Shefali Vaidya Fans
Shefali Vaidya is a Pune-based right wing freelance writer, newspaper columnist, and media personality. She is a Mass Communications master’s degree holder.
12/11/2023
दिनांक : 12.11.2023
कृपया प्रसिद्धीसाठी
आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा !
देशप्रेमी बांधवांकडून भ्याड आक्रमणाचा निषेध तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली !
पुणे - हमास या आतंकवादी संघटनेकडून 7 ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर आक्रमण करण्यात आले. या भ्याड आक्रमणाचा निषेध करण्यासाठी, तसेच या आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 11 नोव्हेंबर या दिवशी पुणे येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 'हर घर सावरकर' समिती आणि 'भारत इस्रायल मैत्री मंच' यांच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा वीर सावरकर स्मारक येथे चालू होऊन टिळक रस्ता येथील 'न्यू इंग्लिश स्कूल' येथे यात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत इस्रायलला पाठींबा दर्शवला. भारत इस्रायल मैत्री मंचचे श्री. रणजीत नातू, श्री. विद्याधर नारगोलकर, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, विराट हिंदुस्थान संगमचे जगदीश शेट्टी, इस्रायली नागरिक अदेलीया पेनकर, विश्व हिंदू परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना, यांच्यासह ३०० देशप्रेमी बांधव सहभागी झाले होते.
इस्रायल हे आतंकवादाचा प्रतिशोध घेत आहे. आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी यावेळी व्यक्त केले. हमास या आतंकवादी संघटनेच्या आक्रमणापासून आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे असे हर घर सावरकर समितीचे देवव्रत बापट यांनी सांगितले. हमास मधील मदरशांतून मुलांना इस्रायली नागरिकांना मारण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे वास्तव इस्रायली नागरिक ससून फणसपुरकर यांनी उघडकीस केले. तसेच जग विरोधात असल्याचे चित्र असतांना भारतातून समर्थन मिळणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत इस्रायली नागरिक अदेलीया पेनकर यांनी व्यक्त केले. हमासच्या आतंकवादी आक्रमणाचा प्रत्येक भारतीयाने निषेध करायला हवा असे हिंदु जनजागृती समितीच्या कु.क्रांती पेटकर यांनी सांगितले.
या पदयात्रेला भारतात राहणारे इस्रायली बांधवही सहभागी झाले होते.
15/11/2022
जय हिंद
HarGharSavarkar - 26 Feb to 28 May 2023 In this video, we'll be celebrating the birth anniversary of HarGharSavarkar, the founder of the Indian independence movement.From February 26th to May 28th ...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Shaniwar Wada
Pune
411030