या आठवणींना उजाळा दिला. ए-१० बंगल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली सुरुवात आणि त्यानंतर झालेल्या ऐतिहासिक मेळाव्याच्या आठवणी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या. तसेच आदरणीय नेते अजित पवार यांना प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ज्येष्ठ नेते नवाब मलिक, खासदार राजेंद्र जैन, आमदार संजय खोडके, सना मलिक-शेख, झिशान सिद्दीकी, पंकज भुजबळ, शेखर निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"विचार राष्ट्रवादी... आचार राष्ट्रवादी..." या ब्रीदवाक्यासह सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि जनहितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करत आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



Sunetra Ajit Pawar
NCPSpeaks_Official

Want your public figure to be the top-listed Public Figure in Poona?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Poona