AnwarShaikh
An Indian civil rights activist, Former Indian National Athlete from the Indian state of Maharashtra, Pune City
28/10/2025
*एक ऐतिहासिक कदम, एक सशक्त आवाज़!*
Dr. Farha Anwar Hussain Shaikh, जिन्होंने मुस्लिम महिलाओं को मस्जिदों में नमाज़ की अनुमति दिलाने के लिए पुणे से लेकर सुप्रीम कोर्ट तक संघर्ष किया
अब उनकी यह प्रेरणादायक यात्रा और विचार सुनिए Awaz The Voice News Channel पर, जहाँ देश की जानी-मानी पत्रकार Aamna Farooque (Delhi) ने उनसे एक गहराई भरी बातचीत की।
🎙️ विषय: “मस्जिद में महिलाओं को इबादत का हक़”
📺 पूरा इंटरव्यू देखें: https://youtu.be/ahGljzALCew?si=y5YVYHG6NhsniVJ3
फराह शेख: जिन्होंने महिलाओं के लिए मस्जिद के दरवाजे खुलवाए #पुणे में #कमरुद्दीन #मस्जिद के बाहर हुई एक घटना ने फराह को इतना प्रेरित किया कि उसने एक शक्तिशाली आंदोलन को जन्म दि.....
20/10/2025
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख व अन्वर हुसेन शेख यांच्या वतीने
दिनांक: १९ ऑक्टोबर २०२५
विषय: शनिवारवाडा प्रकरणाचा निषेध; पण मूळ कारण - 'महिलांना मशिदीत प्रवेशबंदी' - मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनची ठाम भूमिका
पुणे — आज शनिवारवाडा परिसरात एक मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेवरून काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवला, तसेच भाजपच्या नेत्यांनी यास राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झाला.
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन या घटनेकडे दोन महत्त्वाच्या पैलूंमधून पाहते आणि आपली स्पष्ट भूमिका मांडत आहे:
१. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृतींचा तीव्र निषेध:
कोणत्याही प्रकारची धार्मिक अशांतता, समाजद्वेष किंवा धार्मिक स्थळांचा वापर करून तणाव निर्माण करणाऱ्या कृतींचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या घटनेनंतर भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी त्या परिसरात एका मजारावर झेंडा लावण्याचा जो कथित प्रयत्न केला, तो अत्यंत बेजबाबदारपणाचा आणि आगीत तेल ओतणारा प्रकार आहे.
यापूर्वीही, मग ते सारसबागेतील बासी ईदच्या मुद्दा असो, कोथरूडमधील दांडिया कार्यक्रमावरून निर्माण केलेला वाद असो, वा आझम कॅम्पससारख्या शैक्षणिक संस्थांबाबतची त्यांची विशिष्ट भूमिका असो;
यातून एक ठराविक सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा नमुना दिसून येतो. आजच्या संवेदनशील प्रसंगी अशी कृती करणे, हे शहराचा सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरते.
२. घटनेचे मूळ कारण: महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे
सार्वजनिक, ऐतिहासिक किंवा पर्यटक स्थळांवर कोणतेही धार्मिक विधी होऊ नयेत, याबद्दल आमचेही दुमत नाही. पण आज त्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याची वेळ का आली, याच्या मुळाशी जाणे अत्यावश्यक आहे.
याचे मूळ उत्तर एका कटू सत्यात आहे: जर शहरातील मशिदींची दारे मुस्लिम महिलांसाठी सन्मानपूर्वक खुली असती, तर त्यांना शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात नमाज अदा करण्याची गरजच भासली नसती. शहरातील अनेक मशिदींमध्ये महिलांना प्रार्थनेसाठी प्रवेश, सोय किंवा सुरक्षित जागा उपलब्ध नाही. हीच व्यवस्थात्मक अडचण (Systemic Problem) आजच्या या अनावश्यक वादाचे खरे मूळ आहे.
डॉ. फरहा शेख यांचा लढा आणि फाऊंडेशनची भूमिका:
आमच्या संस्थेच्या संस्थापिका, डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख, याच मूलभूत हक्कासाठी गेल्या १० वर्षांपासून 'महिलांना मशिदीत प्रवेश' (Women's Entry in Mosques) यासाठी घटनात्मक आणि सामाजिक लढा देत आहेत.
* हा केवळ धार्मिक नाही, तर महिलांच्या घटनात्मक समानतेचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे.
* डॉ. फरहा यांनी स्वतः भारतातील अनेक प्रमुख मशिदींमध्ये महिलांना प्रार्थनेची प्रवेश मिळावा , यासाठी रीतसर पत्रव्यवहार केला, मात्र त्यांना सातत्याने परवानगी नाकारण्यात आली.
* हाच लढा आज डॉ फरहा अन्वर शेख सुप्रीम कोर्टातही याचिका दाखील केली आहे आणि प्रलंबित आहे.
* जर महिलांना त्यांचा हा धार्मिक आणि घटनात्मक हक्क मिळाला असता, तर आज असे प्रसंगच उद्भवले नसते आणि राजकीय व्यक्तींना त्यावर 'राजकारण' करण्याची संधीही मिळाली नसती.
आमची मागणी:
* प्रशासनाने तात्काळ शांतता प्रस्थापित करावी आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही (राजकीय किंवा धार्मिक) कृतींवर कठोर कारवाई करावी.
* ऐतिहासिक वास्तूंच्या वापराबाबत स्पष्ट नियमावली जाहीर करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रसंग टाळता येतील.
* सर्वात महत्त्वाचे: प्रशासनाने आणि मुस्लिम समाजाने 'महिलांना मशिदीत प्रवेश' या मूलभूत प्रश्नावर संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा. महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक प्रार्थनेची सोय करणे, हीच अशा घटनांवरील खरी उपाययोजना आहे.
नोट: आम्ही शनिवारवाडा येथील घटनेचे समर्थन करत नाही, पण त्या महिला ज्या परिस्थितीमुळे तिथे नमाज अदा करण्यास भाग पडल्या, त्या परिस्थितीचे आणि त्यांच्या मूळ हक्काचे आम्ही ठाम समर्थन करतो.
संपर्क:
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख —
अन्वर हुसेन शेख —
8459867838 / 9511696198
ई-मेल: [email protected]
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Address
Bopodi
Pune
411020