ASP Media Solutions
ASP Media Solutions हि राजकीय सामाजिक विषयावर काम करणारी माध्यम संस्था आहे.
कोटी कोटी हे बळकट बाहू, समतेचा रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही
- वसंत बापट
#भारतमाझादेश #भारतमेरादेश
10/11/2023
राज्य वस्तू व सेवा कर (GST)
पुणे विभागातील साहित्यप्रेमी अधिकारी
मनातील विचार शब्दरूपाने व्यक्त करता येणं ही नितांत सुंदर भावना असते. असं असलं तरी आपल्या मनाच्या कुंपणातून वाचकांच्या मनापर्यंत पोचेल, असं लिहिणं ही सहज सोपी गोष्ट नाही. त्यातही दिवसभर फाईलिंच्या गराड्यात प्रचंड ताणतणाव सहन करत काम करणाऱ्या अधिकऱ्यांसाठी तर ही गोष्ट अजिबातच सोपी नाही. तरीही मनाच्या एका हळव्या कोपऱ्यातून भावना व्यक्त करण्याची ऊर्जा या अधिकाऱ्यांमध्ये आहे. 'अक्षरखेंव' मासिकाच्या 'चांदणझरे' या दिवाळी अंकात या अधिकाऱ्यांचे साहित्य प्रसिद्ध झालं आहे. या अंकांची डिझाईन, लेआऊट, अक्षरजुळणी, मुद्रितशोषण, छपाई, बायडिंग ही सगळीच अंक निर्मितीची जबाबदारी ASP Media Solutions कडे असल्याने या निमित्ताने अधिकाऱ्यांमधील साहित्यिकांची ओळख झाली. अधिकाऱ्यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून स्वतःसाठी वेळ काढत, सरकारी कामकाजाच्या रुक्ष भाषेपासून थोडी फारकत घेतली आणि प्रत्येकाने संग्रही ठेवावा अशा विविध साहित्याच्या अविष्काराने सजलेल्या 'चांदणझरे' या दिवाळी अंकाची निर्मिती झाली. कथा, कविता, प्रवासवर्णन, वैचारिक लेख, ललित लेख, मुलाखत, चित्र, छायाचित्र, रेखाटने अंकात आहेच, पण विशेष महत्वाचे म्हणजे छंदासंबंधीचे लेख या अंकात समाविष्ट केले आहेत. अशा विविधांगी लेखनप्रकारांनी हा अंक सजला आहे. या अंकाबद्दल राज्य विक्री व सेवा कर विभागातील सर्व साहित्य प्रेमींचे अभिनंदन आणि सर्वांना दिवाळीच्या सदिच्छा !
प्रवीण खुंटे
ASP Media Solutions
अंधाना मेट्रो कशी दिसते
15 ऑक्टोबर : व्हाईट केंद्र सेफ्टी डे निमित्त रिना पाटील यांच्या नजरेतून मेट्रोची सैर.
अबोलांची बोलकी शाळा
कर्णबधीर मुलांची भाषा आपण शिकूयात का?
जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त विशेष स्टोरी
काय बाय सांगू, कसं गं सांगू?
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
ASP Media Solution, Labour And Employment Office Building, 2nd Floor, Shankar Shet Road, Opp. Kumar Pacific Mall, Behind RBL Bank, Gurunanak Nagar Pune.
Pune
411042